Soybean 2023-24 मध्ये सोयाबीनला किती राहील भाव?

Soybean चा पूर्व इतिहास

Soybean सद्या सर्व शेतकऱ्याचे Soybean पीक काडून झाले आहे. मळणी हि झाली. पण शेतकरी सध्या दुविदा मनःस्थितीत आहे. कारण मागील काही वर्षाचा सोयाबीन च्या बाजार भावाचा विचार केला, तर असे लक्षात येईल कि, 2021-22 मध्ये सोयाबीन च्या भावाने रेकार्ड भाव नोंदविला होता जो कि 10000 ते 11000 रुपये क्विंटल च्या आस पास होता. तो गेल्या वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये निच्चकी 4000-4500 पातळी वर येऊन थांबला.याचाच अर्थ कि सोयाबीन चे भाव हे स्थिर नाहीत.

2023-24 Soybean ची स्थिती पाहिलंय तर ती गेल्या वर्षी पेक्षा काही वेगळी नाही. सध्या शेतकऱ्या साठी शेतीतून उत्त्पन्न देणारे ऊसा मागील दुसरे पीक त्यामुळे शेतकरी याकडे आशेने पाहत असतो. कारण सोयाबीनच्या पैश्यावर खूप देणी फेडायची असतात.आणि समोर दिवाळीचा सण आणि पैश्याची चणचण त्या मुले शेतकरी सोयाबीन विकण्या साठी संभ्रमात आहे. सध्या सोयाबीन चे भाव हे शासनाने जाहीर केलेल्या हमी भावा पेक्षा कमी आहेत.

हेही वाचा – Soyabin शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेतायनां, घेत नसाल तर ही बातमी महत्त्वाची आहे

सोयाबीन चा पूर्व इतिहास

आंतराष्ट्रीय बाजारात Soybean आणि सोयापेंडीचे भाव एक टक्क्याने वाढले होते. देशात मात्र सोयाबीनच्या दरात क्विंटल मागं 50 रुपयांचे चढ-उतार सुरू आहेत. देशातील सोयाबीनची भाव पातळी पुढील काळात 5500 रुपये ते 6000 पर्यंत वाढू शकते. असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे. सीबॉटवर सोयाबीन मध्ये जवळपास एक टक्क्यांची वाढ होऊन, भाव 13.25 डॉलर प्रतिभूषेल्सवर होती. रुपयात सांगायचे झाले तर, हा भाव 4050 रुपये होता. तर सोयाबीनचे वायदे 434 डॉलरवर होते. रुपयात हा भाव 36 हजार 136 रुपये प्रति टन होतो.

भारतीय बाजार

सोयाबीन उत्पन्नात भारत हा आघाडीचा देश आहे. येथील शेतकऱ्याची मुख्य मदार आता सोयाबीन पिकावर आहे. तया माउली आता भारतात सोयाबीन उत्पादन आणि भाव क्षे आहेत याचा विचार करू. आता आपल्याकडे तर वायदे बाजार बंद आहेत. पण बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4400 ते 4600 रुपयांच्या आसपास भाव मिळाला. तर सोयापेंड 42 हजार ते 43 हजार रुपये प्रति टनाने विकले जात आहे. आता नवीन सोयाबीनच्या भावात वाढ का झाली. याचे मुख्य का दोन कारण सांगता येतील. पहिलं कारण आहे. बायोफ्युल म्हणजेच जैवइंधनासाठी सोयातेलाची वाढत असलेली मागणी. त्यामुळे सोयातेलाचे भावही वाढले.

हेही वाचा -महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

जागितक बाजारातील स्तिथी

आता भारतातील सोयाबीन बाजारात सोयाबीन भाव कशे राहील हे पाहण्या साठी आपणाला जगातील सोयाबीन उत्पादक देशातील स्थितीचा अभयास करावा लागेल. अमेरिकेच्या काही भागात पावसाची कमतरता आहे. याचाही परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून येत आहे. दुसरं आणि महत्त्वाचं कारण आहे. सोयाबीन आणि सोयापेंडला येत असलेली मागणी.यातच ब्राझीलमध्ये सोयाबीन निर्याती संबंधी अडचणी होत्या त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळाला. चीनने यंदा अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात केली आताही आयात सुरू आहे. यामुळे सोयाबीन आणि सोयाबीनचे दरात वाढ दिसून येत आहे. असे अभ्यासकाचे म्हणणे आहे.
अर्जेंटिनात मागच्या हंगामात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं होतं. ज्यामुळे अर्जेंटिनातून सोयातेल आणि सोयापेंड निर्यात खूप कमी प्रमाणात झाली याचाही परिणाम जागतिक बाजारात दिसून येत आहे.

हेही वाचा -Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार..!

देशातील बाजारावर कशाचा दबाव

मग भारतात सोयाबीन का स्थिर आहे. आणि पुढील काळात बाजार कसा राहू शकतो. तर आपण याआधीही चर्चा केली की देशातील सोयाबीन वर खाद्य तेलाचे भाव पडल्याचा दबाव आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आत्तापर्यंत सोयाबीनचे भाव कमी होते. त्यामुळे सोयाबीन दबावात होते. पण दोन आठवड्यापूर्वी जसं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीने डॉलरचा टप्पा पार करून वर गेले.तसे देशातही सोयाबीनचे भाव क्विंटल माग 100 ते 200 रुपयांची सुधारणा झाली. भाव पातळी सरासरी 4400 वर होती. ती आता 4600 च्या वर गेली आहे.


भविष्यात सोयाबीनचे भाव काय राहतील

मग या पुढील काळात सोयाबीनचा भाव बाजार कसा राहू शकतो. तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम आपल्याही बाजारावर होणार. हे नक्की यंदा ब्राझीलमध्ये आत्तापर्यंत विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनाच्या उत्पन्नातही सुधारणा होणार आहे. पण ही सुधारणा किती होते, हे पाहावे लागेल. कारण दोन्ही देशांमध्ये आता कुठे पेरणी सुरू आहे. पण उत्पादनात वाढ होणार असं मानलं जातं आहे. पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढलं तरी आशियात माल आणायला जास्त खर्च येतो. काही प्रमाणात माल आणता ही येईल परंतु त्याचा खर्च वाढणार. आपल्या शेजारचे देश आपल्याकडून सोयाबीन घेतात, सध्या देशातून सोयाबीन निर्यातीचे वातावरण आहे. जवळपास दोन लाख टनाचे सौदे झाल्याची माहिती आहे.


      सरत्या ऑक्टोबर महिन्यात खाद्यतेल आयातही कमी झाली. पण आधीचा स्टॉक जास्त आहे. या सर्व कारणांनी सोयाबीनचा भाव सध्याच्या दरावरून कमी होण्याची शक्यता कमीच आहे. तर सध्याच्या बाजारातील परिस्थितीवरून सोयाबीनचा भाव पातळी पुढच्या काळात 5500 ते 6000 रुपयांपर्यंत वाढू शकते. असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.


त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन ची विक्री करत असताना बाजाराची चौकशी करून किंवा आपणाला जशी गरज असेल. त्या प्रमाणात सोयाबीन विक्री करावी जेणेकरून भविष्यामध्ये भाव वाढले किंवा कमी झाले तरी आपल्यावर होणार नाही याची काळजी घ्यावी.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा

Leave a Comment