onion हि बातमी तुमच्या साठी खास आहे
onion तुमच्या कडे कांदा असेल किंवा नसेल तरीही हि बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे .यंदा कांदा हसवणार की रडवणार….? या ब्लॉग ला हे हेडिंग देण्यामागे खास कारण आहे. कारण जर या वर्षी कांद्याला चांगला भाव आला तर शेतकरी सुखावणार कारण गेल्या वर्षी कांदयाने शेतकऱ्यांना रडवल होत. कारण खूप कमी भाव कांदयाला मिळाला होता. आणि जर कांदयाला या वर्षी भाव नाही मिळाला तर कांद्याचा उपभोग (खाणारे ) सुखावणार कारण त्यांच्या खिश्याला कात्री नाही लागणार.म्हणजे कांदा स्वस्त होणार.म्हणूनच म्हणावे लागते,“यंदा कांदा हसवणार कि रडवणार“
यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यावर वाईट दिवस येणार याची प्रचिती काही दिवसात येणारच आहे.पावसाअभावी खरीप हंगाम पुरता गेला आहे.खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे पावसाअभावी 60 % नुकसान झाले आहे. पावसामुळे खरीप कांद्याचे लागवड क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणत कमी झाले आहे. आता शेतकऱ्याना आशा आहे ती परतीच्या पावसाची पण त्याचीही चिन्ह खूप कमी दिसत आहे.त्या मुळे रब्बी हंगामातील कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे.
कांदा हे प्रमुख नगदी पीक असणाऱ्या भागात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याची लागवड गतवर्षीच्या तुलेनंत चाळीस टक्क्यांपेक्षा कमीवहोणार असल्याचे चित्र स्पस्टपणे दिसत आहे. मागील वर्षी नाशिक जिल्यातील उच्चाकी 2 लाख 20 हजार 864 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी (रब्बी )कांद्याची लागवड झाली होती.परंतु यंदा मात्र सव्वा दिड लाखाच्या आसपास क्षेत्रावरच उन्हाळी कांद्याची लागवड होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की.
राज्यातील परिस्थिती
कांदा उत्पादक क्षेत्रात पावसाळी म्हणजे पोळ कांदा, लेट खरीप कांदा व उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी कांद्यालाच जास्त पसंती देतात.
यावर्षी पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने खरीप हंगामाची तर होरपळ झालीच शिवाय पावसाच्या वकरदृष्टीमुळे नद्या-नाले,धरणे-तलाव कोरडेठाक आहेत.त्यामुळे रब्बी हंगाम घेणे अशक्य आहे
देशातील स्थिती
गेल्या वर्षी देशभरात 3 लाख 76 हजार हेक्टर क्षेत्रांवर खरीप कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते .यंदा कांद्याच्या लागवडीचे उद्धिष्ट निश्चित करण्यात आले होते.यंदा हे क्षेत्र 3 लाख 43 हजार हेक्टर चे असून गेल्या महिण्याअखेर 2 लाख 47 हजार हेक्टर खरीप कांद्याची लागवड झाली आहे.
कांद्याच्या प्रमुख दहा उत्पादक राज्यामध्ये लागवडीमधील घट उद्दिष्टाच्या तुलनेत एक लाख 96 हजार हेक्टरची आहे.कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात खरीप 11 हजार , तर लेट खरीपमध्ये आता पर्यंत 40 हजार हेक्टर अशी ऐकून 51 हजार हेक्टर हुन अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झालेली नाही.
जागीतक स्थिती
तुर्कस्तान,पाकिस्तानचा कांदा संपलेला असताना अफगाणिस्तान मध्ये भूकंपामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. निर्यातदाराच्या माहितीनुसार दहा दिवसांत कांद्याच्या नाशिक आगार मधून दुबईसाठी 300 कंटेनर कांदा रवाना झाला आहे.
निर्यात
गेल्या आठवड्यात 40 %निर्यातशुल्कासह दुबईसाठी टनभर कांद्याचा भाव 500 डॉलर होता.तो आता 580 ते 590 डॉलर पर्यंत गेला आहे. श्रीलकेसाठी 540 डॉलरवरून 580 ते 590 डॉलर टन या भावाने कांदा पाठवला जात आहे.पाकिस्थानच्या सिंध प्रांतातील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी पुढचा महिना उजडणार आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे
तोपर्यंत भारतीय कांद्याला आखाती देशामध्ये मागणी राहील, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. दरम्यान खरीप कांद्याच्या 30 ते 40 टक्के क्षेत्रावर पावसाने वांदा केला आहे.शिवाय कर्नाटकमधील 75 ते 79 हजार क्षेत्र बाधित झाल्याचे स्पस्ट झाले आहे. ही सर्व परिस्थिती एकीकडे असताना शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कांद्याच्या खरेदीला वेग आला आहे.त्यामुळे कांद्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
त्यामुळे असे वाटते की यंदा कांदा हसवणार की रडवणार….!
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकच अपेक्षा आहे की यावर्षी पावसाने दांडी मारल्या मुळे इतर पिके गिली आहेत. कष्ट करून कांदा शेतकरी पिकवेल खरा पण कांद्याला यावर्षी तरी योग्य भाव यावा या साठी सरकार व देवा कडे साकडं घालत आहेत.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.