दुष्काळाचे ( Drought ) भीषण संकट
महाराष्ट्र मध्ये मागील काही दिवसापूर्वी चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातील तालुक्यात अतिशय गंभीर स्वरूपाचा तर काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. त्यातीलच एक जिल्हा म्हणजे धाराशिव,या जिल्ह्यातील धाराशिव, वाशी, लोहारा या तालुक्यात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासनाने काय सोयी सुविधा केल्या आहेत. कसा आराखडा तयार केला आहे. याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ.
हेही वाचा- महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
167 चारा छावण्यासाठी 1204 कोटी, तर 191 टँकरसह पाण्यासाठी लागणार 14 कोटी.
धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांचा चाऱ्याची स्थिती गंभीर आहे. दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस भीषण होताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने सध्य स्थिती व भविष्यातील उपयोजना लक्षात घेता पाणी आणि चारा बाबत गावनिहाय आराखडा तयार केला आहे. जवळपास 1 हजार 218 कोटीची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे.
डिसेंबर महिन्यानंतर पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यात 167 चारा छावण्यासाठी 1 हजार 204 कोटी, तर 191 टँकर सह पाण्यासाठी 14 कोटी लागू शकतात. ही आकडेवारी प्राथमिक असली तरी यात वाढ होऊ शकते. आर्थिक तरतुदी बरोबरच चारा वाहतूक बंदी सह अन्य बाबींची उपायोजना सुद्धा केली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले असून शेती वापरावर बंदी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी विभागीय आयुक्ताकडे पाणीटंचाई आराखडा सादर केला आहे. तर पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त डॉक्टर गौरीशंकर हुलसुरे यांनी पाणीटंचाई बाबत गावनिहाय आहे. पशुधन आणि त्यासाठी लागणाऱ्या चारा याचा अहवाल अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
पाणीटंचाई आराखडा
धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पाणीटंचाई चा 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंतचा कृती आराखडा तयार केला. असून शहरी भागासाठी 41 लाख, तर ग्रामीण भागासाठी 13 कोटी 13 लाखांचा आराखडा तयार केला आहे.
त्यात 770 वाडी वस्तीसाठी 573 खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यासाठी, 2 कोटी 56 लाख, तर 191 टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 3 कोटी रुपये डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लागणार आहेत.
कोणत्या तालुक्यात किती टँकर
लोहारा तालुक्यात 7 टँकर, परंडा तालुक्यात सर्वाधिक 70 टँकर, उमरगा तालुक्यात 24 टँकर, वाशी तालुक्यात 24 टँकर, कळंब तालुक्यात 35 टँकर, आणि भूम तालुक्यात 31 टँकर लागणार आहेत.
कोणत्या तालुक्यात किती विहिरी अधिग्रहण
जिल्ह्यातील तालुक्यामध्ये काही विहिरीचंही अधिकरण करण्यात आल आहे. त्यामध्ये सर्वाधिक 165 विहिरीचं अधिग्रहण कळंब तालुक्यात करण्यात आला आहे. लोहारा तालुक्यातील 20, भूम तालुक्यात 87, धाराशिव तालुक्यात 39, परंडा 70, तुळजापूर 87, उमरगा 55, वाशी 50 असे एकूण 573 विहिरीचे अधिग्रहण करावे लागणार आहेत.
हेही वाचा -Crop Insurance पीक विमा किती मिळेल हे कसं ठरवलं जातं ?
चारा छावण्या
धाराशिव जिल्ह्यात 197 दिवस चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे 30 जून 2024 पर्यंत चा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चारा छावणीसाठी 1 हजार 204 कोटी लागू शकतात. या काळात 167 चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन असून त्यासाठी प्रतिदिन पाच कोटी 56 लाख 78 हजार इतका खर्च होणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती चारा छावण्या
तुळजापूर तालुक्यात 30, लोहारा 15, कळंब 18, वाशी 9, उमरगा 32,भूम 26, परंडा 18 आणि धाराशिव तालुक्यात 19 अशा चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन असून डिसेंबर अखेर पुढील इतका चारा शिल्लक आहे.
धाराशिव जिल्ह्यात पशुधन किती आहे
धाराशिव जिल्ह्यात 20 व्या पशुगणानुसार लहान मोठी शेळ्या मेंढ्या सह 7 लाख 90 हजार जनावरे असून, त्यात छोटी जनावरे एक लाख 19 हजार 832, मोठी जनावरे 4 लाख 31 हजार व 2 लाख 39 हजार शेळ्या मेंढ्या आहेत. त्यांना दररोज जवळपास 3 हजार 89 मॅट्रिक टन इतका चारा लागतो. चारा छावणी सुरू झाल्यास लहान जनावरे व शेळी मेंढी यांना 50 रुपये तर मोठ्या जनावरांना 100 रुपये प्रतिदिन मदत चाऱ्यासाठी दिली जाते.
हेही वाचा-यंदा 1972 नंतरची सर्वात मोठी Water shortage पाणी टंचाई Trustworthy
चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून बियाणे वाटप, मुरघास निर्मिती, गाळपेरा क्षेत्रात चारा पीक घेणे, चारा वाहतूक बंदी व सर्व उपाययोजना करूनही चारा टंचाई भासल्यास चारा छावणी हा अंतिम पर्याय ठेवला आहे.
सरकार सकारात्मक
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी वरील आराखडा शासनाला सादर केला. शासन सकारात्मक विचार करत असून आराखड्याप्रमाणे निधीची मागणी केली आहे. असे त्यांनी सांगितले. या आधीच धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, लोहारा व वाशी या तीन तालुक्यात राज्य सरकारने गंभीर दुष्काळ जाहीर केला. वेळोवेळी पाणी व चारा यांचा आढावा घेऊन तो कृषी आयुक्त मदत पुनर्वासन विभागासह राज्य सरकारला कळविला जात आहे. कमी पाऊस, पाणी पातळी कमी झाली असून धरणातील जिवंत उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प आहे. हेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लवकरच आपणाला निधी उपलब्ध होईल. अशी आशाही जिल्हाधिकारी महोदयांनी व्यक्त केली.
आमचे सोशल मीडिया –
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा