Baba Maharaj Satarkar हरी पाठातला गोड आवाज गेला बाबा महाराज सातारकर यांचे निधन

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी.

Baba Maharaj Satarkar मंडळी वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अदभूत पैलू त्याची भुरळ कोणाला पडली नाही तर नवलच.आमच्या गावात सुद्धा वारकरी सांप्रदायाची पाळंमुळं रुजलेली आहेत. मग अगदी रोजच्या नामस्मरणापासून ते आषाढी कार्तिकी वारीत वारकऱ्यांना घरी जेवण घालण्यापर्यंत अनेक कार्यक्रम गावात होत असतात. त्यातल्या त्यात खास गोष्ट सांगायची म्हणजे, गावात अनेकांच्या घरी रोज पहाटेची सुरुवात सुंदर आवाजातल्या हरीपाठाने होते. त्या हरीपाठाचा आवाज असतो. Baba Maharaj Satarkar यांच्या गोड मृदू आणि संयमी आवाजात हरिपाठ ऐकताना मनात पांडुरंगाची भक्ती आणि अंगावर शहारे आले वाचून राहत नाहीत.

Baba Maharaj Satarkar

काही जनतर म्हणतात. Baba Maharaj Satarkar यांचा हरिपाठ ऐकताना अक्षरशहा तंद्री लागल्या सारखं होत. ते आज वारकरी सांप्रदायाला कायमचं पोरकं करून गेले. अनेकांना विश्वास बसणार नाही, पण दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी जेष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण Baba Maharaj Satarkar यांचे निधन झालं, ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईच्या नेरूळ हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य सर्वांना परिचित आहे. त्यांचा सामाजिक कार्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

नमस्कार मी योगेश, ज्ञानेश्वरीत सांगितले तसे प्रत्येक माणूस ईश्वराचा अंश आहे, पण काही माणसं मात्र त्यांच्या निस्वार्थ कर्मामुळे ईश्वराच्या अधिक जवळ जातात. असं खुद्द बाबा महाराज सातारकर त्यांच्या कीर्तनात सांगायचे. ज्ञानेश्वरीचे निरूपण करताना त्यांनी वापरलेले वाक्य आज त्यांच्याच बाबतीत खरं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण बाबा महाराज यांच्या अनुयायांच्या मते बाबा महाराज सातारकर हे कीर्तन कलेचा परिपूर्ण अविष्कार होते. त्यांचे अनुयायी त्यांना श्रद्धास्थान,भागवत धर्माचा वैश्विक राजदूत,आधुनिक काळातील माऊली, महाविष्णू अशा अनेक नावांनी ओळखायचे. बाबा महाराज सातारकरांचं कर्तुत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व सगळच महाराष्ट्राला भावलं. आजच्या घडीला कीर्तन आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपण सेवेतील ते सर्वात आघाडीचे कीर्तनकार होते.

Baba Maharaj Satarkar यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं खर नाव. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून म्हणजेच तब्बल 135 वर्षांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जाते. बाबा महाराजांनी तीच परंपरा शेवटपर्यंत जपली. किंबहुना पूर्ण क्षमतेने पुढे नेली , बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदुंग वादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत साहित्याची प्रचंड आवड होती. त्यांचे चुलते अप्पा महाराज आणि आण्णा महाराज हे सुद्धा आघाडीचे निरूपणकार म्हणून प्रसिद्ध होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. काही जणांच्या म्हणण्यानुसार बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एसएससी पर्यंतचे शिक्षण घेतलं होतं.

वयाच्या 8 व्या वर्षी पासूनच Baba Maharaj Satarkar श्री सद्गुरु दादा महाराजांच्या कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे तिथूनच त्यांच्यावर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या 11 व्या वर्षापासूनच त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे, लतापत हुसेन खा साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते. महाराष्ट्राला तशी प्रदीर्घ अशी कीर्तनाची आणि ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा लाभलेली . पण तरीही मागच्या शंभर वर्षांपासून वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फ ड म्हणून सातारकर घराण्याचे नाव मानाने घेतलं जातंय.

असो पण सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1950 ते 1954 या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केल्याचाही बोललं जातं. पुढे त्यांनी आपलं वकिलीचा शिक्षण पूर्ण केलं पण नंतरच्या काळात त्यांचा आध्यात्मिक ओढा जास्त वाढला आणि त्यांनी स्वतःला पूर्णवेळ श्री विठ्ठल भक्ती झोकून दिलं. दरम्यानच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी त्यातल्या ओव्या ओव्यांचा आशय त्याचा मतिथ अर्थ यावर पर प्रभुत्व मिळवलं.

तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं, आणि मग त्यांनी कीर्तनकार आणि निरूपणकार म्हणून कारकीर्द सुरू केली. 1962 साली आप्पा महाराज सातारकर या त्यांच्या चुलत्यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवले. डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा ही त्यांनी सुरू केली. त्यानुसार भंडारा, डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आधी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्तांचा आयोजन केलं होतं.

बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना सांप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त करून त्यांचा संसार कायमचे मार्गे लावले. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेमार्फत दरवर्षी 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसंच औषधे पुरवण्यात येतात. पुढे 1990 साली त्यांनी श्री बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठांची स्थापना केली. त्यातूनही हजारो लोक त्यांनी अध्यात्माशी जोडले. ज्येष्ठ निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांनी त्यांचे सगळे आयुष्य संप्रयदयाच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं.

रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचे व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केलं विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी खूप काळ लोकांना मार्गदर्शन केलं. बाबा महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अगदी विदेशातही बाबा महाराजांचे कीर्तन सोहळे झाले आहेत. झी टॉकीज ने सुरु केलेल्या गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचा महासोळा एकदा बाबा महाराज यांच्या कीर्तनरुपी सेवना संपन्न झाला होता. तरी 85 वय वर्ष असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज स्पष्ट आवाजातला ठाणपणा पाहून उपस्थित लोक भारावून गेले होते. त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना बाबा महाराज हे नाव मिळालं. आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं बाबा महाराजांची खास ओळख म्हणजे त्यांची शुद्ध भाषा आणि स्पष्ट आवाजातला हरिपाठ झाला होता.

त्या हरिपाठच कॅसेट रेकॉर्डिंग सुद्धा तुफान वायरल झालं होतं. कॅसेटचा विक्रमी खफ झाल्यानंतर राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने बाबा महाराजांना गौरवण्यात आलं होतं. तेवढेच नाही तर श्री देव देवेश्वर संस्थान सारसबाग पुणे विद्यापीठ नामदेव उद्यासन यातर्फे त्यांना त्यांच्या कार्यासाठी गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाने त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याशिवाय आणखी सांगायचं म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली,तसंच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सासवड, पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिका तर्फे त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले.

हे झालं त्यांच्या एकूण कार्य कर्तुत्वाबद्दल, आता आपण कौटुंबिक माहिती घेऊया. उपलब्ध माहितीनुसार नेरूळच्या आगरी कोळी भावना समोरच्या एका वसाहतीत बाबा महाराज आणि त्यांचे कुटुंब राहत होतं. बाबा महाराजांच्या पत्नीचे नाव रुक्मिणी उर्फ माई सातारकर असं होतं. दरम्यान याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फमाई सातारकर यांचे निधन झालं होतं. त्यानंतर बरोबर आठ महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांची आज सकाळी सहा वाजता प्राणज्योत माळवली. बाबा महाराज सातारकर आणि पत्नी सातारकर यांना तीन अपत्य झाली. त्यापैकी भगवती आणि रासेश्वरी या दोन मुली तर चैतन्य नावाचा एक मुलगा होता. सगळेच त्यांच्या कुटुंब परंपरेनुसार कीर्तन सेवेत कार्यरत झाले होते.

पण काही वर्षांपूर्वी चैतन्य महाराजांचे अकस्मात निधन झालं आणि गोरे कुटुंबावर शोक कळा पसरली. त्यानंतरही बाबा महाराज अखंडपणे त्यांची कीर्तन रुपी सेवा बजावत राहिले. पण आता त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदाय परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली हरिभक्त पारायण भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंड्याचा परिवार आहे.मिळालेल्या माहितीनुसार बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 27 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी पाच वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

Baba Maharaj Satarkar मंडळी वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अदभूत पैलू त्याची भुरळ कोणाला पडली नाही तर नवलच.आमच्या गावात सुद्धा वारकरी सांप्रदायाची पाळंमुळं रुजलेली आहेत. मग अगदी रोजच्या नामस्मरणापासून ते आषाढी कार्तिकी वारीत वारकऱ्यांना घरी जेवण घालण्यापर्यंत अनेक कार्यक्रम गावात होत असतात. त्यातल्या त्यात खास गोष्ट सांगायची म्हणजे, गावात अनेकांच्या घरी रोज पहाटेची सुरुवात सुंदर आवाजातल्या हरीपाठाने होते. त्या हरीपाठाचा आवाज असतो. Baba Maharaj Satarkar यांच्या गोड मृदू आणि संयमी आवाजात हरिपाठ ऐकताना मनात पांडुरंगाची भक्ती आणि अंगावर शहारे आले वाचून राहत नाहीत.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment