soybean भारतासह महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक पीक म्हणजे सोयाबीन हे पीक आहे. मागील 10 वर्षांपासून शेतकऱ्याच हे महत्वाच पीक आहे. असं मानलं जात कि ऊसानंतर जे पीक अग्रगण्य मानलं जात व ज्याच्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा झाली. ते सोयाबीन आहे.परंतु खरच सोयाबीन पीका मुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात. का त्या पिकातून शेतकऱ्याचा आर्थिक खर्चही निगत नाही. याचा विचार करण्याची वेळआली आहे.
soybean विषयी थोडक्यात
सोयाबीनचे शास्त्रीय नाव ( Glycine max, ग्लिसाइन मॅक्स ) ही मूळची पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे. सोयाबीनमध्ये ग्लोसिन हे अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच शास्त्रीय नाव ग्लोसिंग मॅक्स असे आहे. कडधान्य असले तरी सोयाबीन पासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेल बियांमध्ये हे गणले जाते. सोयाबीन हे भारतातील इतर तेलबिया व नगदी पिकाप्रमाणे महत्त्वाचे नगदी पीक आहे जगामध्ये 60 % सोयाबीन अमेरिकेत आपण होते. तर भारतात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्य प्रदेशात होते. मध्य प्रदेशातील इंदूर या भागात सोयाबीन रिसर्च सेंटर आहे.
हेही वाचा -Soybean 2023-24 मध्ये सोयाबीनला किती राहील भाव?
सोयाबीनचे उपयोग
- सोयाबीनचे दूध तयार करून पर्यायी निर्भळ दूध तयार केले जाते.
- कडवटपणा काढून टाकलेल्या सोयाबीनची कणिक वापरून पोळ्या, ब्रेड, बिस्किटे, नानकटाई, केक तयार करता येतात.
- डाळीचे पदार्थ शेव, चकली, मिसळ बनवता येते.
- सोया नगेट्स, सोया चंक्स, सोयाबीनची भाजी, सोया टिक्का, सोया कबाब, कटलेट इत्यादी चविष्ट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
- पनीरला पर्याय म्हणून बऱ्याचदा वापरले जाणारे टोपू म्हणजे सोया पनीरच.
- सोयाबीन मधून आहारात उपयोगी येणारे, खाद्यतेल तयार करण्यात येते.
- सोयाबीन मधून तेल काढल्यानंतर पेंडीचा उपयोग कोंबड्याचे खाद्य म्हणून केला जातो.
- खाद्य अन्नपदार्थ असण्याबरोबर सोयाबीनच्या बियांचा उपयोग बायोडिझेल बनवण्यासाठी ही होतो.
- त्याचबरोबर सोयासॉस हा एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ जो फ्रंकी पासून पिझ्झा पर्यंत कशातही वापरला जातो.
सोयाबीन एकरी उत्पादन
मागील दोन वर्षाचा म्हणजे 2022-2023 चा विचार केला. तर असे लक्षात येईल शेतकऱ्याचे जीवन हे दोन मुख्य घटकावर अवलंबुन असल्याचे दिसत आहे. आपण उदाहरण म्हणून आपण मराठवाड्याचा विचार करू. पहिला आणि महत्वाचा घटक म्हणजे निसर्ग. आता 2022 या वर्षाचा विचार केला तर त्या वर्षात मराठवाड्यातील काही भागात खूप पाऊस पडला होता. त्यामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर त्याच्या वर दुबार पेरणीचे संकट आले.आणि जायचे पीक वर आले तर त्यावर एलो मोज्याक नावाचा रोग पडला. त्यामुळे एकरी 5 ते 6 क्किटल उत्पादन निगाले.
हेही वाचा -Soyabin शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेतायनां, घेत नसाल तर ही बातमी महत्त्वाची आहे
आणि 2023 चा विचार केला तर या वर्षी पाऊस उशिरा पडला. पेरण्या उशिरा झाल्या.आणि सोयाबिन फुलात असताना अपुरा पाऊस पडला. त्यामळे उत्पादन घटले. यावर्षी एका एकर मध्ये 6 ते 7 उत्पादन निगाले. जर 2022 आणि 2023 चे सरासरी उत्पादन काढले तर एकरी 500 kg उत्पादन निगल्याचे समजते.
आता 600 kg झाले. आता सध्याचा भावाचा विचार केला तर भाव आहे.48 रुपये kg आहे. मग 600 kg × 48 = 28800 एवढे एक एकर मधील सोयाबीन चे उत्पादन होते.
सोयबीनवर होणार एकरी खर्च
आता सोयाबीनचे एकरी उतपादन काढले. ते आले 28800 रुपये एवढे आले. आता सोयाबीन वर एकरी किती खर्च होतो. ते पाहूयात त्यासाठी खालील मुद्याचा विचार करावा लागेल.
मुद्धे | खर्च |
नांगरणी | 2000 |
कुळवणी | 700 |
बीआयने | 3500 |
खत dap | 1500 |
पेरणी | 700 |
तणनाशक | 1000 |
कोळपणी – 2 | 1400 |
खुरपणे | 2500 |
कीटकनाशक | 2500 |
काढणी | 4500 |
मळणी | 1500 |
ताडपत्री | 1000 |
बारदाना | 150 |
वाहतूक | 1500 |
अडत / हमाली | 1000 |
एकूण | 22950 |
हेही वाचा -Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?
आता सोयाबीन उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसवू.
आता आपले एकरी उत्पादन झाले होते. 28800 आणि आपला एकरी खर्च झाला आहे. 28950 रुपये म्हणजे उत्पना पेक्षा खर्च ज्यास्त आहे. मग यावरून विचार करावा लागेल कि खर्च शेतकऱ्यांना शेतीतून किती उत्पन्न निघत आहे. आणि शेती परवडते का? जर हि पोस्ट आवडली तर नक्की शेयर करा.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा