APAAR शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

APAAR ऑटोमेटेड परमनंट ऑकेडमीक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच (APAAR ID)

Nique Number For Students: APAAR

आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम किंवा एड्युलर आजीवन आयडी APAAR क्रमांक मानला जाईल. तो 12 अंकी युनिक क्रमांक असेल. हा आयडी कोणत्याही विध्यार्थीला नर्सरी, शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल त्यात शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी ट्रान्सफर, प्रमाणपत्र पडताळणी, स्किल ट्रेंनिग, इंटर्नशिप, स्कॉलरशिप, अवार्ड, कोर्स क्रेडिट ट्रान्सफर आणि इतर कोणत्याही कामगिरीची माहिती डिजिटल रुपात एकत्र केली जाईल.

किती विध्यार्थी

देशभरात जवळपास 30 कोटी विध्यार्थी आहेत.त्यात 4.1 कोटी उच्च शिक्षण आणि जवळपास 4 कोटी स्किलिंग कोर्सेशी निगडित आहेत.

हा आयडी कधी बनेल

APAAR आयडी आधार क्रमांकाच्या माध्यमातून प्रसिद्ध होईल.तो केवळ शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून बनेल.आई -वडील पालकाची संमतीही घेतली जाईल. कारण ही माहिती शैक्षणिक विभाग आणि संस्थाकडून अदान प्रदान होईल त्यानुसार मुलांच्या आधार कार्डची पडताळणी केली जाईल. अपारशी निगडित रेकॉर्ड्स डीजीलाँकर मध्ये उपलब्ध असेल.

याचा उपयोग कसा होईल

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी निगडित प्रत्येक माहिती अपार क्रमांकासह उपलब्ध होईल. नोकरी मिळविण्यासाठी ही थेट अपार क्रमांकाचा उपयोग करता येईल. नोकरी मिळाल्यानंतर स्किलिंग रिस्किलिंग व अपस्केलिंग मध्येही उपयोग होईल.

  1. शैक्षणिक शिवाय इतर रत्र काय उपयोग होईल. रेल्वे आणि बस आरक्षण करताना अपार क्रमांकाचा उपयोग करता येईल. अपार ओळखपत्रामुळे कोणत्या गोष्टी सोप्या होते.
  2. कोर्स क्रेडिट ट्रान्सफॉर्म मध्ये सहजता. एखाद्या कोर्सचे दोन विषय पूर्ण केले असतील आणि इतर विषय नंतर पूर्ण करायचे असतील तर त्यात तुम्ही दोन विषय पूर्ण केल्याची माहिती जतन होईल ते पुन्हा शिकण्याची गरज नाही.
  3. अपार मध्ये प्रमाणपत्र व्हेरिफाइड असतील पुन्हा पुन्हा व्हेरिफिकेशन ची कटकट कायमची संपणार.
  4. तुम्ही एखाद्या शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यास वा डिग्री घेतली असल्यास तशी माहिती अपडेट केली जाईल.
  5. एखादी योजना कन्सेशन पुरस्कारासाठी तुम्ही पात्र असाल तर अपार क्रमांक सांगतात संबंधित संस्थेला माहिती मिळेल.

Unique Number For Students: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा एक भाग म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाउंट रिजिस्ट्री तयार केली जात आहे. यातून शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे या अंतर्गत वन नेशन वन स्टुडन्ट आयडी तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12 अंकी आधार आयडी व्यतिरिक्त हा एक दस्तावेज असेल. पालकांच्या परवानगी नंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर हा अजीवन आयडी क्रमांक मानला जाईल या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आणि यशाचा मागवा घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यार्थ्यांसाठी APAAR आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. APAAR आणि राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क हे भारत भरातील विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट प्रकारचे क्या आर कोड असतील.

पालकांशी बोलून निर्णय

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रत्येक कौशल्याची माहिती फीड केलेली असेल. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना APAAR आय डी तयार करण्याच्या महत्त्वावर चर्चा करण्यासाठी 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पालक आणि शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात सांगितले आहे AICT चे अध्यक्ष T G सितारामन यांनी या संदर्भात माहिती दिली.

विद्यार्थ्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध

अपार आयडीवर कॅप्चर केलेला डेटा APAAR आय डी चा मुख्य आधार असेल. दरम्यान आम्हाला आधीपासूनच पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार तपशील अपडेट करण्यास अडचणी येत आहेत. असे शाळेच्या प्रमुखांनी सांगितले.

पालकाची परवानगी आवश्यक

विद्यार्थ्यांना या युनिक आयडी देण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा हा डेटा गोपनीय राहील आणि आवश्यक असेल, तेव्हा सरकारी एजन्सींना पुरवला जाईल. अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. संमती देणारे पालक कधीही दिलेली परवानगी मागे घेऊ शकतात. पालकांच्या संमती नंतर विद्यार्थ्यांची माहिती केंद्रीय एकात्मिक जिल्हा आणि माहिती प्रणाली एज्युकेशन प्लस पोर्टलवर अपलोड करणे शाळेची जबाबदारी असणार आहे.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment