chia seed पारंपरिक शेतीला नवा पर्याय – चिया सीड च्या शेतीतून भरगोस उत्पादन व आरोग्यदाई फायदे

नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसातून लेख लिहीत आहे. आज लेखात आपण शेतीतील पारंपरिक पिके, व शेतीतील नवीन पर्याय या विषयी सविस्तर माहिती पाहणारा आहोत. chia seed शेती हा भारतातली मुख्य व्यवसाय आहे. भारतातील जवळपास 70% लोक शेती करतात. म्हणूनच भारत कृषीप्रधान देश समजला जातो.

आपण प्राचीन काळापासून शेती करत आलो आहोत. जसा काळ बदलत गेला तसा शेतातील पीक प्रकार हि बदलला. अगदी सुरुवाती पासून विचार केला तर मानव आधी आपली उपजीविका भागवण्यासाठी शेती करत आला आहे. त्यात तो स्वतःला पुरेल एवढंच उत्पादन घेऊ शकत होता. कारण त्याकाळात यांत्रिकीकरचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे त्याला सर्व कामे जनावरे व स्वतःच्या शक्तीवरच करावी लागत होती. त्याचा परिणाम शेतीतील उत्पदनावर होऊन उत्पादन खूप कमी प्रमाणात होत होते.

पुढील काळात पीक पद्धतीत बदल झाले, त्याच प्रमाणात यांत्रिकरनातं संशोधन होऊन यांत्रिक पद्धतीचा वापरात वाढ झाली. याचा परिणाम असा झाला कि शेतीच्या उत्पादनात वाढ होऊ लागली, यातूनच शेती हि व्यवसायिक बनली. यात नवीन पीक पद्धतीचा वापर होऊ लागला . ज्यातून उत्पादन वाढले व त्यामुळे शेती व शेतकरी याचे उत्पादन वाढले.

आता आपण पीक पद्धती कसा बदल झाला ते पाहू. सुरवातीला महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक भागात वेगवेगळे पिके घेतली जात होती. उदा. ज्वारी, हायब्रीड, साळ, भुईमूग, उडीद, तूर, नंतर च्या काळात ऊस, गहू, सोयाबीन, फळबागा , आता नवीन पीक येत आहेत जसे कि “चिया सीड ” तर आपण आज चिया सीड विषयी माहिती पाहणार आहोत.

“चिया सीड”- Chia seeds

आज शेतीला नवीन पीक चिया सीड या विषय आपण सविस्तर माहिती पाहू जसे कि, शेतीतून किती उत्पादन होईल याचे बियाणे कुठे भेटेल, या पिकाला किती भाव मिळेल याचे मार्केट, यावर यासाठि कोणत्या प्रकारची जमीन लागते. याची आपण सविस्तर माहित घेऊयात.

सिया सीड म्हणजे काय ?

चिया ही फुलांची वनस्पती, साल्व्हिया हिस्पॅनिकापासून मिळालेलं बीज आहे. जो की मूळ अमेरिका आणि मेक्सिकोमधील आहे. उशीरा का होईना परंतु सर्वात आरोग्यासाठी बियाण्यांपैकी बरीच लोकप्रियता याला मिळाली आहे.

काही लोक chia seed ला सुपरफूड असे देखील म्हणतात. चिया बियाण्यांनी बर्‍याच देशांमध्ये आपले स्थान बनवलेले आहे. आणि आता भारतातील बर्‍याच शेतकर्यांमध्ये ते सामान्य घटक बनत चालेला आहे. चिया बियाणे लहान काळे बियाणे आहेत. अनेक लोकांचा समज आहे की, चिया बीज म्हणजेच सब्जा होय. परंतु तसं काही नाही. सब्जा व चिया बीज मध्ये फरक आहे, दोन्ही वेगवेगळ्या बिया आहेत. फक्त दोन्ही बियाच आहेत एवढंच साम्य या दोन्हीत आहे. सब्जा हा जास्त काळसर असतो. तर चिया बीज (Chia Seeds) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात.

Soil Conservation : मृदा संवर्धन काळाची गरज…

Onion Export : कांदा निर्यात सुरू करा शेतकरी आक्रमक

vihir : मागेल त्याला विहीर, 4 लाख रु अनुदान

चिया आणि भारत

भारत सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते. केंद्र सरकारनं ठेवलेलं हे ध्येय गाठण्यात चिया बियाण्यासारखी पिकं मोठी भूमिका बजावू शकतात. चिया बियाणे या पिकाला सुपर फूड मानले जाते. साल्व्हिया हिस्पॅनिका हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हे प्रामुख्यानं फुलांचं रोप आहे. चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून चिया बियाण्याची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागात शेतकरी त्याची लागवड करत आहेत. हळूहळू त्याचा विस्तार इतर राज्यांतही होत आहे. अधिक नफा आणि कमी खर्चामुळे चिया बियाण्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

चिया शेती कशी केली जाते

चिया बियाणे लागवड पूर्णपणे सेंद्रिय आणि सोपी आहे. याची पेरणी दोन प्रकारे केली जाते. सुमारे एक ते दीड किलो बियाण्याची फवारणी तंत्राद्वारे एक एकर शेतात पेरणी करता येते. दुसरी पद्धत म्हणजे रोपं तयार करुन त्याची लागवड करणे. प्रथम रोपवाटिकेत बियाण्याद्वारे रोप तयार करता येतात. त्यानंतर भातासारखी याची लावणी केली जाते. या पद्धतीत लावणी केल्यावर एक एकरात अर्धा किलो बियाणे वापरले जाते. फवारणीच्या पद्धतीमध्ये कष्ट कमी आणि बियाणं जास्त लागते. तर, लागण पद्धतीतं ज्यादा श्रम करावं लागतं.

चिया शेतीसाठी वातावरण आणि जमीन

चिया बियाणे पिकाच्या लागवडीसाठी मध्यम तपमान आवश्यक असतं. थंड हवामान आणि डोंगराळ भाग वगळता संपूर्ण भारतात त्याची लागवड करता येते. कृषी तज्ञांच्या माहितीनुसार चिया बियाणेचे उत्पादन तपकिरी मातीत चांगले होते.

मशागत कशी करावी

चिया बियाण्यांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी शेताची चांगली मशागत करण्याची गरज असते. लागवडीपूर्वी पहिल्यांदा दोन किंवा तीन वेळा नांगरणी करून माती बारीक घ्यावी लागते. चांगल्या उगवणीसाठी पेरणीपूर्वी शेताला चागंली घात असणं आवश्यक आहे.

पेरणी कालावधी

चिया बियाण्यांच्या पेरणीसाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिना ही चांगली वेळ समजली जाते. चांगल्या उत्पादनासाठी खुरपणी आवश्यक असते. किमान दोनदा तण काढणे आवश्यक आहे. एकरी बियाण्याचे प्रमाण 1 ते 1.5 किलो दरम्यान ठेवले जाते. चिया रोपातील अंतर किमान 15 सेमी असावे. खूप जवळ असलेल्या झाडांची वाढ चांगली होत नाही. चिया बिया नेहमीच 1.5 सेमी खोलीवर पेराव्यात यापेक्षा खोलीवर पेरणी केल्यास बियाणे खराब होण्याची शक्यता असते. बिया खराब होऊनये यासाठी बियास बुरशीनाशकाचा वापर केला जाऊ शकतो.

कालावधी

चिया बियाणे पीक 110 ते 115 दिवसात तयार होते. चिया बियाणे लागवडीसाठी सिंचनाची विशेष गरज नसते. याची रोप फार कमजोर असतात. शेतात पाणी साचल्याने ते तुटण्याची भीती असते. पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन चिया बियाण्याच्या लागवडीसाठी अधिक चांगली मानली जाते.

उत्पादन व विक्री

चिया बियाण्यांची किंमत सध्या 1000 रूपये आहे, अशा परिस्थितीत एकरात 6 लाख रुपयांची कमाई शेतकऱ्यांना करता येते. चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगतात. लागण केल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांनी कंपन्यांना दिली तर त्यांचे एजंट शेतातून खरेदी करतात. वेगवेगळ्या कंपन्या चिया बियाणे वेगवेगळ्या दराने खरेदी करतात.चिया बियाणे लागवडीने एक एकरातून सरासरी 5 ते 6 प्रति क्विंटल उत्पादन घेता येते, असं शेती करणारे शेतकरी सांगतात.

प्राण्यांचा धोका नाही

चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो. याच्या पानांवर केस वाढतात. यामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचवत नाहीत. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही. कापणी आणि काढणीच्यावेळी पीक उपटून काढले जाते, यानंतर ते वाळवले जाते आणि नंतर मळणीद्वारे बियाणे वेगळे केले जातात.

चिया आणि आरोग्य

चिया बियाणे पोषण समृद्ध असतात. ते प्रथिने, ओमेगा 3 आणि फायबर या घटकांनी समृद्ध असतात. सब्जा बियाण्यांमधील प्रथिनेंच्या प्रमाणात, फायबर देखील आढळते. यामुळे सब्जा वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते. सब्जा आहार म्हणून वापरला जाऊ शकतो. तसेच यामध्ये झिंक, व्हिटामिन बी-3, पोटॅशिअम, व्हिटामिन बी-1 आणि व्हिटामिन बी-2 आणि व्हिटामिन ई हे असतो.

चिया सीड पासून होणारे आरोग्यदायी फायदे

  1. चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात ज्यामुळे नवीन स्नायू तयार करण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त, शरीरात आवश्यक प्रमाणात प्रोटीन देखील पूर्ण होते.
  2. Chia seed च्या सेवन त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात असणारे अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण आपल्या त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. तसेच त्वचेमध्ये कडकपणा निर्माण करण्यास मदत करते.
  3. ऍनीमिया समस्या, मुख्यतः गर्भवती असलेल्या स्त्रियाना होतो. रक्तवाहिन्यांचे एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये रक्ताची कमतरता भासते. ती कमतरता चिया च्या सेवनाने भरून काढता येते.
  4. चिया बीज च्या सेवनाने पाचन तंत्र चांगले होण्यास मदत होते. त्यामध्ये फायबरची मात्रा उपलब्ध असते. फायबर हे पचन प्रणालीसाठी एक पौष्टिक पदार्थ मानला जातो.
  5. मेमरी पॉवर युवकांमध्ये कमकुवत होण्याची समस्या आहे, याचे कारण अयोग्य खानपान आणि वाईट सवयींचे परिणाम आहे. तसेच धूम्रपान आणि मद्य याचे अत्यादीक सेवन, स्मरण शक्ती कमी करते. स्मरण शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त..
  6. शरीराचे वजन वाढल्याने आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्यां उद्भवू शकतात. ज्यामध्ये मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक असतो. म्हणूनच, लठ्ठपणाची समस्या टाळण्यासाठी chia seeds चे सेवन करणे खूप फायदेशीर ठरेल असे तज्ञाचे मत आहे.
  7. भूक नियंत्रित करून वजन कमी करण्याचे गुणधर्म चिया मध्ये आहेत. जर आपण दररोज हे सेवन केले तर, यामुळे भूक कमी होईल जेणेकरून आपण कमी प्रमाणात अन्न खाऊ त्यामुळे आपले वजन कमी होईल.
  8.  जर तुम्ही chia seed चे सेवन केले, तर याद्वारे तुमच्या केसांना व्हिटॅमिन बीचा पुरवठा मिळतो. यामुळे केस निरोगी व दाट राहतील, तसेच डोक्यातील कोंडा आणि केस गळती पासून आपली सुटका होण्यास मदत होईल.

चिया सीड च्या आतिवापरा मुळे होणारे नुकसान

  • एलर्जी होणे
  • पोट खराब होणे.
  • कमी रक्तदाब
  • औषधासह खाण्यामुळे समस्या
  • घशात अडकणे

चिया बियांचे पौष्टिक मूल्य

  • कॅलरीज (kcal) 131
  • चरबी 8.4
  • कार्ब्रोहायड्रेट 13.7
  • फायबर 11.02
  • प्रथिने 5.6
  • साखर 0.0

शेतकऱ्याचे मनोगत

आम्ही धाराशिव तालुक्यातील प्रगतशील चिया उत्पादक शेतकरी यांच्याशी चर्चा केली त्यांनी चिया शेती व उत्पादन या विषयी आम्हला माहिती दिली.

रब्बी हंगामात येणारे चिया सीड हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या पिकाच्या माध्यमातून आपण भरगोस उत्पादन घेऊ शकतो. या पिकाला कुटल्याहि प्राण्याचा किंवा डुकरांचा त्रास नाही किंवा ते पिकाला खात नाहीत.रबीच्या गहू, हरभरा, ज्वारी पेक्षा चिया हे ज्यास्त उत्पादन देणारे पीक आहे.याला क्विंटल ला 15 ते 20 हजारापेक्षा जास्त भाव राहतो.

चिया सीडचा एकरी खर्च दहा हजार रुपयाच्या आस पास येतो. व उत्पादन एक ते दिड लाख रुपयांचा आसपास होते. याची शेती पूर्ण पणे सेंद्रिय पद्धीतीने केली जाते. त्यामुळे खर्ची हि कमी येतो.

माझ्या उत्तम प्रतीचे बियाणे उपलबद्ध आहे. कोणाला काही माहिती हवी आल्यास खालील नंबर वर कॉल करू शकतात.

प्रशांत माने, खामसवाडी 9604044726

ता.जि. धाराशिव

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment