Soybean सध्याची परिस्थिती
Soybean सोयाबीन चे या वर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने सलग एक महिना खंड दिल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी तूट आली आहे. कसेबसे शेतातील जे काही धान्य निघाले तेही आज दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी शेतकरी घेऊन जात आहेत. त्यात मोठी आवक असल्यामुळे सोयाबीनला भाव भेटत नाही. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी भावामध्ये शेतकऱ्याचे सोयाबीन विकले जात आहे.
बरेच शेतकरी सोयाबीन विकून येत आहेत. भाव नसल्यामुळे कोण कसेही सोयाबीन घेत आहे. आणि अडचणीमुळे शेतकरी ते विकत आहेत. परंतु सोयाबीन विकल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतमालाची पक्की पावती घेताय ना आणि जर घेत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.या मुळे भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल.
पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले असताना बाजारात भावही कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून भविष्यात शासनाने अनुदान जाहीर केले, तर सोयाबीन विक्री केल्याच्या पक्क्या पावत्यांची गरज भासणार आहे. त्याकरिता सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांनी पक्की पावती घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याकडे पंधरवड्यापासून नवे सोयाबीन उपलब्ध झाले आहे. यंदा समाधानकारक भाव मिळेल अशी आशा होती. मात्र नवे सोयाबीन बाजारात येताच भावात कमालीची घसरण झाली. एकीकडे उत्पादन घटले असताना दुसरीकडे भावही कोसळले त्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. दिवाळी तोंडावर असल्याने बहुतांश शेतकरी सोयाबीन विक्री करत आहेत. परंतु व्यापाऱ्याकडून पक्की पावती दिली जात नसल्याचे चित्र आहे. भविष्यात शासनाने अनुदान जाहीर केले तर पक्क्या पावत्यांचा विचार होऊ शकतो. त्याकरिता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर त्याची पक्की पावती घ्यावी. असे आव्हान बाजार समितीने केले आहे.
हिंगोली बाजार समिती
“हिंगोली बाजार समिती अंतर्गत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना हिशेबपट्टी पक्की द्यावी अशा सूचना केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर त्यांना पक्की पावती देण्यात येते. शेतकऱ्यांनी ही पक्क्या पावतीची मागणी करावी.”
नारायण पाटील, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली
सोयाबीनचे भाव का उतरले ?
नवे सोयाबीन बाजारात आले आहेत. तसेच मध्य प्रदेशासह इतर राज्यातही सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. त्या तुलनेत मात्र मागणी कमी असल्यामुळे सोयाबीनचे दर पडण्यामागे हेच कारण आहे. असे व्यापाराचे म्हणणे आहे.
“शासनाचे अनुदान आले तर पक्की पावती हवी“
सोयाबीन वर यंदा यल्लो मोझॅक ने हल्ला केला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. आता भावही कवडीमोल मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने अनुदान जाहीर केलं तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन विक्रीची पक्की पावती असणे आवश्यक आहे.
सोयाबीन उत्पादक म्हणतात
“अत्यल्प पावसाचा फटका सोयाबीनला बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली आणि भाव ही कवडीमोल मिळत आहे.”
विक्रम बोडके, शेतकरी
“सोयाबीनला सध्या मिळणारा भाव शेतकऱ्यांना न परवडणार आहे. किमान सहा हजार रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे.”
सुनील बेंद्रे, शेतकरी
सोयाबीनला भाव किती प्रतिक्विंटल
तालुका | प्रति क्विंटल भाव |
येडशी | 4660 |
घोगरेवाडी | 4670 |
धाराशिव | 4660 |
ईट | 4640 |
तुळजापूर | 4660 |
लोहारा | 4660 |
किल्लारी | 4670 |
निलंगा | 4665 |
कांदा विक्री वेळेस ही झाली होती अशी परिस्थिती
गेल्या वर्षाचा विषय आपल्या सर्वांच्या लक्षात असेल, कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले होते. परंतु शेतकऱ्यांनी अडतीमध्ये कांदा विक्री केल्यानंतर त्याची पक्की पावती घेतली नव्हती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी अडचणी आल्या, अनेकाना अनुदान मिळाले ही नाही. त्यामुळे यावेळेस तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर आपल्या मालाची पक्की पावती दुकानदाराकडून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जर शासनाने अनुदान जाहीर केले तर मात्र अनुदान मिळवण्याची अडचणी येणार नाही.
ऐन वेळेला शेतकरी पावती आणण्या साठी अडत दुकानदार किंवा व्यापारी याच्या कडे चकरा मारतात. परुंतु व्यापारी ती देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकऱ्याचे पावती न मिळाल्या मुळे नुकसान होते. व शेतकरी योजने पासून वंचित राहतो.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा