नाव काढलंस पोरा…! Asian Games 2023 Happy moment

क्रिडा विश्व् Asian Games 2023

Asian Games 2023 सध्या भारतात गेम्स हे खूप चालू आहेत.त्यात क्रिकेट हा खेळ भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.त्यात विश्व चषक आणि तो ही चक्क भारतात. त्यामुळे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष फक्त क्रिकेट चषकाकडे,सर्वत्र चर्चा फक्त आणि फक्त क्रिकेट चीच आहे. रोहित किती रन काढणार,विराट कसा खेळणार,बुमरा ज्यास्त विकेट घेणार कि, जडेजा सर्वत्र हीच चर्चा आहे. परंतु याचं पलीकडे हि काहीतरी खेळ आहेत.काही खेळाडू आहेत. जे प्रसिद्धी पासून खूप दूर असतात. Asian Games 2023 ह्या जरी चीन मध्ये चालू असतील तरी सुद्धा काही खेळाडूंनी चीन मध्ये भारताचा तिरंगा फडकावण्याचं काम केलं आहे.

रामबाबू

सध्या चर्चेत असणार एक नाव आहे.ते म्हणजे रामबाबू Asian Games 2023 मध्ये दारीब कुटूंबातील मजुरी करणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा ज्याने केलं देशाच नाव रोशन केलं आहे. रामबाबू ची जिवन कहाणी सर्वाना प्रेरणा घेण्या सारखी आहे.

खडतर प्रवास

Asian Games 2023 “कौन कहता है आसमा मे सुराग नही हो सकता एक पत्थर तो तबियत से उछालो यारो”Asian Games मध्ये पायी चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक विजेता राम बाबू वर हि कविता योग्य बसते. सोनभद्र येथील रामबाबू चा हांगझोऊ पर्यन्त चा प्रवास सोपा नव्हता. पॊटाची खळगी भरण्यासाठी रामबाबू ला कधी हॉटेल; मध्ये वेटर म्हणून तर कधी मनरेगाच्या कामावर मजदूर म्हणून काम करावा लागलं.गावात 5 वी च्या शिक्षणा नंतर आईने शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालय येथे पाठवले. 12 पर्यंत शाळेत मैराथन च प्रशिक्षण घेतलं. लॉकडाऊन मध्ये मजुरी करत-करत राष्टीय खेळ 2022 जिकंण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली.

रामबाबू खूप अवगड परिस्थिती हि झाला यशस्वी

त्याची आई सांगते, कोविड लॉकडाउन मध्ये सोनभद्र जिल्यातील मनरेगाच्या कामात मुलाने मजूर म्हणून काम केलं. Asian Games 2023 आशियायी खेळात 35 किमी पायी चालण्याचा स्पर्धेत कास्य पदक जिकल्या नंतर मुलाच्या नावाची सर्वत्र चर्चा झाल्याने आम्हला खूप आनंद झाला.

rambabu aai vadil
rambabu aai vadil

आई म्हणते कि रामबाबू त्याच्या परिस्थिती च्या समोर त्याने कधीच हार पत्करली नाही. त्याच्या मजबूत इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने आंतरराष्टीय सामन्यात कास्य पदक पटकावले.

वेटर आणि मनरेगा मध्ये मजुरीचीही कामे करावी लागली

रामबाबू च्या आईने सांगितले कि 2014 मध्ये मैराथन मध्ये आहार आणि प्रशिक्षण या वर खर्च करन खूप आवघड आहे. रामबाबू ने 12 पास झाल्या नंतर बनारस मध्ये वेटर म्हणून काम केले. खेळामध्ये पोराची कामगिरी बगुन आई वडिलांनी मजुरी करून रामबाबू ला पैसे पाठवले.

Rambabu manrega
rambabu manrega

रामबाबू ने अनेक प्रकारचे कामे केले त्यात त्याने मजुरी, वेटर,पोते शिवण्याच्ये काम,कोरोना काळात मजूर करून दिवसाला 200 रुपये यायचे. नौर्दन कोल फील्ड लिमिटेड मध्ये ऍथलेटिक्स कॅम्प Asian Games 2023 मध्ये निवड झाली. तेथे राम बाबू च्या कोचने त्यांना मैराथन सोडून रेस वॉक चा सर्व करण्याचं साल्ला दिला.

आशियायी खेळात रामबाबू ने केली कमाल

रेस वॉक रामबाबू साठी आवघड होता. राष्ट्रीय ओपन एथलेटिक्स चैम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिकल्या नंतर रामबाबू ची निवड विश्व् एथलेटिक्स चैम्पियनशिपमध्ये Asian Games 2023 निवड झाली परंतु हैमस्ट्रिंग कि लागून त्यालाजखम झाली .रामबाबू ने 35 किमी पायी चालणे या प्रकारात राष्टीय रेकॉड तोडलं आणि एशियन खेळात कांस्य पदक जिंकलं

रामबाबू ने देशा बरोबरच त्याच्या गावाचं आणि आईवडलाच नाव रोशन केल. यातून एकच सिद्ध होत कि यशस्वी होण्यासाठी परिस्थिती मॅटर करत नाही.

ASIAN GAMES MEDAL TALLY 2023

POSITION COUNTRY GOLD SILIVER BRONZE TOTAL
4BHART 283841107
1China20111171383
2Japan526769188
3South Korea425989190
5Uzbekistan22183171

भारतामध्ये खेळाचे प्रमाण वाढण्या साठी भारत सरकारने खलो इंडिया अश्या अनेक खेळाचे आयोजन केले आहे. त्यातून चांगले खेळाडू तयार करून भविष्यात भारताला विश्व क्रीडा मध्ये ज्यास्तीत जास्त मेडल मिळवून भारताचे नाव रोशन करण्यासाठी भारत सरकार तर्फे मोठ्या प्रमाणात खेळाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचा फायदा नक्कीच भारतातील सर्व युवा खेळाडूना होणार आहे .

भारताने Asian Games 2023 मध्ये कोणत्या खेळात किती मेडल जिंकले


http://timesofindia.indiatimes.com/articleshow/104035901.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

Leave a Comment