Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवर सरकारने घातली बंदी

Ethanol Production: केंद्र सरकारने या हंगामात ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातली आहे. सरकारने काढलेल्या या आदेशामुळे सर्व साखर कारखानदारणा मोठा धक्का बसणार आहे.

Ethanol Production

इथेनॉल निर्मितीसाठी उसाचे रस वापरण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन घटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तब्बल 45 लाख मे. टन साखर अधिक उत्पादन होणार असल्याने संभाव्य साखर दरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

इथेनॉल निर्मितीचे कारण

देशात गेल्या 5-6 वर्षात ऊसाचे क्षेत्र वाढून साखर उत्पादन वाढले होते. निर्यातीवरही बंधन घातल्याने साखरेला भाव येत नव्हता. त्यातून गोडावूनमध्ये साखर पडून राहिल्याने कारखाने अडचणीत येऊ लागले. त्यामुळे साखर उत्पादनाला मर्यादा घालण्यासाठी व इथेनॉल निर्मितीसाठी रसाचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला. गेल्यावर्षी 320 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले होते. 40 लाख मे. टन साखर निर्मीतीचा रस इथेनॉल निर्मिती कडे वळविण्यात आला. इथेनॉलला चांगला दर मिळाल्याने कारखाने आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला होता.

इथेनॉल निर्मिती कश्या पासून

गेल्यावर्षी 1250 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली होती. यातील 70% निर्मिती ही ऊसाच्या रसापासून करण्यात आली. इतर धान्यापासून 30% निर्मिती झाली. यावर्षी मात्र महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यात अनियमित पडलेला पाऊस, दुष्काळ यामुळे ऊसाचे उत्पादन आणि क्षेत्र दोन्हीही घटले आहे. यासर्वचा परिणाम म्हणून 20% उत्पादन कमी होणार असल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे साखर दरवाढीचे अंदाज बांधले जात आहेत. त्याला रोखण्यासाठी केंद्राच्या सरकारच्या अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने इथेनॉल निर्मितीकडे रस वळविण्यास बंदी घातली आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“साखर उत्पादनात प्रमुख असलेल्या दोन राज्यातच यंदा फटका बसणार आहे .यामुळे केंद्राला इथेनॉलकडे रस वळविण्यास निर्णय घ्यावा लागला. यातून निश्चितपणे साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे.”

विजय औताडे , साखर अभ्यासक

यंदा 316 लाख मे. टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज होता. पण त्यातेही उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास कमी उपलब्धतेमुळे दरवाढीचे अंदाज बांधले जात आहेत. त्याला थांबवण्यासाठी इथेनॉल निर्मितीकडे रस वळविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यातून यंदा देशात इथेनॉलची निर्मिती घटणार आहे. असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

रसाचे दर

प्रकार दर
इ हेवी 49.41
बी हेवी 60.73
ज्युस रस 65.61
महाराष्ट्रातील साखर कारखान्याची इथेनॉल निर्मितीची वार्षिक क्षमता जवळ पास 244 कोटी लिटर इतकी आहे. महाराष्ट्र राज्यात इथेनॉल प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ज्याची संख्या 163 आहे. देशभरात गेल्या वर्षी जवळपास 1250 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली होती.

राज्यातील इथेनॉलची तीन वर्षातील मागणी व पुरवठा (लिटरमध्ये)


वर्षमागणीपुरवठा
2020-21108 कोटी97 कोटी
2021-22120 कोटी102 कोटी
2022-23132.32 कोटी48.11 कोटी
एकूण मागणी360.32 कोटी247.11 कोटी

सरकारने का घेतला निर्णय

इथेनॉलचे उत्पादन: गेल्या वर्षी इथेनॉल तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या उसाच्या रसातून सुमारे 40 लाख टन साखर ज्यास्त तयार करता आली असती, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे . साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साखरेच्या दरात मोठी वाढ झाली. साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. घरगुती वापरातील साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार होणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा निर्णय का घेतला गेला? अन्न मंत्रालयाने सर्व साखर कारखाने आणि डिस्टिलरीजच्या मुख्य अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मंत्रालयाने पत्र लिहून साखर कारखान्यांना उसाच्या रसाचे इथेनॉलचे उत्पादन थांबवण्याची सूचना दिल्या आहेत.भविष्यात साखर उत्पादन वाढवता येईल आणि त्यामुळे किमती नियंत्रित ठेवता येतील.

इथेनॉलचा पुरवठा कसा होणार?

इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी सरकारने सूचनाही दिल्या आहेत. अन्न मंत्रालयाने सांगितले की, इथेनॉलचा पुरवठा बी-हेवी मोलॅसेसपासून केला जाऊ शकतो. अन्न मंत्रालयाने पत्रात लिहिले आहे की, साखर (नियंत्रण) आदेश 1966 नुसार, तात्काळ प्रभावाने, साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना ESY (इथेनॉल पुरवठा वर्ष) 2023-24 मध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यावर होणार नाही याचा परिणाम

आता उसाचा रस इथेनॉलसाठी वापरला जाणार नसल्यामुळे साखरेचे भाव खाली येणे अपेक्षित आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने उसाच्या भावात प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ केली. हीच किंमत साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. त्यामळे शेतकरी व ग्राहक याना याचा नक्कीच फायदा होईल. अशी सरकारला अपेक्षा आहे.

इथेनॉल च महत्व

ऊसाच्या रसापासून साखर बनवताना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल डिझेल अशा इंधनात मिसळून करता येऊ शकतो. ब्राझिल देश हा इथेनॉलचा वापर जास्तीत जास्त करण्यात आघाडीवर आहे. तिथे 25 ते 30% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वापरले जाते.

इथेनॉल लोकांना माहीत नव्हतं असं नाही, दुसऱ्या जागतिक युद्धामध्येदेखील इथेनॉलचा वापर करण्यात आला होता. स्टोव्ह, गाड्या सर्वत्र इथेनॉलचा वापर आपण करत आलो आहोत, त्यामुळे इथेनॉल नव्याने वापरात येतंय असं नव्हे.”

इथेनॉलचं भविष्य काय :

 प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार

इथेनॉल हे मॅजिक प्रॉडक्ट आहे असं प्रमोद चौधरी म्हणाले, याचं कारण त्यांनी सांगितलं ते पुढीलप्रमाणे, कोणताही पदार्थ, शेतीतला भाग जाळून वाया न घालवता त्यातून इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते, याच्या मदतीने केमिकल्स तयार केले जातात. क्लायमेट चेंजच्या संकटावरही मात करण्यासाठी इथेनॉलला भविष्यात आणखी वाव मिळणार आहे. एविएशनसाठी, विमान उड्डाणालाठीदेखील इथेनॉल वापरलं जाऊ शकणार आहे. पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर व परफ्युम्स आणि अन्य रासायनं बनवण्यातही मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा वापर होतो.

भारताचं स्थान या क्षेत्रात दिवसेंदिवस वर येत चाललं आहे, इतर देशांसोबत तुलना होऊ शकत नाही कारण प्रत्येक देश एक वेगळा प्रयोग करू पाहतोय. ब्राझीलने अल्कोहोलवर काम केलं, अमेरिकेत कॉर्न बेस प्रयोग झाले. भारतात मात्र कॉर्न, ऊस अशा प्रकारे अनेक प्रकारे प्रयोग केले जातायत. अशी माहिती प्रमोद यांनी दिली.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यात साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे या राज्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती होतेच. मात्र जिल्ह्याजिल्ह्यात इथेनॉलचं उत्पादन घेण्याचे दिवस पाहण्यासाठी भारतात तशा पॉलिसीही आणाव्या लागतील. 

आतापर्यंतच्या प्रवासात अनेक मोठे फटके बसले, आर्थिक स्थैर्य नव्हतं, पैसे अडकलेले होते, पण अनेकांनी मदतीचे हात पुढे घेतले आणि धोका पत्करण्याची ताकद मिळाली. कधीच या क्षेत्रात का आलो, किंवा मी इथे अडकलोय अशी भावना मनात आली नाही, असे प्रमोद म्हणाले.

इथेनॉलचा वापर जर जास्त करण्यात आला तर पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. केवळ पेट्रोलमध्ये मिसळूनच नव्हे तर स्वतंत्रपणेदेखील इथेनॉलचा वापर करण्यावर भर द्यावा यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

नव्या तरुणांनी उद्योगात उतरताना मार्केटिंगवर भर देणं फार महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. उद्योगासाठी कर्ज घेण्यात हरकत नाही मात्र त्याचं प्रमाण लक्षात घेऊन त्याची जाणीव उद्योजकांनी ठेवायला हवी. यासाठी अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण खरोखर लागू होते असं ते म्हणाले.

प्रमोद चौधरी यांना 2020 सालच्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं, औद्योगिक जैव तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील नाविन्यासाठी त्यांची निवड करण्यात आली, युकेमधील पहिला इथेनॉल प्रकल्पही त्यांना मिळाला. असे अनेक मोठे पुरस्कार मिळवत, आपल्या कामाची सर्वत्र जगभरात त्यांनी छाप पाडली आणि भारताचं, महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं. नक्कीच देशभरातील तरुण त्यांचा आदर्श ठेवून आपल्या जीवनाला चालना देतील.

Leave a Comment