देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म मृत्यू Birth and Death Registration नोंदणी सुधारणा कायदा २०२३ लागू होणार आहे.

याचा वापर कुठे केला जाऊ शकतो.

     Birth and Death Registration यामुळे जन्म दाखला या एकमेव कागदपत्रांचा वेगवेगळ्या सरकारी कामासाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी, विवाह नोंदणीसाठी, सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या व अशा कामांचा यात समावेश आहे.त्यामुळे जन्म दाखल्याला विशेष महत्व आहे.

जन्म दाखल्यावरील नावात चूक असल्यास येणाऱ्या अडचणी.

पण बऱ्याचदा जन्म दाखल्यावरील नावात चूक असल्याचं समोर येतं. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचेही प्रकार आढळतात.अशावेळी  पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक कामांसंदर्भात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जन्म दाखल्यावरील नावातील चूक दुरुस्त करणं अपरिहार्य ठरतं .Birth and Death Registration याशिवाय, शहरी भागात बाळाचा जन्म झाला की, दवाखान्यातून जन्म प्रमाणपत्र मिळतं. त्यानंतर आवश्यक असलेला जन्म दाखला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घ्यायचा असतो. कधीकधी पालकांकडून तो घेतला जात नाही.त्यामुळे जन्माची नोंद तर आहे, पण त्यात नाव समाविष्ट नाही, अशी स्थिती निर्माण होत.

जन्म दाखल्यात नाव कसं सामाविस्ट करायचं

* नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेले नागरिक जन्म दाखल्यात त्यांचं नाव समाविष्ट करू शकतात. राज्यातील ज्या         नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्याची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आहे.आणि त्याला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.असे नागरिक   जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करू शकतात . Birth and Death Registration

* 1996 पूर्वीच्या जन्म नोंदणीमध्ये नावाचा उल्लेख नसलेलं, असे नागरिक यासाठी अर्ज करू शकतात.

* जन्म दाखल्यात 27 एप्रिल 2036पर्यंत नावाची नोंदणी करता येणारं आहे .

* 2036 नंतर जन्म दाखल्यात बाळाच्या नावाची नोंद करता येणारनाही असं आरोग्य विभागाकडून स्पस्ट करण्यात आलं आहे.

नाव नोंदणी कुठे करायचीBirth and Death Registration…..!

*    Birth and Death Registration  नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी  केली आहे तिथल्या स्थानिक स्वराज संस्थेशी संपर्क साधायचा आहे . म्हणजे ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात नगरपरिषद आणि महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

कागदपत्र

जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करायचं असेल तर आधी अर्जदाराच्या नावाच्या खात्री साठी त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी बारावीच शैक्षणिक प्रमाणपत्र ,आधारकार्ड हि कागदपत्र लागणार आहेत.

जन्म दाखल्यात दुरुस्ती कशी करायची ?

       जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी एक अफेडेव्हीट प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यायचे आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हे शपथपत्र तयार करून घ्यायचा आहे नावात बदल किंवा दुरुस्ती करणेबाबत अशा आशयाचे हे शपथपत्र असावा. Birth and Death Registration अर्जात  संपूर्ण माहिती जुनं चुकलेलं नाव त्यामागचं कारण जसं की नजरचुकीने नाव टाकण्यात आलं पण खरं नाव अमुक आहे अशी सविस्तर माहिती नमूद करावी. सेतू कार्यालय किंवा नोटरीच्या वकिलाकडून तुम्ही हे शपथपत्र तयार करून घेऊ शकता.या शपथपत्रासोबत पालकांचं आधार कार्ड तसंच बाळाचं आधार कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स प्रत द्यावी लागते. ही कागदपत्र जमा केली की आठवडाभरात तुम्हाला दुरुस्ती सहित चा जन्म दाखला मिळणे अपेक्षित असतं.

जन्म नोंद कशी करतात…! Birth and Death Registration

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांना द्यावी लागते. बाळाचा जन्म ग्रामीण भागात किंवा शहरी भागात कुठेही झाला तरी जन्म झाल्यापासून 21 दिवसाच्या आत माहिती दिली पाहिजे 21 दिवसाच्या आत  Birth and Death Registration जन्माची नोंद आणि माहिती वेळेवर देणे कायद्याने बंधनकारक आहे या मुद्दतीत नोंद करून दाखला मिळाल्यास तो मोफत मिळतो.पण मुदतीत दाखला न घेतल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे विलंब शुल्क आकारला जातो.

Birth and Death Registration मध्ये बाळाच्या आई-वडिलांचं आधार कार्ड प्रस्तुती नंतर दवाखान्यात मिळालेलं जन्म प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था जन्मदाखला देत असतात. हाच दाखला आता बहुतेक सरकारी कामासाठी एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

आजच्या पेपर लेस आणि ऑनलाईन च्या युगात कागत पात्रांना खूप माहित आलं आहे. शिक्षण, नौकरी, बँक किंवा कोणताही शासकीय किंवा खाजगी ठिकाणी सुद्धा आज माणसाला Birth and Death Registration या कागदपत्राची आवश्यकता भासत आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी वेळ राहताच आपल्या पाल्याची,आपली,व आपल्या इतर नातेवाईकाची जन्म मृत्यू ची नोंद योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी करुंन घ्यावी.व याची  कल्पना आपल्या मित्र नातेवाईकांना द्यावी जेणे करून त्यांना हि या कागदपत्रांची अडचण येणार नाही.

हि माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा

आमचे सोशल मीडिया

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment