Easy Loan आत्महत्याच सत्र सुरूच त्या “इझी लोन” फ्रॉड पासून सावध रहा…!

Easy Loan साठ पेक्षा जास्त आत्महत्या ज्यामुळे घडल्यात त्या “इझी लोन ” फ्रॉड पासून सावध रहा …..!

नुकतीच घडलेली घटना एका मित्राचा कॉल आला की त्याच्या शासकीय कार्यालयातील एका महिलेला मेसेज आला होता की की तुम्हला लोन हवे आहे का ? तिला थोडीफार अडचण होतीच तिने रिस्पॉन्स दिला. तर समोरून सांगण्यात आले की, त्यासाठी आमचे अमुक अमुक अँप आहे ते आधी डाउनलोड करा. त्याप्रमाणे तिने ते अँप डाउनलोड केले. आणि नंतर लगेच लोणचे पैसे पाठवण्यासाठी बँक डिटेल्स अथवा G-pay नंबर मागण्यात आला. तिने Gpay नंबर दिला आणि तासभारत खरेच तिला पाच हजार रुपये खात्यावर जमा झाले. तिला त्या पैश्या मुळे आनंद झाला की तिची अडचण सुटली. त्यानंतर त्या लोन देणाऱ्यांनी सांगितलेल्या नियमानुसार वेळेत नंतर तिने कर्ज फेडले सुद्धा ! आणि ती तिच्या नेहमीच्या कामाला लागली.

आणि काही दिवसानंतर तिला कॉल येऊ लागले की तुम्ही आमचं कर्ज आणखी फेडले नाही.मुदत उलटून गेल्याने आता चक्रवाढ व्याज लागले आहे. तर 2 दिवसात सर्व कर्ज फेडा ही महिला घाबरली, तिने सांगण्याचा प्रयत्न केला की ऑलरेडी मी तुमचं पूर्ण कर्ज वेळेत फेडलं आहे. त्या महिलेने त्या व्यक्तीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परुंतु समोरचे लोक तीच काही ऐकत नव्हते आणि वेगवेगळ्या नंबरवरन त्या महिलेला धमकावत होते व कर्जफेडीची मागणी करत होते.आणि नंतर नंतर तर ते व्यक्ती त्या महिलेला चक्क धमकी देत होते. कर्ज नाही फेडलं तर घरात घुसून मारू’ तुमच्या सोसायटीत येऊन तुमची बदनामी करू असे सुरू झालं. तिने वैतागून ते दोन तीन नंबर ब्लॉक करून टाकले.

मग वेगळ्याच नंबर वरून तिला व्हाट्सअप्प वर तिचाच एक फोटो (अर्धनग्न स्वरूपाचा) पाठवला गेला अन सांगितले गेले की, आता वाढी व्याजासह तुम्ही जर पन्नास हजार रुपये लगेच दिले नाहीत तर तुमचा हा फोटो सगळीकडे व्हायरल करू. कारण तुमची contacts लिस्ट पण आमच्याकडे आहे. त्यांना तुमचा हा फोटो पाठवू अशी धमकी त्या महिलेस दिली, आता मात्र ही महिला संपूर्ण हादरली.अर्थातच तो फोटो मॉर्फिंग केलेला होता.म्हणजे एडिट केलेला त्यात महिलेचा फक्त चेहरा आणि बाकी शरीर मॅचिंग असलेल्या दुसऱ्याच स्त्रीचे

पण सामान्य लोकांना इतकं डिटेल पटकन कळत नाही.अन ते घाबरतात.आणि खरोखरच सॅम्पल म्हणून त्या महिलेच्या घरच्या दोघांना तो फोटो पाठवला. त्यामुळे फॅमिली हादरली शेवटी जास्त बदनामी नको म्हणून इकडून तिकडून गोळा करून पन्नास हजार रुपये त्या फ्रॉड वाल्या व्यक्तीला देण्यात आले.तेव्हा त्या स्त्रीचा पिच्छा सुटला.

