PM Kisan योजनेची लाभार्थी यादी येथे तपासा आपले नाव

PM Kisan योजनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजने मध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हि रक्कम चार महिन्यातून एकदा, वर्षांमध्ये ३ हप्ते अशी दिली जाते. PM Kisan योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.

PM Kisan केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी, ही योजना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूरमध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 2019 च्या आधी ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी योजना आहे या योजनेचे आतापर्यंत 14 हप्ते पडलेले आहेत. आणि बहुप्रतिक्षित असलेला पंधरावा हप्ताही नुकताच पडलेला आहे. परंतु आपला हप्ता हे तपासण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणले आहेत. ज्याचा उपयोग करून आपण अगदी सोप्या पद्धतीने आपला पंधरावा हप्ता पडला आहे, की नाही हे तपासू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला खालील टिप्स चा वापर करावा लागेल.

हेही वाचा 👉Namo Shetkari Sanman Scheme

अधिकृत वेबसाईट

सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. pmkisan.gov.in या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटच्या मुख्य पेजवर जाल. तिथे तुम्हाला खालील प्रमाणे एक पेज दिसेल. हे अधिकृत संकेतस्थळाचे होमपेज असेल. येथे तुम्हाला विविध पर्याय दिसतील.या संकेतस्थळा वरती तुम्ही pm kisan योजने संबंधीत माहिती पाहू शकता.या संकेत स्थळाचा वापर करून तुम्ही पुढील हफ्ता ची तारीख पाहू शकता. या मध्ये नवीन शेतकरी registration, स्टेटस, e-KYC इत्यादी.आपण आजच्या ब्लॉग मध्ये know your status, registration नंबर आणि beneficiary list कशी चेक करावी हे पाहणार आहोत.

Know Your Status

वरील पेज वर गेल्या नंतर तुम्ही ते पेज थोडस वर ढकला तिथे तुम्हला काही पर्याय दिसतील. त्यातील तुम्ही Know Your Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.जे तुम्हाला e-KYC या बॉक्स च्या खाली दिसेल.वरील पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर आणखी एक पेज येईल ते खालील प्रमाणे असेल. यानंतर तेथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेश registration no टाकावा लागेल.

जर तुमच्या कडे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर registration no नसेल तर तुम्ही खालील प्रकारे तुमचा registration no जाणून घेऊ शकता आणि परत मागील पेज वरती येऊन जो मिळालेला registration नंबर आहे तो टाकून स्टेटस जाणून घेऊ शकता.

Know Your registration no

त्याच पेजवर उजव्या बाजूला Know Your registration no या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक अस पेज येईल. या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल.

OTP

आता तुम्हला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर एक OTP येईल. OTP तेथे टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक दिसेल. तुम्हला तुमच्या PM kisan चे स्टेटस कळेल.

हेही वाचा👉PM Kisan योजना हे काम लवकर करा अन्यथा मिळणार नाही 15 वा हप्ता

Beneficiary List

तुम्हाला तुमच्या बरोबर गावातील इतर लोकांचे स्टेटस पहायचे असेल तर , तुम्हाला pm kisan वेबसाईटवर जाऊन beneficiary List पर्याय निवडावा लागेल.या नंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावचे नाव टाकावे लागेल. या नंतर तुम्ही Beneficiary List डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह, गावात आणखी कोणाला लाभ मिळाला ते पाहू शकता.तुम्हाला PM Kisan सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता घ्यायचा असेल आणि त्याआधी तुमचे नाव PM Kisan लिस्टमध्ये आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही ते अगदी सहज पाहू शकता. तसेच, PM Kisan योजनेचे लाभार्थी यादी गावनिहाय पाहण्यासाठी, तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.

हेही वाचा👉Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार..!

हेल्पलाईन क्रमांक

Pm kisan योजनेशी संबंधित कोणत्याही अडचणी साठी तुम्ही Pm kisan योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि माहिती मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही pm kisan योजनेचे स्टेटस चेक करण्या साठी 155261 वर कॉल करू शकता.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment