Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?

पीक विमा भरल्यानंतर तो आपणाला किती मिळेल हे ओळखता येऊ शकतं का ? तर याचे उत्तर आहे होय. त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्याचा विचार करावा लागेल. हे या ब्लॉग मध्ये आम्ही स्पष्ट करत आहोत. पिक विमा किती मिळेल. हे कसे ठरवलं जातं. उंबरठा उत्पादन कसे काढले जाते. त्यातील तांत्रिक उत्पादन काय भानगड आहे. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक विमा भरपाई कशी दिली जाते. याची आकडेमोड आपण कशी करू शकतो.

Crop Insurance पिक विमा योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

पीक विमा योजनेत नुकसान भरपाई ठरविण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते मुद्दे समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नुकसान भरपाई कशी ठरवली जाते.

1) उंबरठा  उत्पादन.

2) तांत्रिक उत्पादन.

3) पीक कापणी प्रयोग.

हेही वाचा -Insurance तुम्ही भरला का 1 रुपयात पीक विमा

आता आपल्या शेतातील सोयाबीन काढून पूर्ण झालेले आहेत. पण काही दिवसापूर्वी पाहिलं तर असं लक्षात येतं की आपल्या भागामध्ये पीक कापणी प्रयोग सुरू झाले होते. हे पीक कापणी प्रयोग प्रत्येक मंडळामध्ये केले जातात. त्या पीक कापणी प्रयोगातून सरासरी आठ ते बारा क्विंटल च्या दरम्यान सरासरी उत्पन्न उत्पादकता येत असल्याची माहिती आहे. राज्यातील ज्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगातून अशी उत्पादकता येत आहे. त्या मंडळातील शेतकऱ्याना विमा कमी मिळण्याची शक्यता आहे.

कारण यापूर्वी उंबरठा उत्पादन झालेल्या नोंदी मागील पाच वर्षात बहुतांशी मंडळातील सरासरी उंबरठा उत्पादनाच्या नोंदी 10 ते 15 क्विंटल च्या दरम्यान असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा खरोखर उत्पन्न कमी होऊन ही पीक विम्याची भरपाई अपेक्षेपेक्षा कमीच मिळण्याची शक्यता आहे.

नुकसान भरपाई वरील तीन घटकांच्या आधारावरच काढली जाते. त्यामुळे तीन घटक काय आहेत. आणि ते कसे काढले जातात. हे आधी समजून घेणे आवश्यक आहे.

पिक कापणी प्रयोग

काही दिवसांपूर्वी आपल्या शेतामध्ये काही अधिकारी आले असतील. ते नेमके कशासाठी आले होते . याची माहिती आपणाला आहेच. पीक विम्याची अंतिम भरपाईची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पीक कापणी प्रयोग केले जातात. पीक कापणी प्रयोगातून जे उत्पादन निश्चित होते. त्यावर भरपाई अवलंबून असते. विमा क्षेत्र घटक जर मंडळ असेल तर, या मंडळात किमान 10 पीक कापणी प्रयोग केले जातात. पण विमा क्षेत्र तालुका असेल त,र तालुक्यात किमान 16 पीक कापणी प्रयोग केले जातात.

हेही वाचा -महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आता हे प्रयोग कोण करतो. तर विमा क्षेत्रात म्हणजेच मंडळ किंवा तालुक्यात तीन विभागामार्फत पीक कापणी प्रयोग केले जातात. तलाठी महसूल विभागासाठी पीक कापणी प्रयोग करतात, तर कृषी सहाय्यक कृषी विभागासाठी करतात, आणि ग्रामसेवक हे ग्रामविकास विभागासाठी पीक कापणी प्रयोग करतात.

हे पीक कापणी प्रयोग तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणात होत. असतात पीक कापणी प्रयोगासाठी मोबाईल ॲपचा वापर केंद्राने बंधनकारक केला आहे. जर विमा प्रतिनिधीने मोबाईलचा वापर न करता पीक कापणी प्रयोग केला. तर केंद्र सरकार आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता कंपन्यांना देणारा नाही. त्यामुळे मोबाईल ॲपचा वापर केला जातो.

उंबरठा उत्पादन

आता उंबरठा उत्पादन कसे काढले जाते. पिक विमा योजनेतील उंबरठा उत्पादन हा एक महत्त्वाचा घटक आहे. उंबरठा उत्पादन काढताना त्या मंडळातील मागील सात वर्षाचा विचार केला जातो. मागील सात वर्षापैकी सर्वात महत्त्वाचे जास्त उत्पादन झालेल्या पाच वर्षाची सरासरी काढली जाते. या पाच वर्षाची सरासरी काढल्यानंतर जे काही उत्पादन येईल. त्याला 70% जोकिंग स्तर असेल. पिक विमा योजनेत खरीप हंगामात 2023 ते 2025 – 26 या काळासाठी 70% जोकिंग स्तर ठरवण्यात आला आहे. म्हणजेच या पाच वर्षातील सरासरीच्या 70 टक्के उत्पादन गृहीत धरण्यात येईल. समजा धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी मंडळात मागील पाच वर्षाची सरासरी तेराशे किलो प्रति हेक्टर आहे. तर मग उंबरठा उत्पन्न किती येईल.

उंबरठा उत्पादन =1300×0.70=1000

म्हणजेच पाडोळी मंडळातील उंबरठा उत्पादन प्रती हेक्टरी 1000 किलो आहे.

तांत्रिक उत्पादन

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिक विमा योजनेअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई काढण्याच्या नियमात शासनाने बदल केला आहे. सोयाबीन कापूस, गहू आणि भात या पिकासाठी हा बदल असेल ती कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन अशा दोन प्रकारात सरासरी उत्पादनाची विभागणी केली आहे.

यंदा सरासरी उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नापैकी 70 टक्के उत्पादन गृहीत धरण्यात येईल. आणि एकूण तांत्रिक उत्पादनापैकी 30% उत्पादन गृहीत धरण्यात येईल. यंदा तांत्रिक उत्पादनाला केवळ 30% वेटेज देण्यात आली आहे. पण 2024-25 मध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाला 60 टक्के आणि तांत्रिक उत्पादनाला 40% वेटेज असेल. तर 2025-26 साठी पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाला 50% आणि तांत्रिक उत्पादनाला 50% वेटेज असेल.

हेही वाचा -Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार..!

तंत्रज्ञानावर आधारित सरासरी उत्पादन निश्चित करताना maha agritech प्रकल्प अंतर्गत विमा क्षेत्र घटक स्तरावर प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येईल. तंत्रज्ञानाच्या आधारे पीक वाढीच्या स्थिती नुसार वेगवेगळ्या टप्यात किती उत्पादनात येण्याची शक्यता होती. आणि शेवटच्या टप्यात किती उत्पादनाचा अंदाज आहे. यावरून तांत्रिक उत्पादन काढले जाते.

तांत्रिक उत्पादन ही प्रक्रिया तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. यात मानवाचा हस्तक्षेप होत नाही. या पद्धतीचा वापर वाढविण्यावर शासनाचा जोर आहे. यातून पीक उत्पादन, नुकसानीची अचूक माहिती मिळवण्यास मदत होईल . आकडेवारी वेळेत प्राप्त न झाल्यास पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी सरासरी उत्पादन निश्चित करताना ग्राह्य धरण्यात येईल.

30% कॅप

कापूस आणि सोयाबीन पिकाचे सरासरी तांत्रिक उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या 30% पेक्षा जास्त फरक असेल, तर 30 % साधारण पातळी लावण्यात आली. समजा पाडोळी मंडळात पीक कापणे प्रयोगातून 1000 किलो उत्पादन झाले आणि तांत्रिक उत्पादन 1500 किलो आले. तर 30 टक्के कॅप आहे यावेळी 1000 किलोचे 30 टक्के म्हणजेच 300 किलो असे तेराशे किलो तांत्रिक उत्पादन गृहीत धरण्यात येईल. तर तांत्रिक उत्पादन 30% कमी म्हणजेच 650 किलो आले तर पिक प्रयोगातून आलेल्या उत्पादनापैकी 30% कमी म्हणजेच 1000 किलोच्या 300 किलो कमी धरले. जाईल यावेळी तांत्रिक उत्पादन 700 किलो गृहीत धरले जाईल.

सोयाबीनचे सरासरी उत्पादन कसे काढले जाईल

आपण आधी पाहिलं की सोयाबीनचे सरासरी उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादन 70 टक्के आणि तांत्रिक उत्पादन 30 टक्के गृहीतले जाते. समजा धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी मंडळात पीक कापणी प्रयोगातून हेक्‍टरी 10 क्विंटल उत्पादन झाले तसेच तांत्रिक उत्पादन 1500 किलो म्हणजेच 15 क्विंटल झाले तर सरासरी उत्पन्न किती येईल.

तांत्रिक उत्पादन हे पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नापेक्षा जास्त आल्यास.

पीक कापणी प्रयोगातील उत्पादन=1000

तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन= 1500 kg

तांत्रिक उत्पादन कॅप 30% =1300 kg

सरासरी उत्पादन=(1000×0.70)+(1300×0.30=390)=1090 kg

म्हणजेच पाडोळी मंडळाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी 1090 kg

तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन पीक कापणी प्रयोगापेक्षा कमी आल्यास

पीक कापणी प्रयोगातील उत्पादन= 10 क्विंटल

तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन= 6.5 क्विंटल

तांत्रिक उत्पादन कॅप 30%= 700 kg

सरासरी उत्पादन =(1000×0.70)+(700×0.30)

= 700+210

= 910 kg

म्हणजे तांत्रिक उत्पादन पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत कमी आल्यास 910 kg सरासरी उत्पन्न येईल.

दुष्काळ जाहीर झाला म्हणजे पीक विमा जास्त मिळते का ?

पिक विमा योजनेच्या शासन निर्णयात तरतूद आहे. की, पिक विमा योजनेची भरपाई ही पीक कापणी प्रयोग आणि उंबरटा उत्पन्नाच्या आधारावरच मिळेल. शासनाने काढलेली पैसेवारी, दुष्काळ, टंचाई, परिस्थिती किंवा पुरामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजेच एखाद्या मंडळात किंवा तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला तरी पीक कापणी प्रयोगात आलेल्या उत्पन्नाच्या आधारावरच विमा भरपाई मिळेल.

नुकसान भरपाई कशी काढली जाईल

मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग झाले. आपण सोयाबीनची नुकसान भरपाई कशी काढली जाईल याचा आढावा घेऊ. पाडोळी मंडळातील सोयाबीन चे उंबरठा उत्पादन 671 केजी आहे आणि सरासरी उत्पादन 918 केजी आहे.

म्हणजे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त येईल तर नुकसान भरपाई किती मिळू शकते याचा अंदाज घेऊ.

अग्रीम भरपाई मिळालेली असल्यास अंतिम भरपाई कशी मिळेल ?

राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाईसाठी अधिसूचना निघाल्या आहेत. त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये अग्रीम वर तोडगा निघाला, तर काही जिल्ह्यांमध्ये काही मंडळाच्या अग्रीमचा तोडगा निघाला. आतापर्यंत जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना अग्रीम भरपाई देण्यावर तोडगा निघाला आहे.

या शेतकऱ्यांना दिवाळी आधी अग्रीम भरपाई मिळत आहे. मग या शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळेल का ? तर मिळेल पण अंतिम भरपाईच्या रकमेतून अग्रीम पोटी दिलेली रक्कम वजा केली जाईल.

समजा पाडोळी मंडळातील शेतकऱ्याला अग्रीमपोटी 6000 रुपये मिळाले. आणि अंतिम भरपाई 8000 येत असेल, तर 6000 वजा करून दोन हजार रुपये दिले जातील. पण या शेतकऱ्यांना मिळणारी अंतिम भरपाई कमी म्हणजेच 5000 असेल. तर त्या शेतकऱ्याला अंतिम भरपाई मिळणार नाही. आणि उरलेली रक्कम ही त्याच्याकडून परत घेतली जाणार नाही.

सरासरी उंबरठा उत्पन्नाची स्थिती काय

राज्यातील वेगवेगळ्या मंडळात मागील काही वर्षातील कमी उंबरठा उत्पन्नाची नोंद झाल्याची माहिती मिळाली. अनेक मंडळातील सरासरी उंबरठा उत्पादन 1000 किलो ते 1200 किलो प्रति हेक्टर च्या दरम्यान आहे. म्हणजेच हेक्टरी दहा ते बारा क्विंटल पण वास्तविक सोयाबीन उत्पादन एकरी1000-1200 kg एवढे होते. म्हणजेच हेक्टरी प्रत्यक्ष उत्पादन जास्त आहे.

हेही वाचा – Soybean 2023-24 मध्ये सोयाबीनला किती राहील भाव?

म्हणून उंबरठा उत्पादनाच्या नोंदी कमी आहेत. पीक चांगले असतानाही विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी या नोंदी कमी करण्यात आल्याचे या विषयातील जाणकार सांगतात. पण खऱ्या संकटाच्या काळात कमी उंबरठा उत्पन्नाच्या नोंदणीचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. त्यामुळे उत्पादन चांगले असेल तर आपल्या मंडळातील उंबरठा उत्पन्नाच्या नोंदी योग्य व्हायला हव्यात याची काळजी घ्यावी. त्यामुळे अशा दुष्काळी वर्षात पीक विम्याची योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा

Leave a Comment