2022-23 मध्ये कोणत्या कारखाण्याने उसाला किती भाव दिला (FRP) Which factory paid how much price in 2022-23

आता सर्वत्र कोणत्या कारखाण्याने किती भाव दिला किंवा देणार याची सर्व शेतकरी व ऊस उत्पादक याच्या मध्ये चर्चा आहे. प्रत्येक भागात वेगवेगळे भाव दिले जातील आपण आज गेल्या हंगामात कोणत्या कारखाण्याने किती भाव दिला, हे पाहणार आहोत.

FRP यंदाच्या गळीत हंगाम नोव्हेंबर पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून या बैठकीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरवण्यात येणार आहे.हंगाम सुरू होण्याआधी ही शेतकरी संघटनेचे शेतकऱ्याना 400(FRP) रुपयांचा हप्ता देण्यासाठी आणि उसाला चांगला हमीभाव देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना सर्वात जास्त आणि सर्वात कमी हमीभाव कुठल्या कारखाण्याने दिला होता आपल्याला माहिती आहे का?

चला तर मग जाणून घेऊयात मागच्या वर्षीचे भाव

दरम्यान मागच्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पार पडला . त्यातील काही कारखान्यांनी 2000 पेक्षा कमी तर काही कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना दिला आहे. उसाला सर्वात कमी आणि सर्वात जास्त भावामध्ये तब्बल 1338 रुपयांचा फरक होता.

2022-23 मध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त भाव देणारा कारखाना

गळीत हंगाम 2022-23 मध्ये सर्वाधिक दर कोल्हापूर विभागातील दालमिया भरत साखर कारखाण्याने दिला होता.तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करता शेतकऱ्यांना 3177 रुपये प्रति टन भाव मिळाला होता.(FRP)तर सर्वात कमी भाव अहमदनगर जिल्यातील श्रीगोंदा तालुक्यातील साजन साखर कारखाण्याने दिला होता. या कारखाण्याने वाहतूक व तोडणी खर्च वजा करता प्रति टन 1839 रुपये एवढा भाव दिला होता.साजन साखर कारखान्याकडून वाहतूक आणि तोडणी खर्च प्रति टॅन 1146 रुपये एवढा आकारला होता.मागच्या वर्षी 211 पैकी 198 कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी भाव दिला होता.तर केवळ 13 कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना दिला होता . 3000 पेक्षा कमी भाव देणाऱ्या 198 कारखान्यांपैकी 12 साखर कारखान्यांनी 2000 पेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना दिला होता.

FRP मधून शेतकऱ्यांना किती रक्कम मिळते

दरवर्षी केंद्र सरकारकडून उसासाठी FRP जाहीर केला जातो, त्यासाठी उसाचा उतारा सुद्धा निश्चित केला जातो. जसा उतारा वाढेल किंवा कमी होईल त्यानुअसर FRP मध्येह बदल होत असतात.शासनाने जाहीर केलेले FRP मधून तोडणी व वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते.

3000 पेक्षा जास्त भाव देणारे कारखाने (वाहतूक व तोडणी खर्च वजा करून)

अ.क्र कारखान्यांची नावेठिकाण तालुकाजिल्हा भाव
1भोगावती साखर कारखानाकरवीरकोल्हापूर3094.41
2दुधागंगा साखर कारखाना,बिद्रीकागल कोल्हापूर3089.55
3कुंबी कासारी साखर कारखाना,कुडीत्रेकरवीरकोल्हापूर3150.00
4देशभक्त रत्नप्पा अण्णा कुंभार सा. का. गंगानगर, इचलकरंजीहातकणंगलेकोल्हापूर3103.50
5तात्या साहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना पन्हाळा कोल्हापूर3177.79
6राजाराम बापू पाटील सहकारी वाळवासांगली3105.57
7राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट -2वाळवासांगली3104.29
8राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट -3वाळवासांगली3105.76
9पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना कडेगावसांगली3167.72
10क्रांती अग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड सहकारी सा.का.कुंडाळपलूससांगली3101.22
11तालमीया भारत साखर कारखाना कोकरूड शिराळासांगली3027.88
12यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुक कराड सातारा3023.61
13 दालमिया भारत साखर कारखाना पन्हाळाकोल्हापूर3177.79

2000 रुपया पेक्षा सर्वात कमी भाव देणारे साखर कारखाने (वाहतूक व तोडणी खर्च वजा करून)

अक्रकारखाना नावठिकाण तालुका जिल्हाभाव
1सिद्धनाथ शुगर मिल्स तीहरेउत्तर सोलापूरउत्तर सोलापूर1974.42
2 भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड लवंगीमंगळवेढासोलापूर1999.58
3साजन कारखानाश्रीगोंदाअहमदनगर1839.00
4 धाराशिव साखर कारखानाकळवणनाशिक1988.00
5अंबाजी ट्रेडिंग कॉर्पोरेशन जळगावचाळीसगावजळगाव1884.00
6 संत एकनाथ सहकारी साखर कारखानापैठण छत्रपती संभाजीनगर1977.00
7रामेश्वर सहकारी साखर कारखाना शिपोरा बाजारभोकरदनजालना1968.14
8साईबाबा साखर कारखानाशिवनीलातूर 1993.00
9पैनगंगा साखर कारखाना वरुड धडबुलढाणा1851.48
10माणूस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट एक बेलाउमरेडनागपूर1997.67
11माणूस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट दोन बेला उमरेडनागपूर1877.41
12व्यंकटेश्वर पावर प्रोजेक्ट मौडानागपूर1984.60
अश्या प्रकारे गेल्या हंगामात काही साखर कारखान्यांनी जे भाव दिले होते. याची माहिती यात दिली आहे.(FRP)या वर्षी कोणता कारखाना किती भाव देणार याची शेतकऱ्यांना चिंता आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यांना देताने योग्य ती काळजी व अद्यावत माहिती घेऊनच ऊस द्यावा कारण नंतर काळजी करण्याची गरज भासणार नाही

आमची माहिती आवडल्यास आमच्या whatapp च्या तरुण विचार या चॅनल ला नक्की follow करा

Leave a Comment