Land शेतजमीन मोजायची आहे, मग असा करा अर्ज !

Land शेत जमीन मोजायची आहे…!

बराच वेळा आपल्या असे लक्षात येते की आपल्या सातबाऱ्यावर जेवढी शेतजमीन आहे. प्रत्यक्षात तितकी जमीन आपल्या वापरामध्ये आहे का नाही ? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो.

चला तर मग जाणून घेऊया की, आपल्या सातबारावर जेवढी जमीन आहे प्रत्यक्षात तेवढी आहे का नाही? हे तपासण्यासाठी कोठे अर्ज करावा लागेल, किती फीस असेल, कसा अर्ज करावा लागेल, याची इतमभूत माहिती आपण घेऊयात.

आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलं आहे का? आपला बांध कोरून आपली जमीन त्याच्या ताब्यात घेतली आहे का? अशी शंका आपल्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची खाजगी पद्धतीने किंवा शासकीय पद्धतीने मोजणी करणे हा पर्याय आपल्यासमोर असतो.

हेही वाचा -Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?

आपण आपली जमीन मोजण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्र लागतात. मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारले जातं आणि सरकारची ई-मोजणी प्रणाली काय आहे. त्यासाठी किती दिवस लागतील या सर्वां ची सविस्तर माहिती पाहूयात.

मोजणीसाठी अर्ज कोठे करायचा

आपल्या जमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास. शेतकरी भूमी अभिलेखाच्या “तालुकास्तरावरील उपअधीक्षक अभिलेख” किंवा “नगर भूमापन अधिकारी” यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.

या अर्जाचा नमुना खालील वेबसाईटवर उपलब्ध होईल. bhumiabhilekh.maharashtra.gov.in

अर्ज कसा भरायचा

सर्वप्रथम आपण हा, अर्ज मोजणीसाठी अर्ज या लीक वरून डाऊनलोड करून घ्यावा किंवा आपल्या जवळील ऑनलाइन केंद्रातून विकत घ्यावा. त्या अर्जाचं नाव आहे “मोजणीसाठी अर्ज,” अर्ज कसा भरायचा.

  • सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहेत. त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकायचं आहे.
  • त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता या विषयी माहिती द्यायची आहे.
  • त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची “माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील” द्यायचा आहे. यातील मोजणी प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. त्याच्यापुढे तालुक्याचे नाव, गावाचं नाव, आणि शेत जमीन ज्या गट क्रमांकात येते. तो गट क्रमांक टाकायचा आहे.
  • आता पुढचा पर्याय आहे “सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी” ची रक्कम त्याच्यासमोर मोजणी तिची रक्कम लिहायचे आहे. आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.
  • कालावधी पर्यायांमध्ये किती “कालावधीत” मोजणी करून हवी आहे. यानुसार शेतकरी तशी माहिती कालावधी कॉलम मध्ये लिहू शकतात.
  • “उद्देश” या कॉलम मध्ये शेतकऱ्यांनी मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. उदाहरणार्थ शेतजमिनीची हद्द ठरवणे, कोणी अतिक्रमण केले आहे का हे पाहणे, व खरेदी करताना अशा प्रकारचा उद्देश लिहायचा आहे.
  • चौथ्या पर्यायात सातबारा उतारा प्रमाणे जमिनीचे “सहधारक “ म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी करायची आहे. त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल. तर त्यांची नाव, पत्ता आणि मोजणीसाठी ह्या सगळ्यांची संमती आहे. अशी संमती दर्शक सह्या आवश्यक असतात.
  • पुढच्या कॉलम मध्ये लगतचे “कब्जेदार” यांची नावे आणि पत्ता लिहायचा असतो. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चार दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे. त्या शेतकऱ्यांचं नाव, पत्ता, त्या दिशेसमोर लिहायचा आहे. म्हणजेच आपल्या क्षेत्राची चतुर सीमा सादर करायची आहे.
  • सगळ्यात शेवटी अर्जासोबत जोडलेल्या “कागदपत्रां“ची माहिती द्यायची आहे.

हेही वाचा -soybean उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय का ?

मोजणी चे प्रकार

सामान्यता मोजणी तीन प्रकारे केली जाते.

  • साधी मोजणी जी मोजणी सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते.किंवा ज्या मोजणीला थोडा वेळ लागू शकतो तिला साधी मोजणी असे म्हणतात. या मोजणीसाठी थोडा वेळ लागू शकतो.
  • तातडीची मोजणी ही मोजणी लवकर येते तुम्ही अर्ज केलेल्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत ही मोजणी केली जाते. म्हणून तिला तातडीची मोजणी असे म्हणतात.
  • अतितातडीची मोजणी ही मोजणी दोन महिन्याच्या आत येते. त्यामुळे तिला अतितातडीची मोजण्याचे म्हणतात.

हेही वाचा -Insurance तुम्ही भरला का 1 रुपयात पीक विमा

मोजणी फी

  • एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये लागतात.
  • एक हेक्टर वर तातडीच्या मोजणी करण्यासाठी दोन हजार रुपये लागतात.
  • एक हेक्टर अतितातडीच्या मोजणीसाठी तीन हजार रुपये फीस भरावी लागते.

तरुणविचारांच्या whatsapp चॅनलला ज्वाईन होण्यासाठी येथे दाबा

त्यामुळे किती कालावधीत मोजणी करून हवी आहे. यानुसार शेतकरी तशी माहिती कालावधी या कॉलम मध्ये लिहू शकतात.

मोजणीसाठी कागदपत्रे

शेताची मोजणी करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • एक मोजणीचा अर्ज
  • तीन महिन्याच्या आतील सातबारा
  • मोजणी फीच चलन किंवा पावती

इतर प्रकारची मोजणी

जर तुम्हाला शेताव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमिनीची मोजणी करायची असेल. किंवा हद्दी निश्चित करायच्या असेल तर तीन महिन्याची मिळकत पत्रिका आवश्यक असते.

पुढील प्रक्रिया

एकदा का अर्ज जमा केला की तो ई मोजणी या प्रणालीत फीड केला जातो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्राची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे. याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यांन बँकेत भरायची असते.

हेही वाचा -Soyabin शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेतायनां, घेत नसाल तर ही बातमी महत्त्वाची आहे.

त्यानंतर मोजणी रजिस्ट्रेशन नंबर नोंदणी क्रमांक तिथे तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.

काय आहे ई-मोजणी प्रणाली

ही मोजणी प्रणाली ही प्रक्रिया पाहिली ती ऑनलाईन पद्धतीची आहे. यात शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची भूमि अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई मोजणी असं म्हटलं जाता सध्या यासंबंधी सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम सुरू आहे.

ई मोजणी च्या या लिंक वरून आपण मोजणी करण्यासाठी केलेल्या अर्जाची स्थिती तपासू शकतो.

आमचे सोशल मीडिया

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment