तपशील
Nano Urea सध्या महाराष्ट्रामध्ये कृषी कायदे आणि खत औषध विक्रेते यांच्यामध्ये तणावाचं वातावरण सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने काही कायदे केले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी येत्या पाच डिसेंबर पासून महाराष्ट्र मधील सर्व कृषी निविष्ठा दुकाने बंद राहतील. असं कृषी दुकानदारामार्फत सांगण्यात आलेला आहे. आपण आज युरिया या खताविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. भारत हा कृषी प्रधान देश आहे. यात शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी हि माहिती आहे.
Nano Urea
युरिया आणि शेती हे एक समीकरण झाले आहे. कुठल्याही पिकासाठी शेतकरी युरिया खताला प्राधान्य देत असतात. मात्र हल्ली खताच्या किमती देखील भरमसाठ वाढल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिला साधा एक बाब म्हणजे प्रथमच युरिया हे नॅनो प्रकारात आले असून त्याची ड्रोन मार्फत फवारणी करता येऊ शकते. त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
नॅनो युरिया ड्रोनद्वारे फवारणी
नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावातील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र केदार यांच्या शेतातील टोमॅटो पिकावर ड्रोन द्वारे नॅनो युरिया फवारणी करण्यात आली. यानंतर नॅनो युरिया नेमकं काय आहे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
नॅनो युरिया विषयी महत्त्वाचे
इंडिया फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ने (इफ्को) देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला. नॅनो युरिया हा युरिया खताचा एक प्रकार आहे. याच्यामुळे खर्चात आणि शेतकरीच्या वेळेमध्ये बचत होते. आजचा विचार केला तर युरियाची 45 किलोचे बॅग 3800 रुपयांना मिळते. त्यात सरकार द्वारे सबसिडी देऊन शेतकऱ्यांना तीच बॅग 265 रुपयांना दिली जाते. मात्र नॅनो युरियाची अर्धा लिटरची बॉटल 225 रुपयांना मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. एका अर्ध्या लिटर मध्ये जवळपास एक एकरावरील पिकावर फवारणी केली जाऊ शकते.
Nano Urea म्हणजे काय ?
नॅनो युरिया व डीएपी हे एक आधुनिक नत्र व स्फुरदयुक्त द्रवरूप खत आहेत. जी पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्य पुरवतात. नॅनो युरिया हे एक द्रवरूप नत्रयुक्त खत असून त्यामध्ये चार % नत्र नॅनो कनाच्या स्वरूपात असतो. त्यातील नॅनो नत्र कनाचा आकार हा 30 ते 50 नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरिया मध्ये नत्राचे कण अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात. तसेच त्यांचे पृष्ठभाग्य क्षेत्रफळ हे पारंपारिक युरिया पेक्षा 10000 पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता 90% पर्यंत असते. जी पारंपारिक युरियामध्ये 30 ते 50 टक्के असते.
फायदे
खतांच्या वापरा मुळे पिकाच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यात नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे पीकांची फास्ट वाढ होते .शेतकऱ्याच्या खर्चात बचत होते. पिकाची गुणवत्ता वाढते. नॅनो युरियाची 500 ml ची एक बॉटल आणि 45 kg ची एक बॅग यांची कार्यक्षमता सारखी असते. त्यामुळे पारंपरिक युरिया वरील शेतकऱ्याचे अवलंबन कमी होत आहे. त्याच बरोबर साठवणूक वाहतूक यावरचा खर्च देखील वाचतो. त्याच बरोबर खताचा होणार अपवेय देखील कमी होऊन पिकांना त्याचा ज्यास्त फायदा होतो. नॅनो युरिया हे स्वदेशी आणि विनाअनुदानित खत आहे.
नॅनो युरियाची फवारणी करताना घ्यावयाची काळजी
नॅनो युरिया अलिक्विड स्वरूपातील असल्यामुळे याची फवारणी करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. विशेषतः ड्रोन द्वारे नॅनो युरियाची फवारणी केली जात आहे. मात्र ड्रोन नसल्यामुळे फवारणी कशी करावी हे देखील महत्त्वाचे आहे. सूक्ष्म कणाने व पाणी पूर्ण ओली होण्यासाठी प्लांट फॅन किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा. फवारणी सकाळी किंवा दिवस मावळण्याच्या वेळेस करावी. फवारणी करताना पानावर ओल नसावी फवारणी करताना कमीत कमी दोन तास पाऊस येणार नाही किंवा त्या पिकावर पाणी पडणार नाही. याची काळजी घ्यावी. नॅनो युरियाची फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा तसेच फवारणीच्या वेळी मास्क व हातमोजे वापरावे. त्याबरोबर कोरड्या ठिकाणी साठवण करावी.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.