शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटीची पीक Vima भरपाई
Pikvima सहा जिल्ह्यातील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल.
खरीपपिक विमा pikvima
पंतप्रधान खरीपपिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई ची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार सहा जिल्ह्यातील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई चार दिवसात मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल. अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे 26000 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
सध्याची परिस्थिती पाहता धाराशिव, अकोला, परभणी, जालना, नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे.
नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यासाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली, असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकाचे दावे मान्य केले आहे.
या जिल्ह्यांना लवकरच मिळणार रक्कम
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले, असून कापूस पिकाचा दावा माधवा अमान्य करण्यात आला आहे,
सांगली, कोल्हापूर, परभणी, नागपूर या जिल्ह्यामध्ये कंपन्याकडून कोणता कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते. मंगळवार नंतर येतील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या जिल्ह्यामधील तिढा कायम
धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून, कंपन्यांनी सर्वच पिकाचे दावे मान्य केले आहेत. दोन ते तीन दिवसाच्या शेतकऱ्यांना या अंतिम होऊन जिल्ह्यामध्ये देखील नुकसान भरपाईचे वितरण केले जाईल.
बीड, बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यासाठी विभागीय स्तरावरील सोनावणे नंतर कंपन्यांनी कृषी विभागाकडे आक्षेप घेतला होता. आता केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर धाराशिव
पुढील आठवड्यात अग्रीम विमा मिळणार…! पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदेय 25% ग्रीन रक्कम पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार असून. या माध्यमातून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये मिळणार आहे.
खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. गरीबाची पिके नगदी उत्पन्न देणारे असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्था मुख्याता याच पिकावर अवलंबून असते. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा व विमा प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणी मध्ये जिल्ह्यातील 40 महसूल मंडळात पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली होती. या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात अग्रीम विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे. पिकाच्या नुकसानी पोटी टक्केवारी पाहत आहेत तरी 5000 ते 6000 रुपये मिळणे अपेक्षित आहे.
उर्वरित 17 महसूल मंडळातील पीक परिस्थितीचा अहवाल घेऊन या मंडळांना देखील अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. विमा कंपनीने यावर काही हरकत घेतल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून त्या हरकतीचे निरसन करण्यात येत असून, शासन स्तरावून देखील विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंडळांना देखील दिवाळीपूर्वी अग्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.