Sugarcane 15012
Sugarcane 15012 : फुले ऊस 15012 ही मध्यम पक्वता गटातील अधिक उत्पादन देणारी, साखरेचे प्रमाण अधिक असणारी, पाण्याचा ताण सहन करणारी, रसवंतीस योग्य अशी हि नवीन ऊस जात आली आहे. तसेच फुले 265 प्रमाणेच चोपण जमिनीत येणारी जात आहे.
फुले ऊस 15012 (Phule Sugarcane 15012) या मध्यम पक्वतेच्या वाणाची निर्मिती फुले 265 आणि को 94008 या वाणांच्या संकरातून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या ठिकाणी केली आहे. प्रथम संकर 2012 मध्ये केला होता, 2013 आणि 2014 मध्ये रोप निर्मिती आणि रोपातून निवड करण्यात आली. त्यानंतर 2014 पासून 2021पर्यंत स्थानिक, बहुस्थानीय चाचण्या तीनही लागवड हंगामात लागवड ऊस आणि खोडवा पिकाच्या घेण्यात आल्या.
फुले ऊस 15012 या मध्यम पक्वता गटातील जातीचे ऊस उत्पादन, प्रचलित ऊस जात को 86032 या जातीपेक्षा 16 टक्के आणि साखर उत्पादन 15.51 टक्के अधिक मिळाले. फुले 265 जातीबरोबर तिन्ही हंगाम आणि खोडव्याची सरासरीची तुलना केली असता उत्पादन जवळपास फुले 265 एवढे मिळाले. फुले ऊस 15012 हा मध्यम पक्वतेच्या वाणाचे को 86032 वाणापेक्षा 16 टक्यांपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आणि साखर उत्पादन 5.51 टक्के अधिक मिळाले. फुले 265 वाणाबरोबर तीनही हंगाम आणि खोडव्याच्या सरासरीची तुलना केली असता उसाचे उत्पादन तोडीस तोड मिळाले. साखर उत्पादनात ६ टक्के वाढ दिसून आली. उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे को 86032 पेक्षा 0.4 युनिट आणि फुले 265 पेक्षा 0.8 युनिटने जास्त असल्याने साखर उत्पादन वाढीसाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे.
त्याप्रमाणे अखिल भारती पातळीवर नऊ राज्यात अभ्यास करण्यात आला. या अहवालाच्या आधारे डॉ.बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत फुले ऊस 15012या वाणाची सुरु, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली.
फुले ऊस 15012 जातीची वैशिष्ट्ये :
- सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
- पाण्याचा ताण सहन करणारी आणि न लोळणारी जात असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीला उत्तम प्रतिसाद देऊ शकते.
- ऊस जाड असून कांड्या सरळ आहेत. कांड्यावर मेणाचा थर आहे.
- चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन. रसवंतीसाठी उत्तम जात.
- पानावर किंवा पानाच्या टोपणावर कूस नाही, त्यामुळे ऊस तोडताना त्रास होत नाही. वाढे म्हणून जनावरास त्रासदायक नाही.
- पाने मध्यम रुंद आणि सरळ असल्याने बाष्पीभवन कमी होऊन पाण्याचा ताण सहन करते.
- तुरा अल्प प्रमाणात व उशिरा येत असल्याने जास्त पाऊस काळ असल्यास किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात कमी तुरा आल्यामुळे इतर जातींपेक्षा उत्पादनात वाढ.
- खोडवा उत्तम असल्याने व साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्यामुळे येत्या काळात या जातीला वाढती मागणी.
- खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते. साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मिलीबग किडीस काही प्रमाणात बळी पडते.
- ऊस सरळ वाढतो. जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
- मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
- खोडव्यासाठी उत्तम. पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
- चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक, लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक. खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
- तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
- रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
- ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर पांढरट हिरवा दिसतो.
हेही वाचा – 2022-23 मध्ये कोणत्या कारखाण्याने उसाला किती भाव दिला (FRP) Which factory paid how much price in 2022-23
लागण ऊस अधिक खोडवा उत्पादन
- चाचणीमध्ये लागवड उसाचे 6 आणि खोडव्याच्या 3 अशा 9 ठिकाणी चाचणीमध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामामध्ये फुले ऊस 15012 या वाणाचे हेक्टरी अनुक्रमे 164 टन, 156 टन आणि 130 टन उत्पादन मिळाले.
- 2018-20 मधील वेगवेगळ्या ठिकाणच्या चाचणीमध्ये फुले ऊस 15012 या वाणाचे साखर उत्पादन आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात अनुक्रमे को 86032 या वाणापेक्षा 13.04 टक्के, 15.47 टक्के आणि 9.06 टक्के अधिक मिळाले. फुले 0265 वाणाशी तुलना केली असता आडसाली, पूर्वहंगामात आणि सुरू हंगामात नवीन वाणाचे साखर उत्पादन 6.34 टक्के, 7.98 टक्के आणि 3.78 टक्याने अधिक मिळाले.
- तीनही हंगामातील खोडव्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन 130 टन मिळाले. को 86032 वाणाच्या उत्पादनाशी तुलना केली असता नवीन वाणाचे ऊस उत्पादन आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडव्यात अनुक्रमे 13.36, 11.68, 7.69आणि 8 टक्के अधिक मिळाले.
- फुले 0265 वाणाच्या उत्पादनाशी तुलना केली असता नवीन वाणाचे ऊस उत्पादन आडसालीमध्ये 2.44 टक्के आणि पूर्वहंगामात 2.61 टक्के अधिक मिळाले.
लागण उसाचे उत्पादन :
- फुले ऊस 15012 या ऊस जातीचे सरासरी आडसाली उसाचे हेक्टरी उत्पादन 183 टन, पूर्व हंगामामध्ये 163 टन आणि सुरूमध्ये 137 टन उत्पादन मिळाले.
- टक्केवारीनुसार आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामात अनुक्रमे को 86032 या जातीपेक्षा 16.55 टक्के, 14.72 टक्के आणि 4.75 अधिक उत्पादन मिळाले.
- फुले 265 जातीशी तुलना केली असता आडसाली व पूर्व हंगामामध्ये 4 टक्के अधिक ऊस उत्पादन मिळाले.
- साखर उत्पादन आडसाली, पूर्वहंगामी व सुरु हंगामात अनुक्रमे को 86032 जातीपेक्षा 14.19 टक्के, 13.77 टक्के आणि 5.93 अधिक मिळाले. फुले 265 जातीशी तुलना केली असता आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामामध्ये या नवीन जातीचे साखर उत्पादन 7.51 टक्के, 7.32 टक्के आणि 2.10 टक्के अधिक मिळाले.
हेही वाचा – (sugarcane FRP ) ऊसाला घसघसीत दरवाढ मिळण्याची शक्यता
लागण ऊस अधिक खोडवा ऊस उत्पादन :
- फुले ऊस 15012 जातीचे आडसाली, पूर्वहंगामी व सुरु हंगामामध्ये हेक्टरी अनुक्रमे 164 टन, 156 टन आणि 130 टन उत्पादन मिळाले.
- तिन्ही हंगामामधील खोडव्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन 130 टन मिळाले. प्रचलित को 86032 जातीच्या उत्पादनाशी तुलना केली असता नवीन जातीचे ऊस उत्पादन आडसाली, पूर्वहंगामी, सुरु आणि खोडव्यामध्ये अनुक्रमे 13.63 टक्के,11.68 टक्के, 7.69 टक्के आणि 8.0 टक्के अधिक मिळाले.
- फुले 265 या जातीच्या उत्पादनाशी तुलना केली असता नवीन जातीचे ऊस उत्पादन आडसालीमध्ये 2.44 टक्के आणि पूर्व हंगामात 2.61 टक्के अधिक मिळाले.
साखर उत्पादन :
- फुले ऊस 15012 या जातीचे साखर उत्पादन आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामात अनुक्रमे को 86012 या जातीपेक्षा13.04 टक्के, 15.47 टक्के आणि 9.06 अधिक मिळाले.
- फुले 265 जातीची तुलना केली असता आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामात नवीन जातीचे साखर उत्पादन 6.34 टक्के,7.98 टक्के आणि 3.87 टक्क्यांनी अधिक मिळाले.
- सुक्रोज आणि व्यापारी शर्करा टक्केवारीचा विचार करता लागवड ऊस अधिक खोडवा या चाचण्यांमध्ये फुले ऊस 15012 या जातीचे उसातील सुक्रोजची टक्केवारी आडसाली 20.50 टक्के, पूर्वहंगामी 20.42 टक्के, सुरु 20.27 टक्के आणि खोडवा उसात 20.02 टक्के आहे. त्याचप्रमाणे व्यापारी शर्करा टक्केवारी आडसाली 14.6 टक्के, पूर्वहंगामी 14.4 टक्के, सुरु 14.5 टक्के आणि खोडवा उसात 14.1 टक्के मिळालेली आहे. को 86032 जातीपेक्षा व्यापारी शर्करा 0.4 युनिटने आणि फुले 265 पेक्षा 0.8 युनिटने जास्त मिळाली.
हेक्टरी ऊस संख्या आणि एका उसाचे वजन :
- फुले ऊस 15012 जातीमध्ये हेक्टरी ऊस संख्या आडसालीमध्ये 110950, पूर्व हंगामीमध्ये 10184, सुरूमध्ये 91630 आणि खोडव्यामध्ये 99670 एवढी मिळाली. उसाचा सरासरी व्यास 3 ते 3.15 सेंमी आहे.
- एका उसाचे वजन 1.750 किलो ते 1.810 किलो मिळते. हे वजन को 86032 जातीच्या उसाच्या वजनाच्या 15 टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे निश्चितच अपेक्षित उत्पादन हे को 86012 जातीपेक्षा जास्त मिळत आहे.
हेही वाचा – Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवर सरकारने घातली बंदी
उसाची कांड्यापर्यंत उंची आणि व्यास :
बहुस्थानीय चाचणीमध्ये फुले ऊस 15012 या वाणामध्ये उसाची वाढ्यापर्यंत उंची आडसाली (240.46 सेंमी), पूर्व हंगामी (244.09 सेंमी), सुरू (232.57सेंमी) आणि खोडवा उसात (244.69 सेंमी) आढळून आली. उसाचा व्यास 3 सेंमी पासून 3.15सेंमी आढळून आला.
फुले ऊस 15012 वाणाची वैशिष्टे
- ऊस सरळ वाढतो. जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
- मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
- खोडव्यासाठी उत्तम. पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
- चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक, लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक. खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
- तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
- रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
- ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर पांढरट हिरवा दिसतो.
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.