अधिक उत्पन्न देणाऱ्या हरभऱ्याच्या सुधारित जाती (Gram varieties)

तपशील

महाराष्ट्रातील प्रमुख पीका पैकी एक असणाऱ्या हरभरा विविध जाती विषयी आपण आज माहिती पाहुयात.कारण सोयाबीन नंतर भरोसे मंद पीक म्हणजे हरभरा यया पिकाच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. हरभरा पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पोत टिकून राहतो.

Gram varieties

हरभरा हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकाच्या मुळावरील गाठीतील “रायझोबियम” जिवाणूंमार्फत हवेतील नत्राचे साधारणपणे १३५ मग प्रति हेक्टरी स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

  • विजय
  1. कालावधी – जिरायती – 85 ते 90 दिवस, -बागायती-105 ते 110
  2. अधिक उत्पादन क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण शान करण्याची क्षमता, जिरायती बागायती भागास आणि उशिरा पेरणीस योग्य.
  3. महाराष्ट्र, गुजरात,मध्य-प्रदेश राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती -प्रायोगिक उत्पादन 14 ते 15 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 14 क्विं/ हे.
  2. बागायती – प्रायोगिक उत्पादन 35 ते 40 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 23 क्विं/ हे.
  3. उशिरा पेरणी -प्रायोगिक उत्पादन 16 ते 18 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 16 क्विं/ हे.
  • विशाल
  1. कालावधी -बागायती -110 ते 115 दिवस.
  2. आकर्षक पिवळसर टपोरे दाणे, १०० दाण्याचे वजन २८ ग्राम ,मर रोगास प्रतिकार क्षम प्रथिनांचे प्रमाण अधिक.
  3. घाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे दिसतात.
  4. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे.
  5. पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती -प्रायोगिक उत्पादन 14 ते 15 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 13 क्विं/ हे.
  2. बागायती – प्रायोगिक उत्पादन 30 ते 35 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 20 क्विं/ हे.

  • दिग्विजय
  1. कालावधी -बागायती -110 ते 115 दिवस.
  2. आकर्षक पिवळसर टपोरे दाणे, 100 दाण्याचे वजन 24 ग्राम ,मर रोगास प्रतिकारक्षम.
  3. जिरायती , बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य.
  4. घाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे दिसतात.
  5. महाराष्ट्रासाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती -प्रायोगिक उत्पादन 14 ते 15 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 14 क्विं/ हे.
  2. बागायती – प्रायोगिक उत्पादन 35 ते 40 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 23 क्विं/ हे.
  3. उशिरा पेरणी -प्रायोगिक उत्पादन 20 ते 22क्विं/ हे. सरासरी उत्पादन 21 क्विं/ हे.
  • फुले विक्रम
  1. कालावधी -बागायती -110 ते 115 दिवस.
  2. घाटे जमिनीपासून एक फुटाच्या वर लागतात.
  3. या वाणाची उंची ज्यास्त असल्याने यांत्रिक पद्धतीने काढता येते तयामुळे खर्चात बचत होते.
  4. मर रोगास प्रतिकार क्षम.
  5. अधिक उत्पादन क्षमता.
  6. महाराष्ट्र, गुजरात,मध्यप्रदेश दक्षिण राजस्थान साठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती -प्रायोगिक उत्पादन 16 ते 18 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 16 क्विं/ हे.
  2. बागायती – प्रायोगिक उत्पादन 40 ते 42 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 22 क्विं/ हे.
  3. उशिरा पेरणी -प्रायोगिक उत्पादन 22 ते 24 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 21 क्विं/ हे.
  • फुले विक्रांत
  1. कालावधी -बागायती -105 ते 110 दिवस.
  2. पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, 100 दाण्याचे वजन 19.9 ग्रॅम
  3. बागायती पेरणी साठी योग्य.
  4. महाराष्ट्र, गुजरात,मध्यप्रदेश दक्षिण राजस्थान साठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. उत्पादन क्षमता -41.66 सरासरी उत्पादन 20 क्विं/ हे.