हे सर्व कसे घडले

आता हे कसे घडले ? तुमच्या मोबाईलमधील तुमचे फोटो, तुमची contacts लिस्ट त्या लोकांकडे काशी गेली ?हा प्रश्न तुम्हांला पडला असेल.तर उत्तर सोपे आहे. तुम्ही जेव्हा ते अँप डाउनलोड करता तेव्हा तेच अस कोणतेही अँप डाउनलोड करता ते तुम्हला काही परवानग्या मागते. ज्यात तुमची फोटो गॅलरी, contacts लिस्ट इत्यादी पाहायला व वापरायला तुम्हीच परवानगी दिलेली असते आणि त्याच अँपच्या माध्यमातून मोबाईलमधील सर्व डेटा कॉपी करून घेतात आन त्याचा उपयोग नंतर तुम्हालाच ब्लॅकमेल करण्यासाठी वापरतात

आता हे असं का घडत ? या मागच आर्थिक गणित पाहूया..!

अनेकांना आर्थिक अडचण असतेच. मात्र त्यातले काही असेही असतात की त्यांचे बँक सिबील खराब असते,किंवा अनेकांना तर ओडी, cc असे कोणतेच ऑफिशियल अकाउंट नसते(या मध्ये घरगुती व्यवसाय करणाऱ्याची संख्या जास्त असते) मग अश्या मंडळींना जेव्हा पैश्याची गरज असते तेव्हा त्यांनी जायचे कुणाकडे ? खाजगी सावकारी कर्ज परवडत नाहीत आणि नंतर त्यांना पठाणी वसुली कायदा माहीत असल्याने तो मार्ग नको असतो. मग आता काय करायचं..? याना तर दहा वीस हजाराची गरज असते . तरी ते दहावीस हजार कसे उभे करायचे ? ऑलरेडी मित्रमंडळी /नातेवाईक यांच्याकडून तेही दरवाजे बंद असतात.

नेमके अश्या लोकांना जाळयात खेचणारे “इझी लोन मिळवा” Easy Loan या प्रकारचे अँप बाजारात आलेत त्याबद्दल आज मी तुम्हला सांगतोय. याची भीषणता इतकी आहे की, बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार या अँपमध्ये easy loan bbc documentary अडकलेल्या आजवर सुमारे साठ लोकांनी जीव दिलाय. हे उघड झालेलं आहे.छुप्या घटना किती असतील अन अनेकजण पोलिसपर्यंत गेले सुद्धा नसतील त्यांची संख्या विचारात घेतली तर याची भीषणता कळेल.

किती झाल्या आत्महत्या

कर्ज देणाऱ्या अँप्सकडून छळ किंवा ब्लॅकमेल झाल्यामुळे गेल्या काही कळत किमान 60 भारतीयांनी जीव दिल्याचं बीबीसीच्या तपासात उघड झालं.पण कोण आहेत हे लोक, जे देशातील सर्वात भीषण घोटाळा चालवत आहेत. तर यातील बहुसंख्य अँप चायनीज टाईपचे आहेत तर काही भारतीयच पण जामतारा टाईप आहेत. जे फक्त लोकांना लुटण्यासाठीच बनवले जातात फक्त वरून गोड मुलामा दिलेला असतो की जसे की,

“दहा मिनिटात कर्ज मंजूर”

“विणातारण तात्काळ कर्ज मिळेल”

“जामीनदाराची गरज नाही”

” सहज लोन घरबल्या घ्या” Easy Loan

या त्यांच्या आमिषाला अनेकजण बळी पडत आहेत. अन नंतर ब्लॅकमेलमध्ये अडकून पैसे आणि अब्रू घालवत आहेत.असे अँप चालवणाऱ्या लोकांचे जे कॉल सेंटर असतात तिथल्या कॉल करणाऱ्या लोकांना घाण घाण शिव्या देता येणे हाच एक निकष लावून नोकरी दिली जाते.हेही भीषण सत्य आहे. ते बिचारे पोटसाठी नोकरी करतात.पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अँपमालक तुमची शिकार करत असतात.

मग आता यावर उपाय काय.?

यावर काय उपाय आहेत ते नीट समजून घेऊया ..!

