AADHAR मध्ये पता उपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
AADHAR अनेकांना नोकरी किंवा कामासाठी वारंवार शहरे बदलावी लागतात. अशा परिस्तिथीत,अनेकदा असे दिसून येत कि जेव्हा लोक त्यांचे शहर किंवा पत्ता बदलतात तेव्हा ते आधारमध्ये aadhar अपडेट करू शकत नाहीत. त्यांना वाटते की हा एक त्रास आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोतो की, तुमचे काम घरच्या घरी मोबाईल वर होऊ शकते. आता मानसा कडे वेळ कमी आहे. आणि आधार AADHAR सेंटरवर जाऊन तासन तास बारीत बसण्यासाठी कोणा कडे वेळ नाही. त्यामुळे हि माहिती तुमच्या साठी खास महत्वाची आहे.
आधार aadhar कार्डमध्ये घराचा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही ते घरी बसल्या ऑनलाईन अपडेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला 50 रुपये ऑनलाईन पेमेंट , त्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आधार कार्डमध्ये प्रत्येक नागरिकाचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार द्वारे जारी केलेल्या युनिक क्रमांकाची बायोमेट्रिक माहिती असते. आधार कार्डमध्ये दिलेली माहिती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधीच दिलेल्या माहितीनुसार आधार जनरेट करण्याची सुविधा प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे. असून आधार कार्ड जारी करणारी संस्था ते जारी करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषांमध्ये आधार कार्ड बनवायचे असेल. तर काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्या आपण या ब्लॉग च्या मध्यमातुन जाणून घेऊया.
आधार मध्ये पत्ता कसा अपडेट करायचा
- सर्वप्रथम UIDAI myaadhaar.uidai.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जा.
- येथे लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार AADHAR क्रमांक टाकावा लागेल. यानंतर कॅपच्या कोड टाका आणि पाठवा OTP वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो तेथे टाका आणि लॉगिन करा.
- आता आधार अपडेट पर्यावर जा यानंतर प्रोसीड टू आधार अपडेट या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर पुढील पेजवर पत्ता निवडा आणि प्रोसिड टू आधार अपडेट या पर्यायावर क्लिक करा.
- असे केल्याने तुमचा सध्याचा पत्ता तुमच्या समोर येईल.
- यानंतर तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या पत्त्याचा पर्याय दिसेल.
- येथे तुम्हाला तुमच्या नवीन पत्त्याची माहिती भरावी लागेल.
- यानंतर तुम्हाला एक कागदपत्र सबमिट करावे लागेल ज्यावर तुमचा नवीन पत्ता असेल.
- यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या दोन्ही चेक बॉक्स वर क्लिक करावे लागेल आणि नेक्स्टवर क्लिक करावे लागेल.
तुम्ही कागदपत्र शिवाय तुमचा पत्ता उपडेट करू इच्छिता
UIDAI कुटुंबप्रमुखांच्या परवानगीने आधार AADHAR मध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा देखील प्रदान करते. या अंतर्गत ऑनलाइन आधार ऍड्रेस अपडेट साठी घराचा प्रमुख आपल्या मुलाचा जोडीदाराचा पालकाचा पत्ता मंजूर करू शकतो. 18 वर्षावरील कोणीही HOF असू शकतो.
ही आहे प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल.
- लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार AADHAR क्रमांक टाकावा लागेल. यानंतर कॅपच्या कोड टाका आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो प्रविष्ट करा आणि लॉगिन करा.
- यानंतर तुम्हाला ऑनलाईन अपडेट सर्विस चा पर्याय मिळेल तो निवडा.
- यानंतर तुम्ही हेड ऑफ फॅमिली HOF आधारित आधार अपडेट वर क्लिक करा.
- यानंतर कुटुंबप्रमुखांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला पन्नास रुपये सर्विस चार्ज भरावा लागेल.
- यानंतर HOF ला पत्ता अपडेट करण्याची परवानगी पाठवावी पाठवली जाईल.
- यानंतर HOF ला त्याची परवानगी द्यावी लागेल.
वरील दोन्ही पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचा पत्ता घरबसल्या अपडेट करू शकता.तुम्ही तुमचा वेळ व पैसा वाचवू शकता.
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्वाचे असलेले ओळखपत्र आहे. या महत्त्वाच्या कागद्पत्रा मध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, वय लिंग आणि व्यवसाय यासंबंधित माहिती दिलेली असते. आधार कार्ड हा भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण ओळख करून देणारा कागद आहे. भारत सरकार आणि आधार प्राधिकरण यंत्रणा यांच्या एकत्रित पणे आधार कार्डची योजना देशभरात राबवली जाते.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.