kanda : कांदा दरवाडी बाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

kanda : कांदा दरवाड

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्या मध्ये सध्या नाराजी दिसून येत आहे. कारण शेतकऱ्याचा कांदा बाजारात येत होता आणि त्याला योग्य भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे त्यामुळे कांद्याचे भाव खूप खाली आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजेच एनसीसीएफ आणि नाफेडने राज्यात कांदा खरेदीला सुरुवात केली असून, प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे.

kanda कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष कमी करून योग्य दर मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात ‘एनसीसीएफ’ने तातडीने तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील 12 केंद्रांवर लाल कांद्याची या माध्यमातून खरेदी सुरू झाली.

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.  तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते.

कोण करणार कांदा खरेदी

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांच्यामार्फत कांदा खरेदी केला जातो. शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेला कांदा या संस्था देशात दर स्थिरीकरण योजनेंतर्गत मागणी असलेल्या शहरांमध्ये पाठवितात. तेथे 20 ते 25 रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री होते.

खरेदी केंद्राचा उद्देश

यातून ग्राहकांचा सरकारवरील रोष कमी होतो आणि शेतकऱ्यांनाही योग्य भाव मिळेल. या उद्देशाने या संस्थांची निर्मिती झाली; परंतु या संस्था आता थेट व्यापाऱ्यांकडूनच कांदा खरेदी करीत असल्याचे दिसून येते. व्यापाऱ्यांनी अगोदरच शेतकऱ्यांकडून कमी भावाने कांदा खरेदी करून तो गुदामात साठवून ठेवलेला असतो. हाच कांदा ‘नाफेड’ किंवा ‘एनसीसीएफ’ या संस्थांना काही शेतकऱ्यांच्या नावाने विकला जात आहे. अशी वस्तू स्तिथी आहे.

का घ्यावा लागला हा निर्णय

अशा वेळी थेट व्यापाऱ्यांना फायदा होतो, म्हणून आता शेतकऱ्यांचा या संस्थांवरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी (ता.7) कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने लाल कांद्याचे दर हजार ते पंधराशे रुपयांनी कोसळले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असून, त्याला राजकीय रंग चढत चालल्याने केंद्र सरकारची कोंडी होऊ लागल्याचे सरकारच्या लक्षत आल्या नंतर सरकारने हा निर्णय घेतला.

यातून मार्ग काढण्यासाठी ‘एनसीसीएफ’ने मंगळवारी (ता. 12 ) कांदा खरेदीची जाहिरात प्रसिद्ध करून थेट शेतकरी व सहकारी संस्थांकडून तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी सुरू केलीआहे असे सांगितले जात आहे. प्रतिहेक्टरी 280 क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची खरेदी केली जाणार नसल्याचे ‘एनसीसीएफ’ने म्हटले आहे. जिल्ह्यातून साधारणत: दोन लाख टन कांदा खरेदी केला जाणार असल्याचे समजते. यात लाल व उन्हाळ कांद्याचा समावेश असणार आहे .

लाल कांद्याची दुसऱ्यांदा खरेदी

‘एनसीसीएफ’मार्फत यंदा दुसऱ्यांदा लाल कांद्याची खरेदी होत असल्याचे शेतकरी सांगतात. कांद्याचा दर्जा, प्रत, गुणवत्ता पाहूनच खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बारदानी गोण्यांमध्ये पॅक केलेला तसेच ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या कांद्याचीही थेट खरेदी होत असल्याचे ‘एनसीसीएफ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हि बाब शेतकऱ्यांना दिलासा दायक आहे.

एनसीसीएफ चे म्हणणे

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजेच एनसीसीएफ आणि नाफेडने यांच्या मार्फत राज्यात कांदा खरेदीला सुरुवात केली असून, प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरासरी 2623.70 प्रतिक्विंटलप्रमाणे भाव दिला जाईल, अशी माहिती एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा (दिल्ली) यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कोठे होणार खरेदी

देशातील 65 ते 70 टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी केला जाणार असून नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आदी लगतच्या जिल्ह्यांतून खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून कांदा घेताना एनसीसीएफ किंवा नाफेडलगतच्या मार्केट कमिटीमधील बाजारभावाच्या सरासरीने भाव शेतकऱ्याला दिला जाणार आहे. त्यामुळे कमी भाव मिळतो, ही ओरड शेतकऱ्यांची राहणार नाही, असेही चंद्रा यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.

कांदा शेतीविषयी थोडक्यात

हवामान

कांदा हेक्‍टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा वाढीला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्‍त असते.

जमीन

कांदा पिकासाठी पाण्‍याचा उत्तम निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मनाली जाते.

लागवड

कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी  समांतर अशा 6 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत.

झारीने पाणी घालावे. बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 30 ग्रॅम डायथेनएम 40 तसेच 45 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्‍ये मिसळून दर 10 दिवसांच्‍या अंतराने 4 ते 5 फवारण्‍या कराव्‍यात. रोपांना हरब-यासाठी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे. खरीप कांदयाची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्‍बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्‍यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.

कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते. सपाट वाफयामध्‍ये हेक्‍टरी रोपांचे प्रमाण जास्‍त असले तरी मध्‍यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्‍पादन मिळते. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्‍याकाळी करावी. रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी.

खत व्यवस्थापन

कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर 1 महिन्‍याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या आवश्यकते प्रमाणे पाणी द्यावे.

काढणी

कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्‍यात काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते. यालाच मान मोडणे असे म्‍हणतात.  60 ते 75 टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाला असे समजावे. कुदळीच्‍या साहारूयाने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4, 5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्‍या रूपाने ठेवावा. नंतर कांदयाची पात व मळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

शेतकरी

सरकारने कांदा प्रश्न गांभीर्याने घेणे गरजेचे आहे कारण शेतकरी आधीच दुष्काळामुळे संकटात आहे. कांदा हा शेतकऱ्यांना तारणहार वाटत असतानाच सरकारने निर्यात बंदी केल्याने शेतकरी नाराज झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या कांदयाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत. जेणे करून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment