आता सर्वत्र कोणत्या कारखाण्याने किती भाव दिला किंवा देणार याची सर्व शेतकरी व ऊस उत्पादक याच्या मध्ये चर्चा आहे. प्रत्येक भागात वेगवेगळे भाव दिले जातील आपण आज गेल्या हंगामात कोणत्या कारखाण्याने किती भाव दिला, हे पाहणार आहोत.
FRP यंदाच्या गळीत हंगाम नोव्हेंबर पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून या बैठकीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरवण्यात येणार आहे.हंगाम सुरू होण्याआधी ही शेतकरी संघटनेचे शेतकऱ्याना 400(FRP) रुपयांचा हप्ता देण्यासाठी आणि उसाला चांगला हमीभाव देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना सर्वात जास्त आणि सर्वात कमी हमीभाव कुठल्या कारखाण्याने दिला होता आपल्याला माहिती आहे का?
चला तर मग जाणून घेऊयात मागच्या वर्षीचे भाव
दरम्यान मागच्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पार पडला . त्यातील काही कारखान्यांनी 2000 पेक्षा कमी तर काही कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना दिला आहे. उसाला सर्वात कमी आणि सर्वात जास्त भावामध्ये तब्बल 1338 रुपयांचा फरक होता.
2022-23 मध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त भाव देणारा कारखाना
गळीत हंगाम 2022-23 मध्ये सर्वाधिक दर कोल्हापूर विभागातील दालमिया भरत साखर कारखाण्याने दिला होता.तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करता शेतकऱ्यांना 3177 रुपये प्रति टन भाव मिळाला होता.(FRP)तर सर्वात कमी भाव अहमदनगर जिल्यातील श्रीगोंदा तालुक्यातील साजन साखर कारखाण्याने दिला होता. या कारखाण्याने वाहतूक व तोडणी खर्च वजा करता प्रति टन 1839 रुपये एवढा भाव दिला होता.साजन साखर कारखान्याकडून वाहतूक आणि तोडणी खर्च प्रति टॅन 1146 रुपये एवढा आकारला होता.मागच्या वर्षी 211 पैकी 198 कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी भाव दिला होता.तर केवळ 13 कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना दिला होता . 3000 पेक्षा कमी भाव देणाऱ्या 198 कारखान्यांपैकी 12 साखर कारखान्यांनी 2000 पेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना दिला होता.
FRP मधून शेतकऱ्यांना किती रक्कम मिळते
दरवर्षी केंद्र सरकारकडून उसासाठी FRP जाहीर केला जातो, त्यासाठी उसाचा उतारा सुद्धा निश्चित केला जातो. जसा उतारा वाढेल किंवा कमी होईल त्यानुअसर FRP मध्येह बदल होत असतात.शासनाने जाहीर केलेले FRP मधून तोडणी व वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते.
3000 पेक्षा जास्त भाव देणारे कारखाने (वाहतूक व तोडणी खर्च वजा करून)
अ.क्र | कारखान्यांची नावे | ठिकाण तालुका | जिल्हा | भाव |
1 | भोगावती साखर कारखाना | करवीर | कोल्हापूर | 3094.41 |
2 | दुधागंगा साखर कारखाना,बिद्री | कागल | कोल्हापूर | 3089.55 |
3 | कुंबी कासारी साखर कारखाना,कुडीत्रे | करवीर | कोल्हापूर | 3150.00 |
4 | देशभक्त रत्नप्पा अण्णा कुंभार सा. का. गंगानगर, इचलकरंजी | हातकणंगले | कोल्हापूर | 3103.50 |
5 | तात्या साहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना | पन्हाळा | कोल्हापूर | 3177.79 |
6 | राजाराम बापू पाटील सहकारी | वाळवा | सांगली | 3105.57 |
7 | राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट -2 | वाळवा | सांगली | 3104.29 |
8 | राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट -3 | वाळवा | सांगली | 3105.76 |
9 | पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना | कडेगाव | सांगली | 3167.72 |
10 | क्रांती अग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड सहकारी सा.का.कुंडाळ | पलूस | सांगली | 3101.22 |
11 | तालमीया भारत साखर कारखाना कोकरूड | शिराळा | सांगली | 3027.88 |
12 | यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुक | कराड | सातारा | 3023.61 |
13 | दालमिया भारत साखर कारखाना | पन्हाळा | कोल्हापूर | 3177.79 |
2000 रुपया पेक्षा सर्वात कमी भाव देणारे साखर कारखाने (वाहतूक व तोडणी खर्च वजा करून)

अक्र | कारखाना नाव | ठिकाण तालुका | जिल्हा | भाव |
1 | सिद्धनाथ शुगर मिल्स तीहरे | उत्तर सोलापूर | उत्तर सोलापूर | 1974.42 |
2 | भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड लवंगी | मंगळवेढा | सोलापूर | 1999.58 |
3 | साजन कारखाना | श्रीगोंदा | अहमदनगर | 1839.00 |
4 | धाराशिव साखर कारखाना | कळवण | नाशिक | 1988.00 |
5 | अंबाजी ट्रेडिंग कॉर्पोरेशन जळगाव | चाळीसगाव | जळगाव | 1884.00 |
6 | संत एकनाथ सहकारी साखर कारखाना | पैठण | छत्रपती संभाजीनगर | 1977.00 |
7 | रामेश्वर सहकारी साखर कारखाना शिपोरा बाजार | भोकरदन | जालना | 1968.14 |
8 | साईबाबा साखर कारखाना | शिवनी | लातूर | 1993.00 |
9 | पैनगंगा साखर कारखाना वरुड धड | – | बुलढाणा | 1851.48 |
10 | माणूस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट एक बेला | उमरेड | नागपूर | 1997.67 |
11 | माणूस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट दोन बेला | उमरेड | नागपूर | 1877.41 |
12 | व्यंकटेश्वर पावर प्रोजेक्ट मौडा | – | नागपूर | 1984.60 |
आमची माहिती आवडल्यास आमच्या whatapp च्या तरुण विचार या चॅनल ला नक्की follow करा