1) मुळात एक तर असं कुणी सहजासहजी तुम्हाला कर्ज का देईल? हा विचार करायला शिका! इथं ओळख नसेल तर कुणी दहा रुपये देत नाही मग ते अँपवाले लोक का देतील ? ते ही तुमची ओळख नसताना त्यामुळे हा विचार करायला शिका ! आर्थिक अडचणी नक्कीच असतात.मात्र त्यासाठी हा इझी लोन चा मार्ग कधीच निवडू नका.बँकेत प्रमानींकपणे हेलपाटे घालत रहा. ते योग्य राहील नाहीच जमल तर जवळचे काही विका अन पैसे उभे करा पण या अँप च्या नादाला लागू नका. विकण्यासारखे देखील काही शिल्लक नसेल तरी आभासी अँप द्वारे कर्ज घेऊ नका ! आजची तुमची आर्थिक अडचण उद्या कदाचित सुटेलही पण अँपच्या सापळ्यात अडकला तर कधीच सुटका नाही हे लक्षात असू द्या.

२) आर्थिक अडचण ही टेम्पररी फेज असते. कायमची नसते, त्यामुळे अशावेळी थोडा धीर धरा काहीतरी विश्वासहार्य मार्ग निघतोच विश्वास ठेवा. अश्या अनेक केसेस अडचणीतल्या माझ्याकडे आलेल्या त्यांना तर पुढच्या आठवड्यात खायचे वांदे नाहीतर सुसाईड करावे लागले. अशा परिस्थितीत तरी त्यांना हेच सांगितले होते. आणि गंमत म्हणजे आता वर्ष होऊन गेले ते व्यवस्थित आहेत. याचे साक्षीदार इथेच काही एफबी फ्रेंड आहेत. याचाच अर्थ आर्थिक अडचण ही टेम्पररी फेज असते. आज न उद्या सुटेलच त्यामुळे क्षणिक सुटकेसाठी ॲप सारख्या जाळ्यात स्वतःहून अडकायला जाऊ नका. पोस्टमध्ये जास्त स्पष्ट सांगता येत नाही. पण त्या लोकांच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंग इतक्या वाईट प्रकारचे असते की, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. कोणत्या पातळीवर ते जातात.त्यामुळे त्यांच्यापासून आधीच चार हात दूर राहा.

अजून एक म्हणजे चुकून तुमच्यापैकी कोणी या त्रासात अडकला तर त्यांनी टेन्शन घेऊ नका जास्त पैसे तर अजिबात देऊन नका. सरळ सायबर सेल कडे तक्रार करा शिवाय केंद्र सरकारच्या 1930 या नंबर वर ऑनलाईन तक्रार करा. आणि त्याचबरोबर जवळच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना सांगून ठेवा की, असं असं घडलं आहे. तर समजा काही फोटो तुम्हाला पाठवले गेले तर तुम्हीही प्यानीक होऊ नका. शांत रहा मॉफिंग केलेले फोटो आहेत. ते त्यात जी व्यक्ती दिसते ती मी नाहीये, जवळचे लोक सहज समजून घेतील आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्याची हवा निघून जाईल.

३) आणि हो तुमच्या परिचितांचे जर नकळत असा फोटो तुम्हाला पाठवला गेला. तर तुम्ही घाबरू नका तर उलट कॉल करून त्याला काळजी नको करू सांगा. त्यामुळेही तुमचा तो मित्र बराच सावरेल कारण ज्या साठ आत्महत्या झाल्या त्यात नातेवाईकांनी तसले फोटो पाहून नंतर त्या व्यक्तीला आधार द्यायचे सोडून, त्यालाच फैलावर घेतले आणि त्यामुळे कंटाळून त्यांनी जीव दिलेत हे समजून घ्या.

आता काहीजण म्हणतील की सरकारने अशा ॲपवर बंदी घातली पाहिजे, आरोपी पकडले पाहिजे, ते काम त्यांचे आहे. तरी ते मलाही ते मान्य आहे. पण सगळंच त्यांच्यावर ढकलून काय होणार. आपण आपली जबाबदारी कधी ओळखणार आहे. विचार करू सावधान रहा, सुरक्षित रहा.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा

Leave a Comment