Namo Shetkari Sanman Scheme शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता कधी मिळणार.?

Namo Shetkari Sanman Scheme

Namo Shetkari Sanman Scheme शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्या नंतर देवेन्द्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून काही दिवसा पूर्वी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती.

केंद्र सरकारचे शेतकरी योजनेचे पैसे तर वेळेवर मिळत आहेत. परन्तु राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते कधी मिळणार, या बाबत शेतकऱ्याच्या मनात उत्सुकता होती. ती लवकरच पूर्ण होईल कारण राज्य सरकार दसऱ्याच्या आसपास नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच टाकण्याचा तयारीत आहे .

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या पहिल्या हप्त्यासाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. दुसरा हप्ता लगेचच पुढील महिन्यात वितरित करण्यात येतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी निधीच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

या योजनेअंतर्गत वर्षभरात तीन हप्त्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये असे 6 हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चअखेर देणे प्रस्तावित आहे.

शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता कधी मिळणार.?

राज्य सरकारने जाहीर केलेल्या Namo Shetkari Sanman Scheme नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण लवकरच म्हणजे (दि.26 ) रोजी गुरुवारी होणार आहे.शिर्डी येथे गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे वितरण होणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी,तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्याचे मंत्रिमंडळ देखील या कार्यक्रमाला उपस्तीत राहणार आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी व शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्या साठी जाहीर करण्यात आलेल्या नमो योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती.

या योजनेअंतर्गत वर्षभरात तीन हप्त्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये असे ६ हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चअखेर देणे प्रस्तावित आहे.

Namo Shetkari Sanman Scheme
Namo Shetkari Sanman Scheme

हप्ता वितरणास इतका वेळ का?

राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करून बराच कालावधी उलटला आहे. शेतकऱ्यांना ही या हप्त्याची प्रतीक्षा होती. पहिला हप्ता वितरणास इतका विलंब लागण्या मागचे खरे कारण म्हणजे महाआयटी ने लावलेल्या विलंब आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिगराईमुळे नमो च्या वितरणास विलंब होत होता.

शेतकरी सन्मान योजने च्या 14व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात राज्याच्या या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील असे सांगितले जात होते.मात्र कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवित पुन्हा पडताळणी केली त्यात 7 लाख 41 हजार शेतकऱ्याची भर पडली आहे.

किती शेतकऱ्याना मिळतो लाभ …!

केंद्रचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख झाली आहे. तसे पाहता केंद्राचा 14 वा हप्ता व 85.60 लाख शेतकऱ्यांना दिला गेला आहे.

तरी आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपणार आहे. ही शेतकऱ्यां साठी आनंदाची बाब आहे.

त्यावेळचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या काळात ही योजना कृषी विभागाने तयार केली होती. त्या वेळी या योजनेचे ‘मुख्यमंत्री शेतकरी महासन्मान योजना’ असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी या योजनेचा प्रस्ताव गेल्यानंतर फडणवीस यांनी या योजनेचे नाव ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ असे बदलत शिंदे गटाला शह दिला होता. त्यामुळे सत्तार हे नाराज होते.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment