Police patil
ग्रामीण पातळीवर शासन व जनता यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील. त्यांना शासनाचे नाक, कान, डोळे समजले जाते. ऐतिहासिक काळापासून चालत आलेले हे पद आधुनिक काळातही गावात कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा राखण्यास अग्रेसर आहे. परंतु 24 तास जबाबदारीने कामकाज सांभाळत असताना सुद्धा अल्प मानधन व इतर सोयी सुविधा त्या मानाने मिळत नाहीत. त्या मिळाव्यात याकरता महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब शिंदे पाटील
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात संबंधित सर्व महोदयाच्या, अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन बैठका झाल्या. राज्यात सर्व सन्मानित पालकमंत्री व आमदार महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आल्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 22 डिसेंबर 2022 रोजी हजारो पोलीस पाटलांचा विराट मोर्चा काढण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत आश्वासनावर आश्वासनेच मिळत आहेत. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, कोतवाल, आशा वर्कर्स यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली. परंतु पोलीस पाटलाकडे शासन दुर्लक्ष करत आहे असे दिसून येते आहे. आमच्या खालील मागण्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा.
याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही राज्यातील सर्व पोलीस पाटील महाराष्ट्रराज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 28/11/2023 ते दिनांक 1/12/2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत उपोषण व धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
“आम्ही अनेक वर्षांपासून आमच्या मागण्या शासनदरबारी मांडत आहोत.आणि त्यामागण्याचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत परंतु आज पर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे येणाऱ्या 28 तारखेपासून पोलीस पाटलाच्या मागण्या साठी आजाद मैदान येथे खूप मोठे आंदोलन उभारत आहोत.या आंदोलनात राज्यातील 100% पोलीस पाटील उपस्थित राहतील.”
अध्यक्ष
श्री.बाळासाहेब शिंदे पाटील
म.रा.गा.का.पो.पा.संघ
संघटनेच्या प्रमुख मागण्या
पोलीस पाटील संघा कडून अनेक वर्षा पासून मागण्या होत आहेत.
- पोलीस पाटलाच्या मानधनात वाढ करून ते दरमहा किमान 18000 रुपये मिळावे.
- ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
- नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर पुढे कायमचे बंद करण्यात यावे.
- शासनाकडून पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा.
- निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षापर्यंत करण्यात यावे. (महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2012 प्र.क्र. 429 का सहा परिच्छेद दिनांक 13 ऑक्टोबर 2014 च्या परिपत्रकानुसार अंगणवाडी सेविका प्रमाणे)
- पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेले व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटलांना त्यांच्या निवृत्ती काळापर्यंत कायम ठेवण्यात यावे. त्यांची पदेखंडित करू नयेत.
- निवृत्तीनंतर ठोस रक्कम मिळावी.
- प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा 3000 रुपये मानधना सोबतच मिळावेत.
- गृह व महसूल विभागातील पदभरती मध्ये पोलीस पाटील अथवा त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार प्राधान्य देण्यात यावे.
- शासनातर्फे पोलीस पाटलांचा दहा लाख रुपयाचा विमा उतरवण्यात यावा. त्यांचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे.
- अपिलाचे निकाल पोलीस पाटलांच्या बाजूने लागूनही त्यांना पुन्हा पदभार देण्यास दिरंगाई केली जाते ती टाळावी व त्यांना तात्काळ पदभार देण्यात यावा. (उदाहरणार्थ भंडारा जिल्ह्यातील 49 पोलीस पाटलांच्या अपिलींचा निर्णय त्यांच्या बाजूने लागूनही त्यांना पदभार देण्यास दिरंगाई केली जात आहे.)
- तालुका प्रशासन भवनाच्या इमारतीमध्ये तालुकास्तरीय पोलीस पाटील भवन मिळावे.
याप्रमाणे सर्व मागण्यावर शासनाने योग्य ते विचार करून त्या लवकरात लवकर मान्य करावे अशी मागणी संघाकडून करण्यात येत आहे.
श्री भृंगराज परशुरामकर पाटील कार्यअध्यक्ष
महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष माननीय श्री भृंगराज परशुरामकर पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटलांना आझाद मैदान मुंबई येथील उपोषणासाठी सर्वांनी 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 दरम्यान उपस्थित राहण्याचे आवाहन केले.प्रत्येक जिल्हा अध्यक्ष यांनी याचे नियोजन करण्याच्या सूचना ही दिल्या. त्यासाठी लवकरच आपापल्या पोलीस स्टेशन अंतर्गत बैठक घेऊन कसे जायचे आहे. यांच नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हा सर्व पदाधिकारी यांनी आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील यांची बैठक घ्यावी. व त्याचे नियोजन करावे.
अफवांना बळी पडू नका
महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघाचे सचिव श्री कमलाकर मांगले पाटील यांनी राज्यातील पोलीस पाटलांना कोणत्याही अपूर्ण बळी पडू नका असे आवाहन केले आहे
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघावर विश्वास ठेवून कायम, भक्कमपणे तन-मन-धनाने संघासोबत असणाऱ्या सर्व पोलीस पाटील बंधू-भगिनींना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघातर्फे दिनांक 28 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत आपले साखळी उपोषण ठरले आहे, आणि ते होणारच!
काही महाभाग राज्यातील पोलीस पाटलांच्या मनामध्ये मध्ये संभ्रम व्हावा, यासाठी पंधरा हजार मानधन झाले आहे / होणार आहे अशा भ्रमक पोस्ट राज्यातील सर्वच व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केल्या जात आहेत, तसेच काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या सुद्धा आल्या आहेत.
कितीही काळ लोटला तरी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघावर राज्यातील 25 हजार पोलीस पाटील बंधू भगिनींचा पोलीस पाटलांचा विश्वास आहे, त्यामुळे अशा लोकांनी कितीही पोलीस पाटलांचा संभ्रम निर्माण केला तरीही , राज्यातील पोलीस पाटील यांना बळी न पडता यांचे प्रयत्न राज्यातील पोलीस पाटील हाणून पाडतील.
त्यामुळे अशा कितीही पोस्ट फिरत असल्या तरी आपण अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये, महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे 28 तारखेपासून साखळी उपोषण होणार म्हणजे होणार. आपण सर्वांनी आपल्या न्याय व हक्कासाठी तीनही दिवस उपस्थित राहून शासनाला आपली ताकद दाखवून द्यायची आहे.
कमलाकर मांगले पाटील
सचिव पोलीस पाटील संघ
धाराशिव जिल्हा अध्यक्ष हनुमंत देवकते पाटील
धाराशिव जिल्ह्याचे तरुण, तडफदार सर्व पोलीस पाटलांना त्यांच्या अडचणीत वेळोवेळी मदत करणारे, सर्वांच्या समस्या जाणून घेणारे, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे एखाद्या पोलीस पाटणांनी विचारलेल्या साध्या प्रश्नालाही अर्थपूर्ण उत्तर देणारे, सर्वांचे आवडते प्रिय जिल्हा अध्यक्ष श्री हनुमंत देवकते पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांना मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील बंधुभगिनींना नम्र विनंती आहे. आपल्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे आपले धडाकेबाज व खंबीर नेतृत्व राज्य अध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेब पाटील शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व कर्तव्य दक्ष सहकारी राज्य पदाधिकारी यांनी होऊ घातलेल्या उपोषणास प्रत्यक्षपणे भरघोस पाठिंबा देण्यासाठी व मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्या शासन स्थरावर मान्य करून घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,लोहारा,तुळजापूर,उमरगा,भुम,परंडा, वाशी,कळंब या तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष व सर्व सन्मानिय पोलीस पाटील बंधूभगिनी यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत आझाद मैदान मुंबई येथे सर्वांनी आपल्या न्याय व हक्कांसाठी बहुसंख्येने उपस्थित राहायचे आहे.
सर्व तालुका अध्यक्ष यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून मी या अगोदरच विनंती पुर्वक सुचित केले आहे. आपल्या तालुक्यातील तहसीलदार साहेब व आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना 24 नोव्हेंबर रोजी लेटर हेड वरती निवेदन दिले. कारण दिनांक 25/26/27 तीन दिवस सरकारी सुट्टी होती. प्रत्येक पोलीस स्टेशन प्रमाणे पोलीस पाटील यांचे गाड्यांचे योग्य नियोजन करावे. महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, पंढरपूर, व इतर ठिकाणी जेव्हा जेव्हा पोलीस पाटील यांचे धरणे आंदोलन, मोर्चे, उपोषण व मेळाव्यासाठी आपला जिल्ह्य कायम अग्रेसर राहीलेला आहे. हीच एकजुट पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देण्यासाठी मुंबई येथे उपोषणामध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित राहणार हीच अपेक्षा
हनुमंत देवकते पाटील
जिल्हाध्यक्ष, धाराशिव
मी येणार, तुम्ही ही या.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी
मोठी मानधनात वाढ होण्यासाठी
अधिनियमात बदल करण्यासाठी
स्वतः होवून आल पाहिजे
जेवढ्या जास्त संख्येने हजर राहू तितक्याच वेगाने सरकार निर्णय घेईल
एक दिवस पाटीलकी साठी
एकजूट दाखवावी लागेल
प्रत्येकांनी आलच पाहिजे
मी येणार आहे
आपण ही आलच पाहिजे
🌹🙏🤝🤝🌹🙏
एक सामान्य, पोलीस पाटील.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.