Lek Ladki Yojana-2023 शिंदे-फडणवीस सरकार कडून “लेक लाडकी” योजनेची घोषणा,18 व्या वर्षा पर्यंत मिळणार 1 लाख रुपये

Maharashtra Cabinet Decision शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार,लेक लाडकी योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार, तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहे.

lek ladki yojana आहे तरी काय ?

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.या बैठकीत मुलींसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला.मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची lek ladki yojana घोषणा झाली होती, या योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्या पासून ते सज्ञान होई पर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे.या योजनेनुसार राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत.तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मुलीला 75000 रुपये रोख देण्यात येणार आहेत.

मुलींना किती मिळणार आर्थिक मदत

या लेक लाडकी योजनेचा lek ladki yojana लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटूंबातील मुलींना मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पाहिलीत गेल्यास 6000 रुपये, सहावीत गेल्यास 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यास 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षीची झाल्या नंतर तिला रोख 75000 रुपये देण्यात येतील.

कश्या प्रकारे मिळेल मुलींना आर्थिक मदत

Alt-text-Lek-Ladki-Yojana
  • मुलगी जन्माला आल्या नंतर 5000 रुपये
  • मुलगी पाहिलीत गेल्यास 6000 रुपये
  • मुलगी सहावीत गेल्यास 7000 रुपये
  • मुलगी अकरावीत गेल्यास 8000 रुपये
  • मुलगी आठरा वर्षाची झाल्यावर 75000 रुपये
  • अशा रीतीने मुलीला ऐकून 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.

लेक लाडकी योजना 2023 पात्रता

  • lek Ladki Scheme साठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
  • ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
  • महाराष्ट्रा बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक कुटूंबातील मुलीच याचा लाभ घेऊ शकतात.
  • योजने साठी मुलीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.
  • जास्तीत ज्यास्त दोन मुली किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर त्यातील मुलीला मिळणार .
  • 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी हि योजना.
  • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
  • मात्र आई वडिलांना कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • 1 एप्रिल2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • जुळ्या दोन्ही मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

योजने साठी आवश्यक कागदपत्र – खालीलप्रमाणे

  • मुलीच्या आईवडिलांचे आधार कार्ड
  • मुलीचे आधारकार्ड
  • मुलीचा जन्म दाखला
  • महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर ईमेल आयडी
  • बँक खाते नंबर

मुलींसाठी असणाऱ्या इतर योजना

सुकन्या योजना

सुकन्या समृद्धी योजना हि अल्प बचत योजना आहे. या अंतर्गत जन्मापासून ते 10 वर्षा पर्यंतच्या मुलींसाठी खात उघडता येत. या योजनेत पालक मुलीच्या नावाने खात उघडू शकतात .या मध्ये किमान 250 रुपयात खात उघडता येत.सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत आर्थिक वर्षात तुम्ही दिड लाखा पर्यंत गुंतवणूक करू शकता.या मध्ये सध्या 8% व्याज दिल जात. तुम्ही 21 वर्षानंतर संपूर्ण रक्कम कडू शकता.

उडान योजना

उडाण योजना (UDAN) ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत सुरु केलेली योजना आहे.शालेय शिक्षण आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा मधील अंतर कमी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) ही योजना सुरु केली आहे.10 वि मध्ये किमान 70 %आणि विज्ञान आणि गणित विषयात 80 % मिळालेल्या विद्यार्थीनि या उडान योजनेत अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी https://www.cbse.gov.in/ किंवा www.cbseacademic.in या वेबसाइडवर अर्ज करू शकता.

आमची माहिती आवडल्यास आमच्या तरुण विचार या व्हाट्सअँप चॅनलला नक्की Follow करा

1 thought on “Lek Ladki Yojana-2023 शिंदे-फडणवीस सरकार कडून “लेक लाडकी” योजनेची घोषणा,18 व्या वर्षा पर्यंत मिळणार 1 लाख रुपये”

Leave a Comment