Manoj Jarange Patil यांनी आता उपोषण स्थळावरून संवाद मध्यमा समोर बोलताना महत्त्वाची घोषणा केली आहे.
Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहेत. यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज अधिक आक्रमक झाला. आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. त्यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा चालू केला. यांच्या उपोषण आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. मात्र त्यांनी आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्याची मुदत देतो आहे. असं सांगितलं आहे तसंच उपोषण आपण मागे घेतलं असेही जाहीर केलं आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी भूमिका आता मनोज जरांगे पाटील यांनी यांनी घेतली आहे. सरकारने दोन महिन्याचा वेळ मागितला आहे. मराठा समाजला दोन महिन्यात आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे मी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत देतो. असं ते सुरुवातीला म्हणाले होते. मात्र नंतर त्यांनी दोन महिन्याचा वेळ सरकारला दिला आहे.
हेही वाचा👉Curfew धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी 144 लागू- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मात्र आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार हे देखील त्यांनी जाहीर केलं आहे.
दोन महिन्याची मुदत सरकारने मागितली आहे. त्यांना ती द्यायची का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना विचारला त्यानंतर 24 डिसेंबर पर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मनोज रंगे पाटील यांनी घेतली. 2 जानेवारीपर्यंत वेळ द्या असं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ व निवृत्त वकिलांचे शिष्टमंडळ यांच्या चर्चा झाली आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे या मागणीवर मनोरंजन पाटील ठाम राहिले आहेत. तसं सरकारला मुदतही 24 डिसेंबर पर्यंतच देणार असंही त्यांनी सांगितलं, पण नंतर त्यांनी दोन महिन्याची मुदत सरकारला दिली आहे.
कुणालाही अर्धवट आरक्षण नको असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे आणि उदय सामंत यांनी 2 जानेवारीपर्यंत मुदत द्यावी असा आग्रह धरला होता. तसेच आता जर दगा फटका केला तर मुंबई बंद करू असा इशाराही मनोज रंगे पाटील यांनी दिला आहे. मला आता रस्त्यावर उपोषण बंद करून रस्त्यावर आंदोलन सुरू करावा लागेल. असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा केली आता जर दगा पटका केला तर मुंबईचं नाक बंद करू असाही इशारा मनोज रंगीनी दिला आहे.
हेही वाचा👉Curfew धाराशिव जिल्यातील संचारबंदी शिथिल, जमावबंदी व शस्त्रबंदी कायम
मनोज रंगे पाटील यावेळी कार्यकर्त्यांना म्हणाले, आपण या दोन महिन्यात जंगी तयारी करू. आपलं आंदोलन सुरूच ठेवू. राज्य सरकारला दीड ते दोन महिने हवे आहेत. सरकारला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काम करायचा आहे. त्यांनी तीन आयोग स्थापन केले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाला यासाठी काम करायचा आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीला काम करायचा आहे. आणखी एक सल्लागार समिती मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. त्या समितीलाही काम करायचे आहे म्हणून. हे सगळं मराठ्यांना टिकणार आरक्षण देता यावं म्हणून करायचं आहे. असं राज्य सरकारच म्हणणं आहे.जरांगे पाटील म्हणाले राज्य सरकार आपल्याकडे वेळ मागते आहे.
मी उपोषण मागे घेतल्यानंतर आठ दिवसात बरा होऊन परत येईन. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याचा दौरा करू. राज्यातल्या गावागावातल्या लोकांना भेटू. दोन महिन्यांनी काय होतं ते पाहू. गेली 35 ते 40 वर्ष आपण वाट पाहिली आहे. आता अजून दोन महिने वाट पाहू.
परंतु आता यांनी दगा फटका केला तर आपण यांच्या पूर्ण नाड्या बंद करून याची आर्थिक नाडी बंद करू यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या बंद करू. तसेच मुंबईची नाकेबंदी करू. मुंबईचे नाक बंद करून टाकू. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना चलो मुंबई चा नारा देऊ. सरकारमधील लोकांना घराबाहेर पडता आलं नाही पाहिजे त्यासाठी मुंबईत ठिय्या मांडू मुंबईला भाजीपाला सुद्धा मिळू द्यायचा नाही असं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष्य महाराष्ट्रातील सरकार काय निर्णय घेईल या कडे लागले आहे.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.