तुळजापूर ची TuljaBhavani
TuljaBhavani तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिव मधील तुळजापूर मध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशा या देवी बाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाराचा नैवेद्य का दाखवतात? खरच तो धकवला जातो का? आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे? पाहूयात या ब्लॉग च्यामाध्यमातून.
कर्दम ऋषी
नमस्कार, मी योगेश तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय, तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिर साठी, आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी, आशीर्वाद रुपी ठरलेली आहे. देवी बाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते.की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती. पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली पण तिथं कूपर नावाचा राक्षस तिच्या कडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसा पासून वाचावं म्हणून अनुभूतीने आधी मायेचा धावा केला, हिच्या रक्षणासाठी आधी माया प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला.
त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकार ही दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुना चल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं, याच बालाघाट डोंगरांच्या वरच्या यमुना चल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं जे तुळजापूरात आहे.
तुळजाभवानी मंदिराचा इतिहास
आता पाहूया, तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे. आदी शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्री यंत्रावरती उभी केल्याचं सांगितले जात. मंदिराच गर्भ गृह, सभामंडप, गोमुख, कलोळ तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेरावा शतकात बांधलं गेलं असावं असे इतिहासकार सांगतात. देवीचे मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आले आले आहे. मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे.
मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. तीन फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे. आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चन्द्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासुर राक्षसावर आहे. तर डावा पाय जमिनीवर आहे. आणि या दोन पायांच्या मध्ये महिषासुर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुमुती हि देवीच्या डाव्या बाजूला पहायला मिळते.
देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चाल मूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातनं तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते. कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात, आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिरा बाहेर नेलं जात आणि याप्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेच नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येत. यामागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्तीही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोलगं करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तबल पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाहीये हे विशेष.
देवीला नेवैद्य कशाचा
आता येतो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणत्याही देव देवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे म्हणतांकडून देवीची पूजा केली जाते, आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधींकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात. करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबतच अभिषेक वस्त्रलंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला, पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्या नंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रतेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो.
मांसाहाराचा नेवैद्य कोणासाठी
सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पण देवीला मांसाराचं नैवेद्य कसा तर, या मागची कथा सांगतात. महिषासुर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले. आणि त्यांनी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रम्हा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली.
महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता. तेव्हा तो देवीला शरण आला माझं गर्व हरण झालय, असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवी समोर मांडल्या. यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नेवेध दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छे प्रमाणे देवीचं नाव हे महिषासुर मर्दिनी अस घेतलं जात. दुसऱ्या इच्छे प्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नेवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला धाकवात. हा नेवेद्य खालून वर असा धाकवला जातो. पण पूर्ण मुखा जवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नेवेद्य हा देवीला नसून महिषासुर नावाच्या राक्षसाला धाकवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नेवेद्य असतो. परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नेवेद्य बनतो.
अष्टभैरवाची कथा
या शिवाय दिवाळीची सुद्धा एक मांसाहाराची नेवेद्याची एक कथा सांगतो . तुळजापूर इथल्या मंदिराचे महंत योगी मावशी ना त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यत देवी पाठवते. तिथे आल्यावर तो देवी ने त्याला का पाठवले, तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात. त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले. तो दिवस दिवाळीचा होता. म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरवनाथला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणाचा नैवेद्य असतो.
अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरा सुद्धा आहेत. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा