Gram Panchayat शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बालसभेचे आयोजन
Gram Panchayat धाराशिव तालुक्यातील पाडोळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पाडोळी परिसरातील सर्व शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी बालसभेच्या आयोजन करण्यात आले होते.
मुलांनी आपली मतं फक्त आपापसात मांडायची का? मुलांपेक्षा वेगळय़ा असणाऱ्या यंत्रणेपर्यंत ती कशी पोचणार? मुलांवर होणाऱ्या अंतर्बाह्य़ परिणामांना कसं मोजता येणार? मुलांना काय हवंय यापेक्षा मोठय़ांना काय हवंय याचाच विचार का होतो? मुलांना व्यासपीठ मिळतं ते फक्त स्पर्धापुरतं. म्हणजे वक्तृत्व, कथाकथन, प्रश्नमंजुषा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अशा माध्यमांतून. पण त्याही पलीकडे मुलांना खूप बोलायचे असते, समजून घ्यायचे असते. खूप खूप छोटय़ा अपेक्षा असतात मुलांच्या. म्हणूनच मुलांना हवं असतं त्यांचं असं व्यासपीठ!
ही बालसभा 2024-25 या वर्षासाठी “आमचा गाव आमचा विकास” या विषयाला अनुसरून होती. या उपक्रमांतर्गत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यांचे स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी पाडोळी गावातील अनेक विद्यार्थी गावाच्या विकासाबद्दल भरभरून बोलले. आपले गाव कसे असावे याबद्दलच्या कल्पना त्यांनी जमेल त्या शब्दात मांडल्या.
विद्यार्थ्यांनी मांडल्या समस्या
शाळेसाठी मलखांब, नळ कनेक्शन, शौचालय व गावात मोठे वाचनालया असावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर विचारवंतांचे वाचन साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशी अपेक्षा सुदर्शन कांबळे व पायल खराडे यांनी यावेळी व्यक्त केली. गावात शाळकरी मुलींना सायकल मिळाव्या तसेच ओपन जिम व क्रीडा साहित्य मिळावे. मुलींसाठी वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी व्हावी अशी इच्छा प्रतीक्षा घुले या विद्यार्थिनीने व्यक्त केली. गावात महिलांसाठी बस थांबा व त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी असे मत विद्यार्थी आरती महामुनी यांनी व्यक्त केले. गावात पान टपरी, गुटखाबंदी व दारूबंदी करावी असे मत राणी गुंड व शाहिद मुलांनी यांनी व्यक्त केले. गावात मुख्य रस्त्यावर गतिरोधक असावे असे मत पारस कारेकर यांनी मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून अनेक विकासाभिमुख उपक्रम सुचवले, तसेच गावांमध्ये असणाऱ्या विविध समस्या व त्यावर उपाय या संदर्भात स्वतःचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी बचत संदर्भात, वृक्ष लागवड या संदर्भात विद्यार्थ्यांनी गंभीर मत व्यक्त केले.
पाडोळी येथील ही बालसभा इतर गावांसाठी प्रेरणा
पाडोळी येथे झालेली ही बालसभा परिसरातील इतर गावांसाठी आदर्शवत ठरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीभाषेतून आपल्या अपेक्षा बाल सभेत व्यक्त केल्याने पाडोळी ग्रामपंचायत भारावून गेली. सरपंच व ग्रामस्थ या बालसभेतून बालविचाराने भारावून गेल्याने अशा बालग्रामसभा जिल्हा परिषद शाळेत राबविल्याने मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आभार मानले. व अशी संधी आमच्या विद्यार्थ्यांना सतत मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सभेसाठी उपस्थित
ग्रामपंचायतच्या या अनोख्या आदर्श उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. या सभेसाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाची संख्या ही खूप मोठी होती. तसेच यावेळी बाल सभेत पाडोळीच्या सरपंच मंगलताई एकंडे, उपसरपंच माने, ग्रामसेवक भोईटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक जी. आर. गोरे. रूपामाता शाळेचे सोनटक्के सर, यांच्यासह सर्व शाळातील शिक्षक व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालसभेबद्दल मत
“जिल्हा परिषद प्रशालेत पाडोळी ग्रामपंचायतीच्या वतीने बाल सभेचे आयोजन प्रथमच करण्यात आले. या बाल सभेतून आमच्या शाळेतील मुले बोलती, होऊन विद्यार्थ्यांनी विविध समस्या व त्यांच्या अपेक्षा यावेळी व्यक्त केला अशी संधी आमच्या विद्यार्थ्यांना मिळवून दिल्याने ग्रामपंचायतीचे आभार.”
जी. आर. गोरे. मुख्याध्यापक
“विद्यार्थ्यांसाठी बालसभा आयोजन करणारी पाडोळी ही पहिली ग्रामपंचायत असून मी शाळकरी मुलांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन गावासाठी व समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मला या शाळकरी मुलांकडून बालसभेत मिळाळी“. सतीश एकंडे, सदस्य, ग्रामपंचायत पाडोळी
“बालसभा आमच्या शाळेत राबिल्याने आम्हाला आमच्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर संधी उपलब्ध झाल्याने आम्हाला आमच्या मनातील अपेक्षा मुक्तपणे व्यक्त करता आल्या“.
प्रतीक्षा घुले, विद्यार्थिनी, रूपामता विद्यालय
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.