  • फुले विश्वराज
  1. कालावधी -95 ते 105 दिवस.
  2. पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, 100 दाण्याचे वजन 22 ग्रॅम
  3. जिरायती पेरणी साठी योग्य.
  4. मर रोग प्रतिकारक्षम.
  5. पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती – उत्पादन क्षमता – 28 ते 29 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 15 ते 16 क्विं/ हे.
  • जाकी 9218
  1. विदर्भ विभागासाठी प्रसारित करण्यात आलेली जात.
  2. मर रोग प्रतिकारक्षम.
  3. 100 दाण्याचे वजन 22-26 ग्रॅम.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती – उत्पादन क्षमता -15 ते 16 क्विं/ हे.
  2. बागायती – उत्पादन क्षमता -26 ते 28 क्विं/ हे.
  • पिडिकेव्ही कांचन
  1. कालावधी -105 ते 110 दिवस.
  2. टपोरे दाणे.
  3. मर रोग प्रतिकारक्षम.
  4. विदर्भ विभागासाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. बागायती – उत्पादन क्षमता – 35 ते 42 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विं/ हे.

  • पिडिकेव्ही कनक
  1. कालावधी -105 ते 110 दिवस.
  2. यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता योग्य.
  3. संरक्षित ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस.
  4. महाराष्ट्र, गुजरात, मध्य-प्रदेश राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. बागायती – सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विं/ हे.
  • बीडीएनजी – 797
  1. मराठवाडा विभागासाठी प्रसारित.
  2. मर रोग प्रतिकारक्षम
  3. मध्यम आकाराचे दाणे.
  4. 100 दाण्याचे वजन 18-20 ग्रॅम.
  5. अवर्षण प्रतिकारक्षम.

उत्पादन क्विंटल /हे

  1. बागायती-सरासरी उत्पादन 14 ते 15 क्विं/ हे.
  2. जिरायती-सरासरी उत्पादन 20 ते 22 क्विं/ हे.
  • जवाहर ग्राम – 24
  1. कालावधी – 110 ते 115 दिवस
  2. मर रोग प्रतिकारक्षम
  3. यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता योग्य.
  4. 100 दाण्याचे वजन 129.3 ग्रॅम.
  5. महाराष्ट्र, गुजरात, मध्य-प्रदेश राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. सरासरी उत्पादन 22 क्विं/ हे.

  • आरव्हीजी – 202
  1. कालावधी – 105 ते 110 दिवस
  2. मर रोग प्रतिकारक्षम
  3. उशिरा पेरणी करता योग्य.
  4. महाराष्ट्र, गुजरात, मध्य-प्रदेश राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. सरासरी उत्पादन 22 क्विं/ हे.
  • आरव्हीजी – 204
  1. कालावधी – 108 ते 111 दिवस.
  2. मध्यम मर रोग प्रतिकारक्षम.
  3. यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता योग्य.
  4. महाराष्ट्र, गुजरात, मध्य-प्रदेश राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. सरासरी उत्पादन 22 क्विं/ हे.

काबुली जाती

  • विराट
  1. कालावधी – 108 ते 111 दिवस.
  2. मर रोग प्रतिकारक्षम.
  3. अधिक टपोरे दाणे.
  4. 100 दाण्याचे वजन 35 ग्रॅम.
  5. महाराष्ट्र, राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. जिरायती -प्रायोगिक उत्पादन 10 ते 12 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 11 क्विं/ हे.
  2. बागायती – प्रायोगिक उत्पादन 30 ते 32 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 18 क्विं/ हे.
  • कृपा
  1. कालावधी – 105 ते 110 दिवस.
  2. मर रोग प्रतिकारक्षम.
  3. अधिक टपोरे दाणे.
  4. 100 दाण्याचे वजन59.4 ग्रॅम.
  5. सफेद पांढरे दाणे.
  6. महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यसाठी प्रसारित.

उत्पादन क्विंटल /हे

  1. प्रायोगिक उत्पादन 30 ते 32 क्विं/ हे. सरासरी उत्पादन 16 – 18 क्विं/ हे..
  • पीकेव्ही -2
  1. कालावधी – 100 ते 105 दिवस.
  2. मर रोग प्रतिकारक्षम.
  3. अधिक टपोरे दाणे.
  4. 100 दाण्याचे वजन 37-40 ग्रॅम.

उत्पादन क्विंटल /हे

  1. सरासरी उत्पादन 16-18 क्विं/ हे..

  • पीकेव्ही -4
  1. कालावधी – 100 ते 110 दिवस.
  2. मध्यम मर रोग प्रतिकारक्षम.
  3. अधिक टपोरे दाणे.
  4. 100 दाण्याचे वजन 50-53 ग्रॅम.

उत्पादन क्विंटल /हे

  1. सरासरी उत्पादन 16-18 क्विं/ हे..

Leave a Comment