(sugarcane FRP ) ऊसाला घसघसीत दरवाढ मिळण्याची शक्यता

उसाला पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता

sugarcane frp सध्या महाराष्ट्र मधील वातावरण हे आंदोलन पोषक झालेला आहे. एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण याचा वाद पेटलेला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि काही संघटनानी आरक्षण उभ केलेल आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊसाला जास्तीत जास्त भाव द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. एकीकडे साखरेचा दर प्रति क्विंटल 3900 रुपयांवर गेल्याने साखर कारखानदारांना चांगले दिवस आले असताना आणि इथेनॉलच्या दरात प्रति लिटर दीड ते तीन रुपयांची वाढ होण्याचे, संकेत भारतीय साखर संघाकडून दिले असताना कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाला भाव का देत नाहीत. असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाला घसघशीत दरवाढ मिळेल का हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.

sugarcane frp

भारतामध्ये साखर विक्री आधारभूत (कमीत कमी विक्री दर) प्रतिक्विंटल ला 3100 असल्याने दरात वाढ करण्याची मागणी. मागील काही वर्षापासून साखर कारखान्याकडून होत होती. मात्र केंद्र सरकार दरवाढ करीत नव्हते केंद्र सरकार साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढ करीत नसल्याचे कारण ऊसाला भाव वाढ देताना सांगितले जात. साखर कारखान्यांना साखर, इथेनॉल, भुसा इत्यादी बाबीतून येणाऱ्या पैशातून एफआरपी पेक्षा अधिक दर देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात होती.

राजू शेट्टी यांचे आंदोलन

राजू शेट्टी यांनी उभारलेल्या आंदोलनातून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव आणि मागील वर्षीचे चारशे रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे द्यावेत. अशी मागणी करत आहेत. काही ठिकाणी जाळपोळ, तसेच ट्रॅक्टर पलटणे, ट्रॅक्टर आडवने, रस्ता रोको, कारखान्यांना ऊस न मिळू देणे. अशा अनेक घटना घडत आहेत.

रयत संघटना आंदोलन

रयत संघटनेनं निवेदन दिले आहेत. निवेदनात अशी मागणी आहे. गेल्यावर्षी तुटून गेलेल्या उसाला साखर कारखान्यांनी sugar factory 500 रुपये द्यावे आणि यंदा frp व अधिकचे 500 रुपये दर जाहीर करावा. अन्यथा शेतकऱ्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा हि रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे. मागील वर्षा पासून साखरेचे भाव प्रतिक्विंटल 3 हजार500 रुपये ते 4000 रुपये एवढे होते. ती सध्या 3 हजार 800 ते 900 रुपयांच्या जवळ पास वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्याचे साखरेपासून मिळणारे उत्प्प्न वाढेल आहे. मळी, बॅग, मॉलेसिस या उपपदार्थापासूनही उत्त्पन्न मिळते. त्याचबरोबर कारखान्यांनी इथेनॉल, डिस्टलरी, को – जनरेशन सारख्या उपपदार्थतूनही उत्पन्न मिळते .त्यामुळे मागील वर्षीची frp व यंदा frp जास्त भाव मिळेल असे बोले जात आहे.

साखरेचे भाव

मागील वर्षभरात साखरेचे दर टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. सध्या साखरेला ग्रेडनुसार क्विंटल ला 3750 ते 3900 रुपये दर मिळत असल्याचे साखर कारखान्याकडून सांगण्यात आले. याशिवाय इथेनॉल च्या किमतीत सध्या दीड ते तीन रुपयाची घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात वाढ होईल असे भाकीत भारतीय साखर महासंघाकडून करण्यात आले.

साखर आणि इथेनॉलची मागणी पाहता साखर व इथेनॉलच्या दरात पुढील काही दिवसात आणखी वाढ होईल असे सांगण्यात येत आहे. याचा फायदा सहाजिकच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून एफआरपी पेक्षा अधिक दर मिळतील. असे साखर उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.

इथेनॉलचे दर

पेट्रोल च्या वाढत्या किमतीमुळे आणि इथेनॉलला चांगले दिवस आलेले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होईल. असे बोलले जात आहे. केंद्र सरकारने मका व खराब धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रति लिटर 56 रुपयाहून 66 रुपये केला आहे. तर खराब धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर 64 रुपये दर केंद्र सरकारने केला आहे. धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या विक्री दरात वाढ केली असली तरी उसापासून तयार होणाऱ्या. इथेनॉलला खरेदीचे दर केंद्र सरकारने वाढविले नाहीत. ते पुढील आठवड्यात वाढतील असे सांगण्यात आले.

साखर उत्पादन खर्च

एक किलो साखर उत्पादनासाठी 36 ते 37 रुपये खर्च येतो. त्यामुळे साखरेचे दर वाढले तरी फारसा फरक पडत नाही. चार वर्षे साखरेला दर नव्हता त्यामुळे कारखान्यांनी तोट्यातच कारखाने चालविले आहेत. इथेनॉलचे दर केंद्र सरकार वाढविणार आहे. परंतु निर्णय झालेला नाही.

जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष भारतीय साखर महासंघ

शेतकऱ्याचे मत

वरील सर्व बाबीचा विचारकेला तर आपल्या असे लक्ष्यात येईल कि आता साखर, इथेनॉल, व इतर उपपदार्थ याना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांनी यंदा उसाला चांगला भाव द्यावा याची सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या  व्हाट्सअप्प चॅनल  व  फेसबुक  पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा

Leave a Comment