Curfew धाराशिव जिल्यातील संचारबंदी शिथिल, जमावबंदी व शस्त्रबंदी कायम

विषय Curfew

फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे curfew कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश रदद करणेबाबत.

आदेश

मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हयातील विविध भागात धरणे आंदोलने, रस्ता रोको, उपोषण, इ. चालू असल्यामुळे कायदा व ‘सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार उपरोक्त वाचा मध्ये नमूद आदेशान्वये धाराशिव जिल्हा हद्दीपावेतो पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्य आलेली होती.

हेही वाचा 👉Curfew धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी 144 लागू- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश

धाराशिव जिल्हयामध्ये लागू करण्यात आलेले उपरोक्त वाचा मध्ये नमूद संचारबंदीचे आदेश दि. 01.11.2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपासून या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहेत. सदरचा आदेश दिनांक 01.11.2023 रोजी माझ्या सही शिक्यानिशी दिला.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश

आदेश

ज्याअर्थी, मा. पोलीस अधिक्षक धाराशिव यांनी त्यांचे पत्र दि.31/10/2023 नुसार धाराशिव जिल्हयात खालील प्रमाणे सण / उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे, मोर्चे, बंद, संप, रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. धाराशिव जिल्ह्यात दिपावली सणानिमित्त दिनांक 09.11.2023 रोजी वसुबारस, दिनांक 10.11.2023 रोजी धनत्रयोदशी, दिनांक 12.11.2023 रोजी लक्ष्मीपूजन, दिनांक 14.11.2023 रोजी बलीप्रतिपदा, दिनांक 15.11.2023 रोजी भाऊबीज हे सण / उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 27.11.2023 रोजी गुरनानक जयंती साजरा होणार आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष / संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष / संघटना यांचे कडुन धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष / संघटना व शेतकरी संघटना यांचे कडुन धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीकरीता आंदोलने होत आहेत. धाराशिव जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठ्या स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष / संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण / उत्सव व आंदोलनात्मक कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 01/11/2023 रोजीचे 00:01 पासून ते दिनांक 30/11/2023 रोजी 24:00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात जारी होणेस विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे अहवालावरुन जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्याची माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, मी, महेंद्रकुमार कांबळे, अपर जिल्हादंडाधिकारी धाराशिव या आदेशाव्दारे असे निर्देश देत आहे की, शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातुन उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 01.11.2023 रोजीचे 17:00 पासून ते दिनांक 15.11.2023 रोजी 24:00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

कोणत्या गोष्टीस मनाई

1. शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.

  1. लाठ्या काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत.
  2. 3. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.
  1. दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.
  2. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.
  3. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.
  4. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.
  5. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही.

मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरीता लागू होणार नाहीत.

हेही वाचा👉महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

कोणत्या गोष्टी वर प्रतिबंद नसणार

1) अंत्ययात्रा

2) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी

परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही. हा आदेश आज दिनांक 01/11/2023 रोजी माझ्या सही व शिक्यानिशी दिले.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment