आंतराष्ट्रीय करारामुळे Soybean चे वाढतील भाव ?

दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या भाव वाढीचे कारण ठरलाय ब्राझील मग आपल्या देशातील भाव वाढ आणि ब्राझीलचा नेमका संबंध काय हे आपण येथे पाहणार आहोत. पण दिवाळीनंतर म्हणजेच पुढच्या काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो याचा सुद्धा आढावा आपण या ब्लॉगच्या माध्यमातुन घेणार आहोत.

Soybean भाव वाढीचे मुख्य घटक

त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा . नमस्कार मी योगेश नेमकी सोयाबीनची भाव वाढ का झाली ? ते पाहुयात. तसं पाहिलं तर बाजारात सोयाबीनचे भाव वाढीसाठी महत्त्वाचे तीन कारण आहेत. म्हणजेच पायाभूत घटक. पण या तीन मधील एक महत्त्वाच कारण आहे. ते म्हणजे ब्राझील आहे. तर ब्राझील तुम्हाला माहीतच आहे. की जागतिक सोयाबीन उत्पादनात हा आघाडीवर असतो. यंदा तर ब्राझील आतापर्यंतचा विक्रमी सोयाबीन उत्पादन घेईल असे अंदाज येत होते. ब्राझीलचा कृषी विभाग असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व संस्था यंदा ब्राझील विक्रमी उत्पादन घेईल असे अंदाज सांगत होत्या. मग याचा परिणाम काय झाला याचा परिणाम असा झाला की, आपल्या देशामध्ये यंदा घटले हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. सगळ्या उद्योगांना सुद्धा माहिती आहे.

मागील स्थिती

पण आपलं सोयाबीन उत्पादन घटलेल असतानाही केवळ ब्राझीलमध्ये विक्रम उत्पादन होणार. म्हणून आपलं सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीलाच कमी झालं होतं. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जवळपास 4,200 ते 4500 च्या दरम्यान सोयाबीन विकलेलंच आहे. त्याला कारण सुद्धा ब्राझीलच होता.म्हणजे हंगामाच्या सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे सोयाबीनचे भाव पडले, आपल्याकडेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात ही सोयाबीनचा बाजार दबावत होता. त्यामुळे काय झालं आपल्या शेतकऱ्यांना कमीत भावामध्ये म्हणजे 4500 रु पेक्षा कमी तेव्हा सोयाबीन विकावा लागला होता.

हेही वाचा -soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

ब्राझीलचे उत्पादन

पण आता काय झालं, आता नेमके भाव कश्या मुळे वाढत आहेत. त्याचा झाला असं की ब्राझील मधील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पाऊस कमी आहे. म्हणजेच काय सध्याची जी परिस्थिती आहे. ती सोयाबीन पिकासाठी पूरक नाहीये. याचा परिणाम काय होऊ शकतो तर ब्राझीलमध्ये उत्पादन घटू शकतं असे अंदाज आता येत आहेत. आता उत्पादन किती घटेल हे आत्ताच काही सांगता येणार नाही किंवा कुठलाही संस्थेने तसे आकडे दिले नाहीत. ते पण काही संस्थांनी आपले ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज हे कमी कमी केलेत.त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीन आणि सोयापेंडेंचे भाव मागच्या दोन आठवड्यांमध्ये सुद्धा चांगले वाढले होते.

अमेरिकन उत्पादन

तसं पाहिलं तर अमेरिकेच्या हा दोन नंबरचा सोयाबीन उत्पादक आहे. बाजारात म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयपेंडीचा भाव मागच्या महिन्याभरात चांगले वाढल्याचं चित्र दिसलं. विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी सरासरी 10% ने आणि सोयापेंड चे भाव जवळपास 20% नि वाढले. आता सोयापेंड वाढल्याचा आधार आता आपल्या देशातील सोयाबीन बाजाराला मिळतोय. मग सोयपेंडच का सोयातेल का नाही. कारण आपणाला माहीत आहे कि सोयातेलाचे भाव आधी पासूनच दबावात आहेत.आपल्या सोयाबीन भावाला सध्या तरी सोयातेलकाढून आधार मिळत नाही. त्यामुळे आपल्या सोयाबीनचे भाव हे सोयापेंडच्या भावावर अवलंबून आहेत. मग त्याचं झालं असं की, आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे अमेरिकेच्या वायदे बाजार आणि तिथल्या स्थानिक बाजारात बाजारांमध्ये सोयापेंडचे भाव वाढले. किती वाढले? 20% ने वाढले.

मग आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानंतर भारताच्या सोयापेंडला सुद्धा काहीसा आधार मिळाला. आता आपल्याला माहिती आपल्या सोयाबीन नॉन gm आहे. अमेरिकेच सोयाबीन जीएम आहे. त्यामुळे सहाजिकच दोन्ही दरांमध्ये फरक असतो. आपला सोयापेंडीचे भाव हे अमेरिकेच्या सोयाबीन पेक्षा काहीसे जास्त आहेत.

हेही वाचा -Soybean शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेतायनां, घेत नसाल तर ही बातमी महत्त्वाची आहे

भारतातून निर्यात

पण झालं काय आपल्या सोयाबीनला का मागणी वाढले तर ,त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या शेजारचे जे काही देश आहेत . किंवा आशियातले जेवढे बाकीचे देश आहेत. या देशांना भारताकडून सोयाबीन घेणं परवडते म्हणजे अमेरिकेचा सोयाबीन घेण्यापेक्षा या देशांना भारताकडून सोयाबीन घेणं सध्या परवडते. तिथेच भारताकडून सोयाबीन आयतेचे करार करत आहेत. म्हणजेच आपल्या देशातले प्रक्रिया प्लांट्स आणि निराधार हे सोयाबीन निर्यातिचे जे करार करतात. मग आता पर्यंत किती करार झाले. आतापर्यंत तर “वाटर्स” या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशातील निर्यातदारांनी आतापर्यंत 3 लाख टनाचे करार केले. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यां मधील हे निर्यात होणार आहे. ती, तर अजूनही करार होत आहेत. हे करार आतापर्यंतची माहिती आहे.

कदाचित दिवाळीनंतर हे करार वाढू सुद्धा शकतात. मग झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढल्यानंतर भारताकडून खरेदी वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे काय सहाजिकच प्रक्रिया प्लांट ने सोयाबीन खरेदी वाढवल याचा परिणाम असा झाला की, आपल्या सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली.

सोयाबीन भावात सुधारणा

मग आपल्या देशातल्या सोयाबीन दारात किती वाढ झाली. आपण जर दोन आठवड्यांपर्यंत आणि आत्ताच्या भावाचे तुलना केली तर आपल्याला दरामध्ये किमान 200 ते 300 रुपयांचे कुंटल मागे वाढ दिसतात. किमान दोनशे ते तीनशे रुपयांचे क्विंटल मागे वाढ दिसते. आता आपल्याला माहीतच आहे की दोन आठवड्यापूर्वी बाजारामध्ये सोयाबीनला 4200 ते 4500 मिळत होता. पण आजची स्थिती जर आपण पाहिली, तर आपल्याला असं दिसतं की बाजारांमध्ये 4700 ते 4900 भाव मिळतोय.

काही बाजारांमध्ये आता भाव 4900 किंवा 5000 सुद्धा आहेत. पण ह्या सोयाबीनचे कॉलिटी बियाण्यांची असते. म्हणजेच बियाणा क्वालिटीच्या सोयाबीनला आजही चांगला भाव मिळतोय. 5100 ते 5200 पर्यंत सुद्धा विकले जाते. त्याचे वाण कुठलं आहे. त्याची कॉलिटी कशी आहे. सोयाबीची गुणवत्ता कमी आहे. म्हणजे डागी आहे. किंवा काडी, कचरा, माती जास्त आहे. या सोयाबीनला सध्या कमी भाव मिळतो. हे सोयाबीन अगदी चार हजारांपासून विकली जाते. पण आपण सरासरी मालाचे म्हणजेच, आपण सरासरी भावाची चर्चा करत असतो. त्याच्या मागे मुख्य कारण तसेच ज्या सोयाबीनचे गुणवत्ता कमी आहे.

आता आपण सोयाबीनचे भाव नेमकं कशामुळे वाढले त्याच्या मागे मुख्य कारण काय होतं. ब्राझीलचं आणि तीन महत्त्वाच्या कारणे कुठले होते ते पाहिलं. त्यातील पाहिलं कारण कोणते होते. तर अमेरिकेच्या बाजारात झालेले सुधारणा. दुसरा कारण होत आपल्या देशात उत्पादन झालेली घट कारण आपल्या देशात उत्पादन घट आपल्या देशात उत्पादनात घेट झाली म्हुणून तर सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा घटक होता सोयाबीन निर्यातीचे झालेले करार, कारण सोयाबीन निर्यात झाल्याशिवाय आपल्याकडे सोयाबीनला जास्त आधार मिळणार नाही. आपल्याला किमान 15 ते 20 लाख टनांच्या दरम्यान निर्यात करावीच लागते. त्यामुळे आपल्याकडे अतिरिक्त पुरवठा होत नाही. या तीन घटकांमुळे सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचे दिसते. कधीपासून मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून, मग आता हे आतापर्यंतच झालं.

हेही वाचा -Soybean 2023-24 मध्ये सोयाबीनला किती राहील भाव?

दिवाळी नंतर सोयाबीनचे भाव

दिवाळीनंतर म्हणजेच पुढच्या काळामध्ये आमच्या सोयाबीनला काय भाव मिळणार हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. याचा आढावा आपण बाजारात वेगवेगळे अभ्यासक आहेत, जाणकार आहेत, त्यांच्याकडून घेतला. अभ्यासकच्या मते दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीनला चांगला उठाव राहू शकतो. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडीच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. किंवा भाव ह्या पातळीवर स्थिर राहू शकतात. त्यामुळे भारताकडून आयतीसाठी इतर देश पुढे येऊ शकतात.

जे काही सोयाबीन निर्यातीचे जे काही करार झाले. 3 लाख टनाचे ते करार झालेले आहेत. बांग्लादेश, इराण, नेपाळ आणि व व्हीयतनाम या देशांसोबत जास्तीत जास्त सोयाबीन ह्या चार देशांना जाणार आहे. आता या चार देशाची मागणी भारताकडे आहेत. पण याशिवाय इतर आशियातील काही देश सुद्धा भारताकडून सोयाबीन आयात करण्याचच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते देश विचारणा करतात, म्हणजेच ते सौद्यांच्या तयारी सुद्धा आहेत. म्हणजेच काय होणार तर येणारा काही काळामध्ये आपल्या सोयाबीन निर्यातीचे करार वाढू शकतात. तसेच आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा आधार देऊ शकतो. आता ब्राझीलमध्ये जसं जसं चित्र बदलत जाईल. तसंच त्याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसायला लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजार

ब्राझील मधलं उत्पादन जर यापेक्षा जास्त कमी होत गेलं. किंवा अंदाज तसे कमी कमी होत गेले. तर निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजाराला आधार मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशात सुद्धा सोयाबीनचे भाव वाढू शकतात. किती वाढू शकतात किंवा ब्राझील अमेरिका अर्जेंटिना या देशांमध्ये एकूण परिस्थिती आपल्या देशातली परिस्थिती हे पाहता एकूण सोयाबीन मागणी आणि पुरवठ्याचा गणित पाहता सोयाबीनचे भाव हे पुढील महिना दोन महिन्यांमध्ये साडेपाच हजारापर्यंत पोहोचू शकतात. असा अंदाज आहे. आपल्याला सगळं माहीतच आहे की, बाजारामध्ये जे काही वेगळे घटक आहेत. त्याचा परिणाम दरावर होतात. पण तरी सोयाबीनचे भाव सध्याच्या पातळीपेक्षा पुढे आपल्याला वाढलेले दिसू शकतात.

हेही वाचा -Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?

शेजाऱ्यांना सल्ला

त्यामुळे आपण जर आपला सोयाबीन विकायचा असेल तर कोणाच्या सांगन्यावर विश्वास न ठेवता. आपण स्वतः प्रत्यक्ष बाजारातली परिस्थिती पहावी. आपल्याला किती भावाने सोयाबीन विक्री परवडते याचा आढावा घ्यावा. थांबायचं का विकायचं त्याचा निर्णय आपण घ्यावा. आपल्याला आपला सोयाबीन विक्रीसाठी जी माहिती लागते. बाजाराची जी माहिती लागते. बाजारातील ज्या घडामोडी आहेत. त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो. त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहू.

आमचे सोशल मीडिया

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment