ऑनलाइन अर्ज करा 30 दिवसात मिळेल रेशन कार्ड
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाइन रेशनकार्ड rationcard देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.रेशनकार्ड साठी एजंट कडे पैसे व कागदपत्र दिली पण महिन्यानंतर ही शिधापत्रिका अशा तक्रारींना आता कायमचाच पूर्णविराम लागणार आहे. त्यामुळे बनावट गिरीला हि चाप बसला आहे.त्याच्यासाठी तुम्हाला आपले सरकार किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन अपलोड करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला 100 रुपये ते 50 रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. त्यानंतर अवघ्या तीस दिवसात संबंधित व्यक्तीला रेशनकार्ड मिळणार आहे.
रेशनकार्ड Rationcard
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दुबार किंवा विभक्त रेशनकार्ड rationcard त्यातील नावे कमी करणे किंवा नावे वाढविणे. त्यात नवीन रेशनकार्ड काढण्याची ही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्य धान्य वितरण अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी येईल त्यानंतरच्या लाभार्थ्याला रेशनकार्ड मिळणार आहे.त्याला कोणत्याही एजंट कडे जाण्याची किंवा अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.नागरिकांना आता शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, त्यांना घरबसल्या शिधापत्रिका मिळणार आहे.
या संकेतस्थळावरून करता येईल ऑनलाइन अर्ज
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार rationcard आता गावातील शहरातील प्रत्येक नागरिकांना ऑनलाइन रेशनकार्ड मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन www.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
30 दिवसात मिळेल रेशनकार्ड
rationcard रेशनकार्ड, शिधापत्रिका काढण्यासाठी आता कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 30 दिवसात त्या व्यक्तीला नवीन रेशन कार्ड किंवा विभक्त रेशन कार्ड मिळणार आहे.
मोबाईलवर येईल मेसेज
अंतोदय योजनेतील कुटुंबाला दरमहा 35 किलो तर प्राधान्य कुटुंबातील प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. केंद्र व राज्य सरकारने हे प्रमाण निश्चित केले आहे. दरम्यान कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक रेशनकार्ड, rationcard शिधापत्रिकेला लिंक केल्यास धान्य घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळातच त्यासंबंधीचा मराठीतून मेसेज मोबाईलवर येणार आहे. त्यातून धान्य मिळेल, मिळाले नसल्याची तक्रार कमी होतील असा विश्वास विभागाला आहे.
Rationcard अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड कुटुंबातील सर्वांचे.
- शेजाऱ्याचे रेशन कार्ड झेरॉक्स स्वाक्षरी.
- रहिवासी दाखला सातबारा उतारा लाईट बिल.
- उत्पन्नाचा दाखला.
- शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन.
ई-रेशनकार्ड
सध्या आपणाला जे रेशनकार्ड मिळत आहे. ते रेशनकार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी ई-रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. कार्डमध्ये नाव कमी करणे, नोंदविणे, ट्रान्सफर करणे आदी कामे लवकरात लवकर होणार आहेत. ही प्रणाली राज्यात सुरू झाली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने ई-कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ई-रेशनकार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
क्यूआर कोड असलेले ऑनलाईन रेशनकार्ड देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे ही कामे कार्यालयात न जाता घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. अन्य जिल्ह्यांतही हळूहळू ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जुने, फाटलेले, मळकट रेशनकार्डपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ई- रेशनकार्ड वाटेल तेव्हा ऑनलाइन ओपन करता येणार आहे. कार्ड डीजी लॉकरमध्येही दिसेल त्यामुळे याचा लाभ लाभार्थ्यांना नक्कीच होईल.
रेशन कार्ड प्रकार
- (APL) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिले जातात।
- (BPL) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिले जातात।
- अंत्योदय अन्न योजना (AAY) रेशन कार्ड जे “गरीब ते गरीब” कुटुंबांना दिले गेले आहेत।
- प्राधान्य घरगुती (PHH) रेशन कार्ड – हे कार्ड राज्य सरकारांनी निकशीत केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना दिले जाते.
- प्राधान्य रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रति सदस्य दरमहा 5 किलो धान्य मिळण्याचा हक्क आहे.
वरील माहितीच्या आधारे आपण घरबसल्या 30 दिवसांमध्ये ऑनलाईन राशनकार्ड मागू शकतो.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा