आपला आजचा विषय आहे एका रात्रीत डोंगरांना गाव गिळलं….! Irshalwadi
Irshalwadi कोकण म्हटलं उंच डोंगर धो धो पडणारा पाऊस उंच उंच झाडे खोलदरी एका बाजूला समुद्र आणि उंच असा सह्याद्री आणि सह्याद्री म्हटलं की आपणाला आठवतो तो छत्रपती शिवराय यांचा धगधगता इतिहास ज्यात संभाजी राजे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु आज काल अशा काही घटना घडत आहे. ते पाहून निसर्गाची आणि सह्याद्रीची भीती वाटायला लागते अशीच एक घटना नुकतीच घडलेली आहे.
रायगड मधील खालापूर तालुक्यातील चौक गावापासून अवघ्या चार किमी अंतरावर बसलेले हे गाव त्याचं नाव आहे इर्शाळवाडी या गावातील लोक काही दिवसापूर्वीच गुन्या गोविंदाने नव्हत होते. या गावांमध्ये एकूण 48 घर आणि 250 लोकवस्ती असलेले हे गाव
19 जुलै ची ती रात्र लोक नेहमी प्रमाणे रात्री आपापली कामे करून निवांत गाढ झोपेमध्ये होती पावसाची रिपरिप चालू होती अशातच पहाटेच्या वेळी इर्शाळडोंगराचा काही भाग घसरला आणि इर्शाळवाडी होत्याचं नव्हतं झालं
कोठे घडली घटना
कोकणात रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पीडितांना तातडीने सिडकोकडून घरे बांधून देण्यात येतील अशी ग्वाही दिली होती. त्या दृष्टीने रायगड जिल्हा प्रशासनाकडून तातडीने युद्ध पातळीवर कार्यवाही सुरू करण्यात आली होती. आता या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून रायगड जिल्हा प्रशासनाकडे जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.
यासाठी 8 ऑगस्ट रोजी एमएसआरडीसीकडून तात्काळ बांधण्यात येणाऱ्या लेआउटसाठीही मान्यता देण्यात आली आहे. इर्शाळवाडी येथील दरडग्रस्तांना भूस्खलन झालेल्या पुनर्वसनाकरीता लेआऊट मंजूर करण्यात आला आहे. खालापूरमधील मौजे चौक मानिवली (स.नं.27/19 ब ) या ठिकाणी या कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे आता या पुनर्वसनातील मोठ्या तांत्रिक बाबी मार्गी लागले आहेत.
घरा साठी मान्यता आदेश
27 जुलै रोजीच्या रायगड जिल्हा प्रशासनाच्या पत्रान्वये विषयांकित क्षेत्राच्या जमीनीवर रहिवासी कारणासाठीच्या रेखांकनाच्या (Plotted development) मंजुरीसाठी या कार्यालयास प्रस्ताव सादर केला होता. जमीन स.नं.27/1 व क्षेत्र 26054 चौ.मी. मौजे चौक मानिवली ही मंजूर मुंबई महानगर प्रादेशिक योजना मधील प्रस्तावानुसार “हरित क्षेत्र -1” क्षेत्रांत समाविष्ट आहे, त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या रेखांकन प्रस्तावास एमएसआरडीसीकडून मान्यता मिळणं महत्त्वाचं होत. काही आवश्यक अटींच्या अधीन राहून मंजुरीसाठी (Plotted Layout) मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र एमएसआरडीसीकडून रायगड जिल्हा प्रशासनाला आज 8 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले आहे.
निसर्ग
निसर्गाच्या कठोर कृत्याने माणूस सुद्धा हातभार होतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. इर्शाळ गडावर जाण्यासाठी फक्त पाऊलवाट आहे. आज जगातून भारतातून सर्व ठिकाणाहून इर्शाळवाढीसाठी मदत येत आहे.परंतु तिथपर्यंत पोहोचणे माणसाला शक्य होत नाही. ढिगाखाली अडकलेले अनेक मृतदेह काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर निर्वासित झालेल्या लोकांना स्थापित करण्यासाठी शासनातर्फे मदत ही केले जात आहे. तरी मात्र चूक कोणाची याचाही विचार केला पाहिजे, कारण निसर्ग आपल्या तऱ्हेने प्रयत्न करत आहे आणि मानव आपल्या तऱ्हेने या सर्व घटना पाहिल्या की एकच विचार येतो आणि लहानपणीची एक कविता आठवते फक्त लढ म्हणा
ओळखलं का सर मला
पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले ,
केसावरती पाणी
क्षणभर बसला ,
नंतर हसला,
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली,
गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीसारखी,
चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली,
होती नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये
पाणी थोडे ठेवले
कारभारणीला संगे घेऊन,
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,
चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच,
हसत हसत उठला
पैसे नकोत सर
जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार,
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा……
इर्शाळवाडी मधील सर्व मृतजनांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आमचे सोशल मीडिया
tarunvichar चे facebook चॅनल
tarunvichar चे whatsapp चॅनल
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.