Namo Farmer : नमो शेतकरी योजना हप्ता कधी मिळणार

Namo Farmer

Namo Farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यात खातेवाटप्राची प्रक्रिया पूर्ण झालेले आहे. यामध्ये अर्थ खात्याची जबाबदारी आदरणीय अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तरी लवकरच शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पडणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.

मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये पात्र असाल चौदावा हप्ता तुमच्या खात्यावरती आलेला असेल काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता पैसे येणार आहेत. ज्यांचे राहिलेले आहेत त्यांच्या खात्यावरती परंतु आता नमो महा सन्माननीय योजनेचा हप्ता बाकी राहिलेला आहे तो हप्ता आता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यामुळे आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देखील मिळणार आहेत. तुम्हाला सुद्धा शासन निर्णय बघायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही शासन निर्णय बघू शकता.

 शेतकरी मित्रांनो सध्याची निसर्गाची अनियमितता पावसाचे पावसाचे असमतोल प्रमाण त्यामुळे शेतीतील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढलेला आहे. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणार आहे. तरी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच आपल्या खात्यात जमा होईल अशी आशा आहे.

Namo shetkari maha samman nidhi yojana

Namo shetkari maha samman nidhi yojana : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देते आहे. त्याच प्रकारे राज्य सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळं आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12000 रुपये येणार आहेत. म्हणजे प्रत्येकी चार महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत. 

( Swaminathan Commission ) शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, कोणाला मिळणार लाभ

दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ लवकरचकरण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळं शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ज्या बँक खात्याचा तपशील दिलाय तोच यासाठी द्यावा लागणार आहे.

85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ 

गुरुवारी (27 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्राधन नरेंद्र मोदी हे काल शिर्डीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्त विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यानंतर मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. काल पंतप्रधानांनी  एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्याच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून शुभारंभ करण्यात येईल.

या योजनेची पात्रता काय?

  1. फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  2. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  3. अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  4. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा 
  5. शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  6. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  7. अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  8. या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
  9. शासकीय सेवेत काम करत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

आमचे सोशल मीडिया

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment