ध्यान म्हणजे काय ? (what is Meditation?)
ध्यान हा एक मानसिक अभ्यास आहे ज्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीला शांती आणि जागरूकता मिळवता येईल.ध्यान हे मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्याच्या विकासाच्या उपायात आलेली एक प्रक्रिया आहे.
ध्यानाची आवश्यकता
ध्यान ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्याने आपला आत्मविकास आणि मानसिक आरोग्य सुधारून त्याच्या जीवनातील महत्त्वाच्या भूमिकेला आणते. या अद्भुत प्रक्रियेने आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
ध्यान करण्याचे फायदे
ध्यानधारणा करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. तुम्ही जर ध्यानसाधना करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे फायदे माहीत हवेत.
मन शांत ठेवते
अनेकदा काही विचारांनी (meditation anxiety) आपल्या डोक्यात काहूर माजलेले असतात. तुमचं डोक शांत नसतं. अशावेळी तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी ध्यान मदत करते. तुम्ही ज्यावेळी शांत राहून मनात चांगले विचार आणता त्यावेळी तुमचे मन शांत होते.
एकाग्रता वाढवते
तुमच्या भरकटलेल्या विचारांना नियंत्रणात ठेवण्याचे काम ध्यानसाधना करते. जर एखाद्या कामामध्ये तुमचे मन लागत नसेल आणि तुम्हाला एकाग्र होण्याची गरज असेल तर तुम्ही अगदी हमखास ध्यानसाधना करायला हवी. कारण त्यामुळे तुम्हाला एकाग्रता वाढण्यास मदत होईल. कोणतेही महत्वाचे काम करण्याआधी तुम्ही ध्यानसाधना करा तुमच्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने काम होईल.
मानसिक तणाव कमी करते
अनेकदा आपण कामाच्या घरच्या अनेक समस्यांमुळे उद्विग्न झालेले असतो. काहीही करण्याची इच्छा अशावेळी आपल्याला नसते. हा तणाव तुमच्या मनावर परिणाम करतो. तुम्ही चारचौघात कितीही छान वावरत असलात तरी तुम्हाला मानसिक तणाव आलेला असतो. या तणावामधून तुम्हाला बाहेर काढण्याचे काम ध्यान साधना करत असते. तुमच्या मनामध्ये राहून गेलेली अढी काढण्याचे काम ध्यान साधना करत असते.
संगीत साधन ही ध्यानधारणे मधील एक महत्वाचा भाग आहे. तर खालील संगीत तुम्ही वापरून ध्यान करू शकता.
https://www.artofliving.org/in-en/meditation/relaxing-music-meditation
व्यसनाधीनता दूर करते
व्यसनाधीनता ही कोणत्याही औषधाने कमी होत नाही.त्यासाठी तुम्हाला तुमचे मन घट्ट करावे लागते. तुम्हाला व्यसनाधीनता दूर करायची असेल तर तुम्ही ध्यानसाधना करायला हवी. तुम्ही जितके ध्यान कराल तितके तुम्हाला तुमच्या वाईट सवयींपासून दूर राहण्याची शक्ती मिळेल. तुमचा जास्ती जास्त वेळ तुम्ही स्वत:ला समजवण्यात घालवाला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
मेंदूचे कार्य करते सुरळीत
आता तुम्ही केवळ तणावात आहात म्हणूनच तुम्हाला ध्यान साधना करण्याची गरज असते असे नाही तर तुम्हाला तुमच्या शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठीही ध्यानसाधना मदत करते. तुमचे मन शांत झाल्यामुळे ध्यानसाधनेमधून तयार होणारी उर्जा तुमच्या मेंदूला चालना देण्याचे काम करते.
नवा दृष्टिकोन देते
कधी कधी तुमच्या आयुष्यातील सगळ्या दिशा तुम्हाला चुकीच्या वाटू लागतात. काय करावे काय करु नये असे तुम्हाला वाटू लागते. अशावेळी तुम्हाला नवा दृष्टिकोन देण्यासाठी ध्यानसाधना मदत करु शकते. कधी कधी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात किंला काळाच्या आड अशा काही गोष्टी निघून गेलेल्या असतात. तुमच्या मनातून बाहेर काढून तुम्हाला नवा दृष्टिकोन देण्याचे काम ध्यान करते.
रक्तदाब ठेवते नियंत्रणात
जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही ध्यानसाधना करायला हवी. कारण जर तुम्ही ध्यानसाधना केली तर तुमचे काही आजार नियंत्रणात आणण्यास मदत होईल. तुमचा रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात ठेवण्यात ध्यान तुम्हाला मदत करते.
दयाभावना वाढवते
तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीही ध्यानसाधना फार महत्वाची असते. जर तुम्ही ध्यान साधना केली तर तुमचा राग कमी होतो. राग कमी झाल्यामुळे आपसुकच तुम्ही शांत होता. एखादी व्यक्ती कितीही चिडली तरी तुम्ही रागावर नियंत्रण ठेवता. त्यामुळे आपसुकच तुमची दयाभावना वाढते.
उर्जा वाढवते
तुमच्या शरीराला आलेली मरगळ घालवण्याचे कामही ध्यान साधना करते. तुमच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचे काम ध्यान साधना करते. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला ध्यानसाधना करण्याची मनापासून गरज आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरीरला आवश्यक असलेली उर्जा तुम्हाला मिळेल. तुमच्या मनाला नवी उमेद मिळाल्यामुळे तुम्ही काहीतरी नवे करण्यासाठी सज्ज व्हाल. त्यामुळे उर्जा वाढवण्यासाठी तुम्ही उर्जा वाढवण्यासाठी तुम्ही ध्यानसाधना करा.
बुद्धी करते तल्लख
हल्ली आपण सोशल मीडिया आणि या सगळ्यामध्ये इतके गुंतलेले असतो की, सगळ्या गोष्टी आपल्याला गुगलच्या माध्यमातून करायची सवय झालेली असते. अनेकांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. जर तुम्हालाही काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर तुम्ही ध्यान साधना करायला हवी कारण त्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहण्यास तुम्हाला मदत मिळेल.
या गोष्टीही असू द्या लक्षात
आता तुम्हाला मेडिटेशन कसे करावे हे तुम्हाला कळले असेल पण काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणेही फार गरजेचे असते.
मेडिटेशन करणे म्हणजे तुम्हाला त्या काळात कोणत्याही हालचाली करायच्या नसतात. जर तुम्ही अशी हालचाल करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही.
मेडिटेशन दरम्यान तुम्ही ओंकार करु शकता किंवा नाम:स्मरण करु शकता.
मेडिटेशन करताना अगदी छान सैलसर कपडे घाला म्हणजे तुम्हाला कपड्याची अडचण येणार नाही.
ध्यान साधनेनंतर तुम्ही शक्य असेल तर शांत राहा. काही चांगले वाचा.
हेही वाचा => PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु : Vishwakarma Yojana Maharashtra 2023