बांबू
bamboo हि सर्वात जलद वाढ असणारी वृक्ष प्रजाती आहे. याचप्रमाणे तिच्या विविध उपयोगी गुणधर्मामुळे गरीब शेतकरी कुटूंबाचे घर व वापराच्या आवश्यक वस्तूसाठी होतो धान्य साठविण्याच्या कोठ्या व घरगुती वापराच्या इतर वस्तू सूप, टोपली, सारख्या अनेक वस्तू तयार करण्यासाठी बांबूच्या वापर सर्रास केला जातो.
साधूचं विचार केला तर बांबूला कारखान्याकडून मागणी वाढताना दिसते. उत्तम प्रकारचा कागद आणि मूल्यवान वस्तू बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. विविध प्रकारच्या वस्तू व शोभेवंत वास्तूच्या वाढत्या मागणी मुळे बांबू शेती फायदेशीर ठरू शकते.
बांबू पिकासाठी जमीन
बांबू पिकासाठी हंगामी पिकांसाठी उपयुक्त जमिनीची आवश्यकता नसते. पिकासाठी आर्थिक दृष्ट्या न परवडणाऱ्या , धूप झालेल्या, नापीक, ओसाड पडीक जमिनीत सुद्धा बांबूची लागवड करता येते.
बांबू लागवडीच्या पद्धती
- बांबू लागवडीच्या दोन पद्धती आहेत.एक म्हणजे बांबूचे कंद काढून त्याची लागवड करणे
- दुसरी पद्धत म्हणजे बांबूच्या बिया पासून रोपे तयार करून त्याची लागवड करणे.
- या शिवाय उती संवर्धनाणे बांबूची लागवड करणे.
- यासाठी एकवर्षाच्या आतील दोन तीन बांबू काडून लागवडीच्या ठिकाणी जमिनीत गाडून ठेवावेत.
- दहा ते बारा सेंटीमीटर बांबूचा भाग जमिनीच्या वर ठेऊन त्यावरील भाग छाटावा.
अंतर
- शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत जेथे बांबूची लागवड करायची आहे. अशा ठिकाणी ठराविक अंतरावर 5×5 किंवा 6×8 मीटर अंतरावर आखानणी करून उन्हाळ्यात 0.60×0.60×0.60 मीटर आकारमानाचे खड्डे खोदून घ्यावेत.
- खड्यात भुसभुशीत माती तीन भाग + एक भाग शेणखत आगपेटी भरून दहा टक्के नी लिंडेन पावडर मिसळून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरून ठेवावीत.
- पावसाळा सुरू झाला की बांबूची रोपे मुळांना इजा न होता माती सह काढून घेऊन या खड्ड्यामध्ये लागवड करावी.
- बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी खोल गाळाची व पाण्याची निचरा होणारी जमीन उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.
- बांबू लागवडीसाठी किमान नऊ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
- एक हजार ते चार हजार मिलिमीटर पावसाच्या प्रदेशात बांबूची वाढ होऊ शकते.
राज्यात 11 लाख हेक्टरवर bamboo लागवड होणार
जगभरात वाढत्या तापमानामुळे आणि हवेतील कार्बनच्या प्रमाणामुळे जीवसृष्टी धोक्यात आली आहे.वातावरणातील कार्बन उत्सर्जन रोखण्या साठी बांबूची लागवड हा शाश्वत उपाय ठरू शकतो. आणि तयातून शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. अशी माहितीव राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोल्ट असताना पटेल म्हणले कि, पर्यावरण जागृती साठी आणि शेतकऱ्याच्या उत्पनात वाढ होण्या साठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,पर्यावरण व वातावरण बदल विभाग महारष्ट्र शासन आणि लातूर जिल्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुबंईत नऊ जानेवारी रोजी “शाश्वत पर्यावरण विकास “परिषदेचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सभागृहात हि पत्रकार परिषद होणार असून या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याच्याबरोअबर राज्यातील उद्योग क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शन करणार आहेत असे पटेल यांनी सांगितले. राज्य सहन पर्यावरणाच्या दृष्टीने आपली भूमिका ठामपणे निभावत असताना आता पुढील काळात खासगी क्षेत्रातीळ महत्वाच्या उदोगांनी देखील पुढे येऊन बांबू लागवड आणि वापर यातील संधीकडे लक्ष देऊन देशाच्या विकासात शासनाच्या बरोबरीने आपला वाटा उचलावा असेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात खासगी आणि सरकारी संस्था तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था याना बांबू वृक्ष लागवड आणि वापर यात असलेल्या संधीबाबत अवगत करण्यासाठी हि पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे.
बांबू लागवडीसाठी 7 लाख अनुदान
या योजनेचा उद्देश केवळ पर्यावण संरक्षण हाच नसून यातून सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य होणार आहेत.त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये बांबू रोपे लागवडीसाठी प्रतिहेक्टर 7 लाख रुप्याचे अनुदान देण्यात येत आहे. पाण्यासाठी विहीर पडल्यास त्यावर अनुदानापोटी 4 लाख रुपये अधिक मिळतील.बाबूच्या विक्रीतून शेतकऱ्याचे उत्पन्न देखील वाढणार आहे. त्यामुळे मनरेगा अंतर्गत राज्यात होणारी बांबू लागवड योजना संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास हि पटेल यांनी व्यक्त केला.
बांबू लागवडी साठी अंतर
बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदांपासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें.मी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा लागेल.
पावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, शिफारशीत कीडनाशक भुकटी, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून संरक्षण करावे.
दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/ कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देतात, असे आढळून आलेले आहे. कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते.
बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू जमिनीपासून 30 सें.मी. उंचीवर कापावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी दोन वर्षांच्या कालावधीने पुढील बांबूच्या कापण्या कराव्यात. एक वर्षाचा कोवळा बांबू कापू नये. जितके नवीन कोंब आले असतील, तितकेच जुने बांबू तोडावेत. पक्व बांबू ठेवून नवीन बांबू तोडू नयेत.
बांबू शेतीपासून लाखोंचं उत्पन्न कसं?
बांबूची लागवड करुन आता शेतकरी कोट्यवधींची कमाई करू शकतात. बांबू तोडण्यावर वन कायदा लागू होणार नाही, असा सध्याचा कायदा आहे. तर कॉंग्रेसच्या शासनकाळात बांबू तोडायचा म्हटल्यावर वन कायदा लागू होत होता. भारत सरकारने मोठ्या प्रमाणात शेतीसाठी राष्ट्रीय बांबू मिशन देखील तयार केले आहे. त्याअंतर्गत बांबूच्या लागवडीसाठी शेतकर्याला प्रति रोप 120 रुपये सरकारी सहाय्य मिळणार आहे. तसेच, आता त्याचा वापर वाढत आहे, अशा प्रकारे आपल्याला त्यातून चांगले पैसे मिळतील.
सरकारने हा कायदा बदललाय
जानेवारी 2018 मध्ये केंद्र सरकारने बांबू झाडांच्या श्रेणीतून काढून टाकले. तथापि, हा कायदा केवळ खासगी जमिनीसाठी केला गेलाय. जंगलभूमीवर बांबूंना कोणतीही सूट नाही. तेथे वन कायदा लागू होईल.
काय आहे कमाईचं गणित?
असं म्हटलं जातं की, जर आपण 3 x 2.5 मीटर अंतरावर एक रोप लावलं तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रात 1500 झाडे लावली जातील. दोन वनस्पतींमध्ये उर्वरित जागेत आपण एकत्रितपणे दुसरे पीक घेऊ शकता. 4 वर्षानंतर तुम्ही साडे तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकाल. दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता नाही. कारण बांबूची लागवड सुमारे 40 वर्षे टिकते.
शेती कोणत्या प्रकारे केली जाते?
बांबूची लागवड ही एक-हंगामातील शेती नाही, यासाठी आपल्याला बराच वेळ द्यावा लागतो. बांबूच्या शेतीसाठी सुमारे 4 वर्ष लागतात. चौथ्या वर्षी त्याची कापणी होते. बांबूची रोपे काही मीटर अंतरावर लावली जातात. बरेच शेतकरी त्याच्या लागवडीबरोबरच काही इतर शेती देखील करतात जे सहजपणे मध्यभागी केली जातात. तीन वर्षांत प्रत्येक झाडाची सरासरी किंमत 240 रुपये असेल. त्यापैकी सरकार तुम्हाला मदत करते आणि बांबूच्या लागवडीसाठी प्रति वनस्पती 120 रुपये मदत देते.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा