महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Drought दुष्काळ यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातील काही तालुके तर अत्यंत गंभीर परिस्थिती असणारे आहेत. या तालुक्यातील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून शासनाकडून अपेक्षा होती. की लवकरच या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाईल. आणि आज महाराष्ट्र शासनाने 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे.

प्रस्तावना

दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 1 व 2 अन्वये सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आली. संदर्भाधीन निर्णय व दुष्काळ व्यवस्थापन संहितेमध्ये विहित केलेल्या निकषांनुसार खरीप 2023 च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली. दुष्काळाची दुसरी कळ लागू झाल्याने 43 तालुके पैकी उल्हासनगर या तालुक्यात पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याने, सदर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. उर्वरित 42 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्या आधारे राज्यातील राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हेही वाचा 👉महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, यात आपल्या तालुक्याचे नाव आहे का ? हे तपासा 2023 Drought in Maharashtra 2023

काय आहे शासनाचा निर्णय

1) राज्यातील तालुक्यामधील जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आद्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिकाची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन. राज्य शासन या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.

2 दुष्काळ घोषित करण्यात येत असल्या असलेल्या 40 तालुक्यांमध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

  • जमीन महसुलात सूट.
  • पीक कर्जाचे पुनर्गठन.
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती.
  • कृषी पंपाच्या चालू विज बिल 33.5% सूट.
  • शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
  • राहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स चा वापर.
  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

3) या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलती पोटाची आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.

हेही वाचा 👉यंदा 1972 नंतरची सर्वात मोठी Water shortage पाणी टंचाई Trustworthy

4) सदर तालुक्यातील खातेदारा कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुदेय राहील. सदर निर्विष्ठा अनुदान हे कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या 33 % पेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुदेय राहील. निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करताना शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 18/10/2023 मधील तरतुदी मध्ये विहित केलेली कार्यपद्धती अवलंबिण्यात यावी. निविष्ठा अनुदानाचे दर व इतर अटी व शर्ती शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक सीएलएस 2022 प्र क्र 349/ म 3 दिनांक 27 मार्च 2023 मध्ये नमूद केलेल्या नुसार राहील. तसेच निविष्ठा अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी.

5) सदर मदतीचे वाटप सन 2023 च्या खरीप हंगामातील 7/12 मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात यावे.

6) हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगांती आलेल्या पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकाचे 33% नुकसान ठरविण्यात. यावे प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या करोडवाहू पिकांना सुद्धा मदत अनुदेय आहे.

7) बहुवर्गीय फळपिके व बागायती पिके यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात यावी.

हेही वाचा👉Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार..!

8) बहुवर्गीय फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्या चा निकष सातबारा मधील नोंद हा असेल. नुकसानीची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामा हा निकष असेल. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी त्याची नोंद सातबारा मध्ये असणे आवश्यक आहे.

9) सन 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाहणी मधील पिकांच्या सातबारा मधील उताऱ्यातील नोंदी बाबत कोणताही अक्षेप उद्भवल्यास त्याचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहिते मधील तरतुदीनुसार करण्यात यावे.

10) दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. तसेच मध्यान भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत (आयसीडीएस) मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे.

11) सदर आदेश हे प्रशासकीय मान्यतेचे असून निधी वितरणाबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येते. सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी संबंधित क्षेत्रीय यंत्रणाना आवश्यक ते आदेश तातडीने निर्गमित करावेत.

12) दुष्काळ घोषित केल्याचे आदेश या आदेशाच्या दिनांक पासून अमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. संबंधित जिल्हा अधिकारी यांनी या आदेशास जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी द्यावी. तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास प्राधान्य प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना अमलात आणाव्यात.

13) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20231031154505 419 असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

14) महाराष्ट्र शासनाने एकूण 15 जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची पुष्टी केलेले आहे सन 2023 खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खालील प्रमाणे आहे. त्यामध्ये दोन विभाग करण्यात आलेले आहेत. पहिला म्हणजे गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके आणि दुसरा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके.

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची नावे

गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके

नंदुरबार, चाळीसगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड,मंठा, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, पुरंदर, सासवड, बारामती, वडवणी, धारूर, आंबेजोगाई, रेनापुर, वाशी, धाराशिव, लोहारा, बार्शी, माळशिरस, सांगोला या 24 तालुक्यामध्ये शासनाने अति गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे.

मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके

सिंदखेड, बुलढाणा, लोणार, शिरूर घोडनदी, दौंड, इंदापूर, करमाळा, माढा, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, खानापूर, विटा, कडेगाव, मिरज या 16 तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment